…आणि म्हणून भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या तब्बल १४ वर्षानंतर गोवा स्वतंत्र झाला…
जगभरात पर्यटकांना आपल्या कडे आकर्षित करणारं राज्य म्हणजेच गोवा. कुठेही हॉलिडे प्लॅन करायचं म्हटलं तर,पटकन गोव्याचं नाव डोक्यात येत. पण तुम्हला ऐकून आश्चर्य वाटेल की, भारताला स्वतंत्र मिळाल्याच्या १४ वर्षा नंतर,गोवा स्वतंत्र झाला. (…and so Goa became independent almost 14 years after India’s independence)
मग भारताचा एक भाग झाला. तर बातमी व्हिडीओज मध्ये आपण गोवा मुक्त झाल्यापासून संपूर्ण भारताचे राज्य होण्यास १४ वर्षांचा कालावधी का लागला..? आणि या काळात गोवा कोणाच्या अधिपत्याखाली होता ? हेच जाणून घेणार आहोत.
गोवा त्याच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यासाठी आणि त्याच्या वास्तुकलेसाठी जगभर प्रसिद्ध आहे. गोवा ही १९६१ पूर्वी पोर्तुगालांची वसाहत होती. पोर्तुगीजांनी गोव्यावर सुमारे ४५० वर्षे राज्य केले.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत जरी स्वतंत्र झाला असेल, पण गोवा अजूनही स्वातंत्र्यासाठी संघर्ष करत होता. गोव्याच्या स्वातंत्र्याची चळवळ तेव्हा सुरू झाली,जेव्हा गोव्याच्या राष्ट्रवाद्यांनी एकत्र येऊन १९२८ मध्ये मुंबईत, ‘गोवा काँग्रेस कमिटी’ स्थापन केली.
या समितीचे अध्यक्ष डॉ.टी.बी.कुन्हा होते. त्यांना गोवा राष्ट्रवादाचे जनक मानले जाते. पण गोव्याच्या या चळवळीला यश मिळू शकले नाही.
देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळी ब्रिटीशांशी बोलणी सुरू असताना, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी गोवा भारताच्या स्वाधीन करण्याची मागणी ब्रिटिशांकडे केली.
त्याचवेळी पोर्तुगालनेही गोव्यावर आपला दावा ठोकला. इंग्रजांनी भारताचे ऐकले नाही आणि गोवा पोर्तुगीजांना हस्तांतरित करण्यात आला. भारताच्या स्वातंत्र्यानंतर, जेव्हा पोर्तुगीजांना गोवा भारताच्या स्वाधीन करण्यास सांगितले गेले तेव्हा त्यांनी नकार दिला.
परंतु भारताने १९ डिसेंबर १९६१ रोजी ऑपरेशन विजयच्या माध्यमातून गोवा मुक्त केला .आणि त्यानंतर दमण आणि दीव चे विलीनीकरण करून केंद्रशासित प्रदेश बनवला.
जर आपण गोव्याच्या सुरुवातीच्या राजकीय इतिहासावर नजर टाकली तर, तो सातवाहन साम्राज्याचा एक भाग होता. त्यानंतर कदंब, मलखेड़ राष्ट्रकूट, चालुक्य आणि सिलाहार या राजघराण्याचे इथे राज्य होते.
१४ व्या शतकाच्या शेवटी यादवांचे राज्य संपले,आणि दिल्लीतील खिलजी घराणे येथे राज्य करू लागले. असं म्हटल्या जात की, वास्को द गामा आणि त्यानंतर अनेक पोर्तुगीज प्रवासी १४९८ मध्ये भारतात सागरी मार्ग शोधत असताना भारतात पोहोचले.
१५१० मध्ये अल्फोन्सो डी अल्बुकर्कने, विजयनगर सम्राटाच्या मदतीने गोव्यावर आक्रमण केले आणि ते ताब्यात घेतले. १५ ऑगस्ट १९४८ रोजी भारत स्वतंत्र झाल्यानंतरही गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिला.
पण, पोर्तुगीज राज्यकर्ते गोव्याच्या आकांक्षा पूर्ण करू शकले नाहीत. भारत सरकारच्या अनेक विनंत्या करूनही पोर्तुगीजांनी ते मान्य केले नाही, तेव्हा ऑपरेशन विजय सुरू करण्यात आले.
शेवटी १९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा मुक्त झाला. दमण आणि दीव मध्ये यांचे विलिनीकरण करून, गोव्याला केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आला. पण नंतर ३० मे १९८७ रोजी गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला.
दमण आणि दीव हे स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आले.तेव्हापासून, ३० मे हा गोवा मुक्ती दिन म्हणजेच स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. स्थापनेनंतर पणजीला गोव्याच्या राजधानीचा दर्जा आणि कोकणी भाषेला राजभाषा म्हणून मान्यता देण्यात आली.