ताज्या बातम्याट्रेंडिंग

विद्यार्थ्यांसमोर शिक्षिकेचा भोजपुरी गाण्यावर डान्स, नेटकरी करत आहेत ट्रोल…

सोशल मीडियावर रोज एक वेगवेगळा आणि नवा ट्रेंड येत असतो. इंस्टाग्राम वर भन्नाट व्हिडीओ पोस्ट केले जात असतात. काही दिवसांपूर्वी मेरा दिल ये पुकारे आजा.. वरील एका पाकिस्तानी मुलीचा व्हिडीओ प्रचंड सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. (Teacher dances on Bhojpuri song in front of students, users are trolling her)

नेटकऱ्यांनी याच गाण्यावर अनेक व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट आणि शेअर केले होते. आता एक भोजपुरी गाणे पतली कमरिया मोर हाय. चे रिमिक्स गाणे बनवून त्यावर नेटकरी व्हिडीओज बनवून सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत.

यात शिक्षिकेचा सुद्धा समावेश आहे. @गुलझार_साहब या ट्विटर हँड्लर ने एका शिक्षिकेने विद्यार्थ्यांसमोर पतली कमरिया मोर हाय या गाण्यावर केलेला डान्स चा व्हिडीओ ‘लहानपणी असे शिक्षक का मिळाले नाहीत’ असे कॅप्शन देऊन हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

आतापर्यंत या व्हिडिओला ३ लाखापेक्षा जास्त नेटकऱ्यांनी बघितल आहे. आणि ८ हजाराहून जास्त लाईक्स मिळाले आहेत . आणि यावर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत.

प्रत्येकजण इंस्टाग्रामवर व्हिडीओ बनवून पोस्ट करत असतात. मग ते विद्यार्थी असो अथवा शिक्षक. काही नेटकऱ्यांनी या डान्सच्या पोस्ट वर योग्य नसल्याचे सांगितले आहे. मुलांना शिकायला लावा, हाय हाय नाही… अशी कमेंट सुद्धा एका नेटकऱ्यानी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button