ताज्या बातम्याट्रेंडिंग

भारतात असेही एक गाव, ज्या गावात बायको भाड्याने दिली जाते…

वेळेनुसार काळ बदलत जातो असे आपण म्हणतो, मात्र बदलेल्या काळानुसार लोक बदलतात का? आपला भारत देश हा रूढी परंपरांशी अगदी घट्ट बांधला गेला आहे. (There is even a village in India where wives are rented out)

आज २१ व्या शतकात येऊन सुद्धा भारत पूर्णतः आधुनिक विचारांची स्वीकृती करू शकला नाही. आणि यामुळेच अनेक जुन्या प्रथा परंपरा आज देखील भारतात पाहायला मिळतातच. मध्यप्रदेश आणि गुजरात सारख्या राज्यात आजही पुरातन प्रथा पाळल्या जातात आणि इथे महिलांना पत्नी म्हणून भाड्याने दिले जाते?

हे ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल, मात्र हे खर आहे. आता २१ व्या शतकामध्ये सुद्धा असं कस शक्य आहे? आणि ते हि गुजरातसारख्या विकसनशील राज्यामध्ये अशी परंपरा कशी असू शकते? यामागीलच सत्य जाणून घेऊयात गुजरात एक विकसनशील राज्य आहे.

गुजरात चं नाव घेताच आपल्यासमोर उभं राहत ते गुजरात मॉडेल, तिथल्या मल्टिनॅशनल कंपन्या, व्यापार, उद्योग, पर्यटन, सर्वात महत्वाचं तर स्टॅचू ऑफ युनिटी. यासोबतच तिथल्या लोकांचं स्टँडर्ड ऑफ लिविंग, महिलांचं सौरक्षण अश्या कित्येक गोष्टी इतर राज्यांपुढे गुजरातने विकास मॉडेल म्हणून पुढे केल्या. पण याच विकसनशील आणि प्रगतिशील असणाऱ्या गुजरातमध्ये अशीही काही गावे आहेत.

जिथे चक्क बायको भाड्याने देण्याची घृणा स्पद प्रथा पाळली जाते. मुख्यतः गुजरातमध्येच याचे प्रमाण अधिक असल्याचे लक्षात येते. या राज्यातील बायको आणि अविवाहित मुलगी दलालांमार्फत लग्नासाठी भाड्याने दिली जाते. श्रीमंत व्यक्तींसोबत त्यांना लग्न करून राहावं लागतं.

मात्र हे लग्नसारखं लग्न नसत तर याचीही ठराविक काल मर्यादा असते आणि त्याकरीता १० रुपयांपासून ते १०० रुपयांपर्यंतच्या स्टँप पेपरवर याचा करार केला जातो…आहे ना धक्कादायक? विशेष म्हणजे या प्रकारणामध्ये पोलिस सुद्धा हस्तक्षेप करू शकत नाहीत. कारण, महिलांची याबाबत कुठलीही तक्रार नसते.

या प्रथेला तिथे राहणारे लोक ‘धादिछा प्रथा’ असं म्हणतात. धादिछा प्रथा ही मध्यप्रदेशातल्या शिवपुरी या जिल्ह्यातून सुरू झाली असे सांगितले जाते. या प्रथेमध्ये पुरुष महिलेला पत्नी म्हणून भाडेतत्त्वावर घेतो. केवळ स्टँप पेपरवर सही करून हा करार केला जातो. याची कालमर्यादा संपताच पुन्हा त्या महिलेचा दुसऱ्या पुरुषासोबत करार करून दिला जातो.

या करारादरम्यान पैसे जितके जास्त तितका जास्तवेळ ती महिला तिच्या मालकासोबत म्हणजे भाड्याच्या पती सोबत राहते. अनेकदा हा गैरव्यवहार पोलिसांसमोर देखील होतो. पण महिलेलाच मान्य असेल तर पोलीस तरी काय करतील. महिलांच्या या सौद्यामुळे राजकोट, मेहसाणा, पाटन आणि गांधी नगर येथील गरीब कुटुंबासोबतच दलालांचीही भरभराट होत आहे.

यात स्थानिक भाषेत दलालांना वछेटिया असे म्हणतात. ‘वासवा’ नावाच्या भटक्या विमुक्त जातींमधील महिलांचा सौदा इथे केला जातो. नेत्रंग, डेढीपाडा, वालिया, साकबारा, जारपिपला आणि जघाडिया येथील भटकेविमुक्त महिलांचा आणि मुलींचा, दलालांसोबत सौदा करून त्यांना बासणकंठा, मेहसाणा आणि अहमदाबाद सारख्या जिल्ह्यांत भाड्याने पाठवले जाते.

पटेल व ठाकूर आडनाव असलेल्या व्यक्तींकडून तर त्यांची चांगलीच कमाई होते. या धंद्यामार्फत दलाल एका महिलेचे ६५ हजार ते ७० हजार रुपये कमवत असतात. ज्या कुटुंबातील मुलगी आहे, त्यांना महिना १५ ते २० हजार देत असतात. कुटुंबाची गरज आणि गरीबी लक्षात घेता, दलाल तेथील मुलींचा भाव ५०० रुपये ते ६० हजार रुपयांपर्यंत आकारतो.

हा व्यवहार अगदी कुठलीही भीती न बाळगता खुल्लम खुलला केला जातो. आता भाडेतत्तवाचा हा बाजार आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन पोहोचला आहे. हि एक गंभीर बाब आहे. गुजरात सारख्या विकसनशील राज्यात हा व्यापार कसा सुरु आहे? हा प्रश्न गुलदस्त्यातच आहे, मात्र प्रशासनाणे याविरोधात ठोस पाऊले उचलायला हवीत.

काळानुसार प्रथेत जरी फरक पडत असला, तरी आजही या भागांतील महिला प्रथा आणि परंपरांनी वेढलेल्या आहेत. काही ठिकाणी तर कायद्याच्या भितीने लपून का होईना या प्रथा सुरूच आहेत. खरं तर या प्रथांवर पूर्णविराम लागण्याची गरज आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button