ताज्या बातम्यामाहितीपूर्ण

दुधामधील भेसळ अश्या पद्धतीने अगदी सहज ओळखू शकता…

दुधाला पूर्णान्न समजले जाते. दुधात उच्चदर्जाची प्रथिने, कॅल्शियम, जीवनसत्व ड आणि ब असतात. सोबतच मॅग्नेशियम, अँटीऑक्सीडेंट, पोटॅशियम फॉस्फरस असतात त्याने आपलं शरीर निरोगी आणि मजबूत राहतं. त्यामुळे अनेक जण रोज न चुकता दुध पितात.

पण आपण पित असलेलं दुध भेसळयुक्त असेल तर? आपल्या आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होतात. त्यामुळे भेसळयुक्त दुध कसं ओळखायचं? दुधात काय मिसळलेलं असतं आणि नक्की काय दुष्परिणाम होतात हे सर्व जाणून घेऊया आजच्या लेखात. भेसळ ठरू शकते जीवघेणी:

दुधाच्या भेसळीचा पहिला प्रकार:

दुधाच्या मोजमापापेक्षा त्यात दुप्पट पाणी मिसळलं जातं. मिसळलं जाणारं पाणी जर शुद्ध नसेल तर ते दुध पिऊन कावीळ होण्याची शक्यता असते. महत्त्वाचं म्हणजे अशुद्ध पाण्याने दुधातील महत्त्वाचे घटक निघून जातात. त्यामुळे ते दुध पिऊनही आपल्याला काहीही फायदा होत नाही.

दुधाच्या भेसळीचा दुसरा प्रकार –

दुधात केल्या जाणाऱ्या दुसऱ्या प्रकारच्या भेसळीने आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो कारण यात दुध फेसाळलेलं दिसण्यासाठी डिटर्जंट पावडर, युरिया असे घातक पदार्थ टाकले जातात.

●दुध अनैसर्गिक पद्धतीने बनवलंही जातं –

हल्ली दुधापासून मिळणारा नफा बघता रासायनिक दुध बाजारात आणले जात आहे. जे शरीरासाठी अत्यंत घातक ठरते. दुधाला बनवण्यासाठी पाण्यात दुधाची पावडर, दुधाचा चिकटपणा किंवा स्निग्धता दिसण्यासाठी तेल आणि डिटर्जंट पावडर, शॅम्पूचा वापर केला जातो.

दुध शुभ्र दिसण्यासाठी पांढरा रंग वापरला जातो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुधाला चव आणण्यासाठी त्यात पिठी साखर किंवा ग्लुकोज पावडरचा वापर केला जातो.

●भेसळयुक्त दुधाने काय दुष्परिणाम होतात –

भेसळयुक्त दुधाने आपल्याला विषबाधा होऊ शकते. आपल्या शरीराची संपूर्ण कार्यप्रणाली बिघडवून आपल्याला गंभीर आजार होण्याची शकता उद्भवते. सतत भेसळयुक्त दुध प्यायल्याने आपल्याला कर्करोगही होऊ शकतो विशेष करुन वयस्कर लोकांना याचा अधिक त्रास होऊ शकतो.

गर्भवती महिलेने जर भेसळयुक्त दुधाचं सेवन केले तर तिच्या प्रकृतीवर तसंच गर्भावर परिणाम होऊ शकतो. मुल गर्भातच दगावले जाऊ शकते किंवा रोगी म्हणून जन्माला येऊ शकते. एका निरोगी व्यक्तीलाही हाडांच्या समस्या उद्भवू शकतात. पोटाच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.

● दुधात भेसळ आहे की नाही कसं ओळखायचं?

बनावट किंवा भेसळयुक्त दुध तापवल्यास त्याचा रंग बदलतो दुधाला पिवळसर रंग येतो. दुध तापवल्यामुळे त्याला घाण वासही येतो. त्यामुळे दुध घरी आणल्यानंतर ते कच्च पिऊ नये त्याला तापवून मगचं प्यावं.

दुध तापवून प्यायल्यानंतर जर दुधाची चव कडवट लागत असेल तर ते दुध नासलं वगैरे असे तर्क काढू नये ते दुध फेकून द्यावं.

कारण रासायनिक बदलांमुळे दुधात विषही तयार होऊ शकतं असं वैज्ञानिक सांगतात म्हणून दुध तापल्यानंतर संपुर्ण ग्लास भरुन दूध पिण्यापेक्षा आधी एका चमच्याने थोडं दुध पिऊन बघावं.

● दुधातली भेसळ ओळखण्यासाठी करा ‘हे’ घरगुती प्रयोग

दुधात पाणी मिसळलय का हे बघायचं असेल तर एका गडद रंगाच्या सपाट भांड्यावर किंवा प्लास्टिकच्या सपाट वस्तूंवर आपल्याला दुधांचे दोन तीन थेंब टाकायचे आहेत. जर दुधात पाणी जास्त मिसळलं असेल तर ते वेगळं होईल. या वरून दुधात पाणी जास्त आहे हे आपण ओळखू शकतो.

जे दुध शुद्ध असतं ते दाटसर असतं. त्या दुधाला बोट जरी लावलं तरी आपल्याला चिकटपणा जाणवतो. पण भेसळयुक्त दुधात असा चिकटपणा जाणवत नाही. त्याला मलई देखील येत नाही.

  • उत्तम दर्जाचे दुध कसे खरेदी करावे-

दुध खरेदी करताना ते कधीही एका प्रसिद्ध कंपनीचं घ्यावं. कारण त्यावर दुधाच्या शुद्धतेची माहिती दिलेली असते. सोबतच दुधाच्या पिशवीवरील टॅग किंवा मार्क आपल्या आरोग्याला कोणतीही इजा होणार नाही याची खात्री देतं. काही समस्या निर्माण झाल्या तर आपण कायदेशीररित्या कंपनीवर कारवाई करु शकतो.

दुधवाल्याकडून दुध घेत असू तर वर दिलेले दुधाच्या बनवटीचा, भेसळीचा फरक आपण ओळखायला हवा किंवा त्याच्याकडून दुध घेणं टाळावं.

कारण त्या दुधात शुद्धतेची खात्री आपल्याला मिळत नाही. काही समस्या उद्भवल्या तर तो व्यक्ती फरार होऊ शकतो म्हणून शक्यतो खुलं दुध विकत घेणं टाळावं.

तर या आहेत दूधाविषयीच्या लक्षात घेण्यासारख्या गोष्टी. तुम्हाला हा लेख कसा वाटला हे नक्की सांगा आणि आपलं कुटुंबं तसेच मित्रपरिवारातही हा लेख पाठवायला विसरु नका.

Harsh Desai

I am Editor of Batmi.net. I am Capable to run Online Business and Now working on Batmi.net as Author. Email :[email protected]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button