ताज्या बातम्याट्रेंडिंग

फिफा विश्व कप २०२२ कडून संघांवर पैशांचा वर्षाव, पहा कोणाला किती प्राईज मनी मिळाली…

कतार मध्ये आयोजित फिफा विश्व कप चे फायनल गेल्या रविवारी पार पडले, यात अर्जेंटिना विरुद्ध फ्रांस असा सामना रंगला होता, आणि अखेर अर्जेंटिनाने विजेतेपद आपल्या नावी केले. (Money showered on teams from FIFA World Cup 2022, see who received how much prize money)

एक महिना चाललेल्या या टुर्नामेंटमध्ये ३६ संघांनी भाग घेतला होता, यातून अर्जेंटिना आणि फ्रांस या दोन टीम फायनलचे तिकीट स्वतःच्या नावावर करू शकल्या. आणि तब्बल ३६ वर्षानंतर अर्जेंटिनाने फ्रान्सचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ असा पराभव करत विश्वचशक पटकावले.

आता कोण फायनलमध्ये गेलं, कुणाचा पराभव झाला आणि कोण विजेता ठरलं हे तर सर्वांनाच माहित आहे, परंतु चर्चा होत आहे ती विजेत्या टीमला मिळालेल्या प्राईझ मनीची. विजेती टीमचं नाही तर अगदी अंतिम १६ पर्यन्त पोहोचणाऱ्या टीम्सला सुद्धा करोडोंची प्राईझ मनी मिळाली आहे.

जो आकडा ऐकून कदाचितच तुमचा विश्वास बसेल. तर आज यामध्ये आपण कुणाला किती प्राईज मनी मिळाली? आणि नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन असून सुद्धा फिफा कडे इतका पैसा येतो कुठून? हेच जाणून घेऊयात. १९७८ आणि १९८६ नंतर अर्जेंटिनाने तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आहे.

आता विश्वचषक जिकणार्या संघाला करोडोंची प्राईज मनी मिळते हे तर अनेकांना माहित असेल, मात्र केवळ विजेताच नाही तर उपविजेता संघांनाही बक्षिसे मिळतात. तुमचा विश्वास बसणार नाही, परंतु यंदा फिफाकडून ३६४१ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

ही रक्कम विजेत्या सोबतच इतर सहभागी संघांना बक्षीस म्हणून मिळणार आहे. आता कोणत्या संघाला किती प्राईज मनी मिळेल हेआपण बघुयात…तर यंदा विजेता संघ अर्जेंटिना ठरला आणि अर्जेंटिला ३१४ करोड रुपये प्राईज मनी मिळाली, उपविजेता ठरलेल्या फ्रान्सला २४८ करोड रुपये प्राईज मनी मिळाली.

तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या क्रोएशिआला २२३ करोड तर चौथ्या स्थानावर असणाऱ्या मोरोक्कोला २०६ करोड प्राईज मनी मिळाली. आता हे तर झाले टॉप चार संघ. याव्यतिरिक्त सहभागी संघांना देखील प्राईज मनीची मोठी रक्कम मिळाली.

जसे… जे संघ क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचले त्यांना १४० करोड रुपये प्रति संघ, जे संघ अंतिम १६ पर्यंत पोहोचले त्यांना १०७ करोड रुपये प्रति संघ आणि जे अगदी ग्रुप स्टेज पर्यंत पोहोचले त्यांनाही ७५ करोड रुपये प्रति संघ अशी प्राईज मनी मिळाली.
आता बघा ना इतकी प्राईज मनी प्रत्येक संघाला देणं म्हणजे पैसाही तितकाच हवा.

त्यामुळे यावर लोकांपुढे देखील अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत की फिफा तर एक नॉन प्रोफीट ऑर्गनायझेशन आहे, मग इतका पैसा येतो कुठून. तर फिफा चार माध्यमातून पैसा कमावतो. पहिले माध्यम म्हणजे टेलिव्हिजन राईट्स, सगळ्यात जास्त फिफाची कमाई इथूनच होते.

कारण टेलिव्हिजन राईट्स मिळवण्यासाठी देखील बोली लावली जाते. यंदा भारतात फिफा विश्वकप चे टेलिव्हिजन राईट्स स्पोर्ट्स १८ ने मिळवले होते. दुसरं आहे मार्केटिंग राईट्स, फिफा ला स्पॉन्सर, रिजनल आणि नॅशनल सपोर्ट मधून सुद्धा रेव्हेन्यू मिळतो. तिसरं आहे लाइसेंसिंग राईट्स, रॉयल्टी आणि ब्रँड लायसेन्सिंग मधून सुद्धा फिफाकडे रेव्हेन्यू येतो.

शेवटचे आहे तिकीटाची विक्री, यात तर त्यांची अरबोनची कमाई होते. फिफा विश्वकपच्या नॉकआउट मध्येच एका तिकीटाची किंमत १५ लाख इतकी होती, यावरून तुम्ही अंदाजा लावूच शकता. फुटबॉल हा जगभरात लोकप्रिय खेळ आहे, आणि प्रत्येक चार वर्षात एकदा या विश्वकपचे आयोजन केले जाते.

ज्याची तयारी जगातील प्रत्येक संघ करतो. यंदाच्या वर्षी तर मेसीच्या संघाने बाजी मारली, आता येणाऱ्या फिफा विश्वकपकडे फुटबॉल चाहत्यांचे लक्ष लागले आहे. कारण चार वर्षातून येणारा हा एक महिना केवळ फुटबॉल प्रेमींकरिता असतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button