बंद लिफ्टमध्ये अडकल्या ३चिमुकल्या, या व्हिडीओवरून पालकांनी वेळीच सावध व्हायला हवे…
प्रत्येक इमारतीमध्ये लिफ्ट असते. याचा वापर प्रत्येक जण करत असतात, का तर वेळ आणि एनर्जी वाचावं म्हणून हो ना… पण लिफ्ट जितकी उपयोगी ठरू शकते तितकीच ती धोकादायक सुद्धा असू शकते हे सुद्धा तितकेच खरे. (Parents should be alert after watching this video of 3 children stuck in a closed lift)
वयस्कर असो या छोटी मुले याचा पुरेपूर वापर करत असतात. पण जर लिफ्ट बंद पडली आणि लिफ्ट मध्ये अडकलो तर… विचार करून सुद्धा भीती वाटत ना, या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ मध्ये अशीच एक लिफ्ट बंद पडली.
त्यामध्ये चक्क तीन छोट्या मुली अडकल्या. हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ गाझियाबाद मधला असून . या व्हायरल व्हिडीओ मध्ये तीन लहान मुली अडकल्याचे दिसत आहे.
तांत्रिक बिघाडामुळे लिफ्ट अचानक बंद पडल्याने त्या मुली घाबरल्या असून सुद्धा त्या एकमेकींना धीर देत असल्याचे चित्र या व्हिडीओ मध्ये पाहायला मिळत आहे.
या मुलींचे अश्या परिस्थितीमध्ये सुद्धा एकमेकींना न घाबरता धीर देण्याचे आणि तिथून बाहेर पडण्याचे प्रयत्न पाहून नेटकरी त्यांचे कौतुक करत आहे.
हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी पालकांना याबाबत सावध होण्याचे आवाहन केले आहे. तर भविष्यात अशी परिस्थिती उद्भवल्यास त्यातून काही गंभीर परिणाम होऊ नयेत.
यासाठी पालकांनी काळजी घेण्याच आणि लहान मुलांना लिफ्टमध्ये एकटे न पाठवण्याचा सल्ला नेटकऱ्यांनी दिला आहे. तर काहींनी लिफ्टमध्ये लिफ्टमॅन असणे आवश्यक आहे, अशी मागणी केली आहे.