ताज्या बातम्याट्रेंडिंग

म्हशींनी सिंहाला पायदळी तुडवलं, ‘हे’ थरारक दृश्य झाले कॅमेऱ्यात कैद…

सोशल मीडियावर कधी कधी इतके धक्कादायक आणि भीतीदायक व्हिडीओज व्हयरल होतात की यावर आपलाही विश्वास बसत नाही. सर्वात जास्त या व्हायरल व्हिडिओमध्ये कुणाचा समावेश असेल तर तो प्राण्यांच्या व्हिडीओजचा. (Buffalo tramples lion, ‘this’ thrilling scene caught on camera)

आता प्रत्येकाला माहित आहे की सिंह हा जंगलाचा राजा आहे आणि कुठल्याही प्राण्याला त्याला हरविणे अशक्य आहे, मात्र सध्या जो व्हिडीओ व्हायरल होत आहे, तो व्हिडीओ बघून तुमचाही विश्वास बसणार नाही. हा व्हिडीओ एकीची ताकद दाखवणारा आहे.

या व्हिडिओमध्ये एका सिंहाला म्हशींच्या कळपाने चांगलीच अद्दल घडवली आणि सिंहाला अगदी पायदळी तुडवल्याचे दिसत आहे. केलब्रीक नावाच्या फोटोग्राफरने ही अशक्य आणि अविश्वसनीय लढाई आपल्या कॅमेऱ्यात टिपली आहे.

सिंह वयस्कर असल्यामुळे त्याची ताकद देखील कमी आहे, त्यामुळे म्हशींनी देखील या संधीचा फायदा घेतला आहे. दुर्दैवाने या वयस्कर सिंहाचे घटनेच्या तीन दिवसानंतर निधन झाले आहे.

या व्हिडिओला आतापर्यंत १.५ मिलियनपेक्षाही जास्त व्युज मिळाले आहेत. हा व्हिडीओ नेटकर्यांना अगदी थक्क करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button