ताज्या बातम्याट्रेंडिंग

राज ठाकरेंचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे वसंत मोरे कोण आहेत?

वसंत मोरे हे नाव प्रसारमाध्यमांमध्ये कायम चर्चेत असते. विरोधी विचारांच्या लोकांच्याही मदतीला धावणारा नेता अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे यांची ओळख आहे. मात्र मागील काही काळापासून वसंत मोरेंकडून पक्षाप्रती असलेल्या नाराजीचे सूर ऐकायला येत आहेत. (Who is Raj Thackeray’s most trusted Vasant More?)

दोन दिवसांपूर्वी पुण्यात मनसेकडून एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात वसंत मोरे यांना देखील आमंत्रण देण्यात आले होते, मात्र या कार्यक्रमात आपल्याला बोलू न दिल्यामुळे वसंत मोरे पुन्हा एकदा नाराज झाले आहे. राज ठाकरेंचे अतिशय विश्वासू मानले जाणारे वसंत मोरे कोण आहेत? त्यांची आतापर्यंतची कारकीर्द काय? आणि वसंत मोरेंकडून सतत नाराजीचे सूर का ऐकायला येत आहेत? हेच या माध्यमातून जाणून घेऊयात.

कट्टर मनसैनिक अशी वसंत मोरे यांची ओळख त्यांना राज ठाकरेंचे अत्यंत विश्वासू मानले जाते. वसंत मोरे एक व्यावसायिक असून, शेतकरी देखील आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंप्रमाणेच मनसे पक्ष जेव्हा स्थापन करण्यात आला. अगदी तेव्हापासून वसंत मोरे राज ठाकरेंच्या सोबत आहेत आणि गेले २७ वर्षे ते पक्षात एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत. मनसे पक्ष स्थापन झाल्यानंतर वसंत मोरे यांनी केवळ एका वर्षातच पक्षवाढीची सुरुवात केली.

२००७ साली पुण्यात पार पडलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये ८ नगरसेवक निवडून आले. पक्षबांधणीत आणि पक्षवाढीत वसंत मोरे यांचे फार मोठे योगदान आहे. मनसे पक्षाची जादू महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचविण्याकरिता जेवढा राज ठाकरेंचा वाटा आहे तितकाच वसंत मोरेंचा देखील. आजवर त्यांनी पक्षप्रमुख राज ठाकरेंचा आदेश कधीच मोडला नाही, आणि पक्षाकडून मिळालेल्या प्रत्येक जबाबदाऱ्या त्यांनी अगदी चोखपणे पार पाडल्या.

त्यांच्यातील एक विशेष बाब म्हणजे जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी ते काहीही करू शकतात. उदाहरण सांगायचे झाले तर कोरोना काळात वसंत मोरे हे नाव त्यांच्या कामगिरीमुळे राज्यात सर्वत्र पोहोचले होते. गरजूंना धान्य वाटप, हॉस्पिटलचे बिल कमी करणे, बेडची कमतरता असल्यामुळे बेड मिळवून देण. इतकेच नव्हे तर स्वखर्चाणे त्यांनी हॉस्पिटलची देखील उभारणी केली. त्यामुळे वसंत मोरे यांची ओळख सांगायची झाली तर ते स्वतःच्या जीवावर निवडून येणारे नेते आहेत.

त्यांनी केलेल्या समाजसेवेचं फळ त्यांना २०२१ साली मिळाल जेव्हा राज ठाकरेंनी त्यांना पुण्याचं शहराध्यक्ष पद दिल. आणि आतापर्यंत त्यांनी हे कर्तव्य अगदी जबाबदारीने पार पाडलं. मात्र अचानक वसंत मोरेंकडून पक्षाप्रती नाराजीचे सूर का येऊ लागले? तर याची सुरुवात झाली, जेव्हा राज ठाकरेंनी २०२२ च्या गुढीपाडव्याच्या सभेला मशिदींवरील भोंग्यांविरोधात आवाज उचलला आणि भोंगे नाही उतरवलेत तर हनुमान चालीसा लावून उत्तर देण्याची भाषा केली तेव्हा.

हा मुद्दा खर तर वसंत मोरे यांना पटला नव्हता. त्यामुळे स्थानिक पदाधिकारी आपल्याला डावलत असल्याचा आरोप देखील मध्यंतरी मोरे यांनी केला होता. त्यातच आता पुन्हा एकदा मोरे नाराज झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. या नाराजीबद्दल वसंत मोरेंना प्रश्न केला असता, “माझे कार्यकर्ते नाराज आहेत. शहरात मनसेच्या शाखा अध्यक्षांचा मेळावा झाला. या मेळाव्यात कोअर कमिटीचे सगळे सदस्य होते.

या मेळाव्या दरम्यान मंचावर असल्यामुळे बोलू द्यायला हवे होते, अशी भावना कार्यकर्त्यांची असल्याचे मोरे यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलतांना स्पष्ट केले. यातून वसंत मोरे विरुद्ध स्थानिक पदाधिकारी वाद सुरु झाला असल्याचे स्पष्ट पाहायला मिळत आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे याबद्दल काय भूमिका घेतील, आणि मोरेंची नाराजी कशी दूर करतील, हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button