गुणपत्रक हेच सर्वस्व नाही! एकदा नक्की वाचा…
मार्कशीट मध्ये आलेली मार्कांची सूज म्हणजे गुणवत्ता नव्हे. तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास म्हणजे गुणवत्ता होय.
गुणपत्रक हेच विद्यार्थ्यांचे सर्वस्व नाही हे वाचून नक्कीच तुम्ही विचारात पडले असणार. तुमच्या मनात विचार आला असेल की गुण पत्र का शिवाय कोठेही प्रवेश नाही, कुठेही नोकरी नाही मग ते गुणपत्रक आपले सर्वस्व कसे नाही.
एका शाळेत तीन विद्यार्थी शिकत होते. त्यातील एक विद्यार्थ्याला आई वडिलांनी सांगितले की तू खूप अभ्यास कर तुला इंजिनिअर बनायचे आहे. त्याने पण सांगितल्याप्रमाणे मन लावून अभ्यास करायला सुरुवात केली.
कधी कुठल्या स्पर्धेत भाग नाही घेतला, कधी स्नेहसंमेलनात (गॅदरिंग)मध्ये त्याचा सहभाग नाही. खुप अभ्यास करुन 90% पेक्षा जास्त गुण मिळविले आणि पुढे जाऊन तो इंजिनियर बनला. त्याच्याच जिल्हा परिषद मध्ये इंजिनियर म्हणून कामाला लागला.
त्याच शाळेत शिकणारा दुसरा विद्यार्थी जो मध्यम गुणवत्तेने पास होणारा. पुढे जाऊन त्याने कला शाखेत प्रवेश घेतला. त्याचे मैदानी खेळांमध्ये चांगले प्रवीण होते.
सोबतच त्याने स्पर्धा परीक्षेचा मन लावून अभ्यास केला. पुढे जाऊन तो एमपीएससी परीक्षा पास झाला. त्यात जिल्हा परिषदेवर तो मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आला.
शेवटच्या बाकावर बसणाऱ्या मुलगा जो अभ्यासात या दोघांच्या कुठे जवळपास पण नव्हता पण विद्यार्थ्यांना सदैव व मदत करणे. त्यांच्या लहान-मोठ्या अडचणी अगदी स्वतः पुढाकार घेऊन सोडवणे.
कॉलेज गॅदरींग मध्ये अगदी सूत्रसंचालना पासून तर मैदानी स्पर्धेतील संघ नियोजना पर्यंत प्रत्येक गोष्टीत तो अग्रेसर होता.
कॉलेज जीवनात पुढे जाऊन त्यांनी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून दोन वर्ष पद भूषवले. पुढे जाऊन तो जिल्हा परिषदेवर निवडून गेला. आणि त्यात जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा जिल्हा परिषद अध्यक्ष बनला.
आता सर्वात हुशार असणारा मुलगा ज्याचे कुठलेही काम कार्यकारी अधिकाऱ्याच्या सही शिवाय होत नव्हते. शेवटच्या बाकावर बसणाऱ्या मुलगा अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली. तो ऑफिसला आला तर अगदी या दोघांनाही उठून त्याला नमस्कार करावे लागत असे.
मग याचा अर्थ असा मुळीच नाही की आपण अभ्यास केला नाही किंवा मार्क मी जरी पडले तरी चालेल. जे मार्क मिळाले त्यानंतर रडत बसण्यापेक्षा पुढील संधी शोधायला हवी.
प्रत्येक व्यक्तीमध्ये एक वेगळी टॅलेंट असते ते आपल्याला ओळखता आले पाहिजे. तुम्ही जीवनात यशस्वी झालेल्या कुठल्याही व्यक्तीचे चरित्र उघडून बघा तुमच्या लक्षात येईल. ज्या व्यक्तींना आपल्या स्वतःतील गुण ओळखता आले तीच व्यक्ती जीवनात यशस्वी झाले.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा शिक्षणाविषयी तुम्ही सर्वज्ञात आहे. दहावी नापास असणारी सचिन तेंडुलकर भारतरत्न मिळविणारे पहिले खेळाडू आहे.
आजही दहावीच्या मुलांना त्यांच्यावर निबंध दहा ते पंधरा मार्कासाठी येत असतो. म्हणजे फक्त मार्क हेच आपल्याला मोठे बनवत नसतात. तर आपल्या मध्ये असणारा सुप्त गुण आपल्याला ओळखता आला पाहिजे.
असे खुप सारे उदाहरण तुम्हाला बघायला मिळतील. स्वतः मध्ये असणारे गुण ओळखून त्याला वृद्धिंगत करण्यासाठी मेहनत केली, त्याच्यावर सातत्यपूर्वक काम केले आणि फक्त त्या गुणाच्या सहाय्याने असते त्यांच्या जीवनात यशाच्या उंच शिखरावर जाऊन पोचले आहे.
तरी सध्या संपूर्ण वातावरण हे निकालांचे चालू आहे. मुलं हे गुण पत्रकात मिळणारे गुण हीच त्यांचे भविष्य समजून बसत आहेत. परंतु त्यांना आज मिळालेले गुण लगेच उद्या नोकरी देणार नाही किंवा लगेच त्यांच्या भविष्याची सर्व दरवाजे बंद करणार नाहीत.
याउलट चांगल्या गुणांनी पास झालेले विद्यार्थी त्यांनी पण आपले स्वतःतील गुण ओळखून त्यावर ती काम केले पाहिजे. आणि ज्यांना परीक्षेत थोडेफार कमी गुण मिळाले.
त्यांनी भविष्यातील संधी, आपले आवडते क्षेत्र, आपली त्यातील निपुणता ओळखून त्यात काम केले तर ते आयुष्यात खूप मोठे यश संपादन करतील.