ताज्या बातम्याट्रेंडिंग

ऑनलाईन शॉपिंग करत आहात? ‘या’ गोष्टींची काळजी नक्की घ्या अथवा होऊ शकते फसवणूक…

तुम्ही बाजारात जाऊन शॉपिंग करण्यापेक्षा ऑनलाईन शॉपिंग करायला प्राधान्य देत असाल तर, काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्वाचे आहे. असे न केल्यास तुमचे सुद्धा मोठे नुकसान होऊ शकते. ऑनलाइन शॉपिंग करताना लोक अनेकदा काही महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. (Shopping Online? Be sure to take care of ‘these’ things or you may get cheated)

यामुळे तुमचा पैसा तर वाया जातोच, पण तुम्हाला तुमची आवडती वस्तूही मिळू शकत नाही. ऑनलाइन शॉपिंग करताना लोक अनेकदा महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. आणि त्याचे मोठे नुकसान होते. तर ऑनलाईन शॉपिंग करताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी? कुठल्या चुका केल्यात तर तुम्ही फसु शकता? आणि तुमची फसवेगिरी होऊ नये यासाठीच आज आपण या विषयावर चर्चा करणारा आहोत.

भारतात ऑनलाईन खरेदीचा ट्रेंड बराच वाढलाय .अमेझॉन फ्लिपकार्ट आणि अन्य वेगवेगळ्या वेबसाईट कमी किमतीत ग्राहकांना अनेक उत्तम प्रोडक्ट देण्यासाठी सज्ज असतात. अमेझॉन वर नेहमीच ग्राहकांना ऑफर सोबतच उपयोगाच्या वस्तू कमी दारात खरेदी करण्याची संधी असते. यासोबतच फ्लिपकार्टवर देखील अनेकदा सेलचे आयोजन करण्यात येते. अश्या अनेक वेगवेगळ्या वेबसाईट आहेत.ज्यावर अशे सेल सुरु असतात .

वस्तू कमी दारात उपलब्ध असल्याने अनेकदा ग्राहक कोणतीही वस्तू न तपासताच खरेदी करत असतात. आणि वस्तूवर उपलब्ध असलेल्या गॅरेंटी आणि वॉरंटीकडे दुर्लक्ष करतात. असे केल्यास तुमचे नुकसान होऊ शकते. विशेषतः इलेक्ट्रॉनिक वस्तू ऑर्डर करत असताना त्यावरील वॉरंटीबाबत जाणून घेणे खूप महत्वाचे असते. प्रोडक्टला रिटर्न करण्याबाबत, कॅश ऑन डिलिव्हरीबाबत देखील सविस्तर जाणून घेणे कधीही चांगलेच .

जेणेकरून, तुम्हाला एखादी वस्तू न आवडल्यास परत देखील तुम्हाला करता येऊ शकते आणि नुकसान होण्याची शक्यता सुद्धा कमी असते.. ऑनलाइन खरेदी करताना सर्वात महत्वाची आणि अनेकदा दुर्लक्षित होणारी गोष्ट म्हणजे सार्वजनिक वाय-फायचा वापर करणे. बँक खाते सुरक्षित ठेवायचे असेल तर, तुम्ही सार्वजनिक वाय-फाय वापरू नका, हे महत्त्वाचे आहे.

बर्‍याच वेळा लोक सायबर कॅफे किंवा रेस्टॉरंट सारख्या सार्वजनिक ठिकाणी उपस्थित राहून केवळ सार्वजनिक वाय फाय द्वारे ऑनलाइन खरेदी करतात. जे अजिबात सुरक्षित नसते कारण अशा परिस्थितीत त्यांची बँक आणि त्याचे तपशील हॅकर्स सहजपणे हॅक करू शकतात. ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांचे प्रमाण आता पूर्वीपेक्षा अधिक वाढले आहे.

ऑफलाईन सामान खरेदी करण्यापेक्षा लोक वेळ वाचावा म्हणून ऑनलाईन खरेदी करणे पसंत करतात. ऑफर असल्यामुळे यावर सेव्हिंग देखील खूप होते. ऑनलाइन शॉपिंगमध्ये, काही वेळा सवलत ताबडतोब उपलब्ध होते. तर, काही वेळा काही दिवस किंवा काही महिन्यांनंतर कॅश बॅकच्या स्वरूपात येते. त्यामुळे याबद्दल आधीच माहिती घ्या.

ऑफर कोड असल्यास, तो वापरा. तुम्हाला कोणत्या बँक किंवा कार्डने अतिरिक्त सवलत मिळत असेल तर ते तपासा आणि त्याचा सुद्धा वापर करा. ऑनलाइन वस्तू खरेदी करताना नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचायला कधीही विसरू नका. बर्‍याचवेळा, मर्यादित ऑफर पाहून, ग्राहक घाईत वस्तू खरेदी करतात. आणि डिलिव्हरी शुल्क किंवा कोणतेही छुपे शुल्क पाहत नाहीत.

त्यामुळे तुम्हाला वस्तूसाठी बजेटपेक्षा जास्त पैसे मोजावे लागू शकतात. कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय कधीही चांगला असतो. इतकंच नाही तर डिलिव्हरी बॉयसमोर तुम्ही तुमचं पार्सल उघडलं तर फारच चांगल. ऑनलाइन पेमेंट करताना कधीही तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड डिटेल्स सेव्ह करू नका.

अनेक वेळा साईटवर कार्ड डिटेल्स भरताना सेव्ह कार्ड डिटेल्सचा पर्याय येतो आणि त्यावर टिकमार्क असतो. लोक ओके बटण क्लिक करतात. याकडे दुर्लक्ष करणं हे अजिबात सुरक्षित नाही. जर तुम्ही अमेझॉन आणि फ्लिपकार्ट वरून खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला कदाचित माहित नसेल की, या साइट्सद्वारे त्यांच्या वस्तू विकणारे विक्रेते वेगवेगळे आहेत.

त्यामुळे खरेदी करताना काळजी घेणे आवश्यक आहे. कारण, अनेक विक्रेते जास्त सवलत दाखवून चुकीचे सामान पाठवतात. म्हणूनच, जर तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी करत असाल तर सर्वप्रथम विक्रेत्याकडे पहा आणि त्यांचे रेटिंग देखील पहा. रेटिंग योग्य असेल तरच खरेदी करा, अन्यथा करू नका.

अनेकदा लोक स्वस्त वस्तू आणि ऑफर्स पाहून अनोळख्या साइटवरूनही खरेदी करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. बहुतेक अज्ञात साइट सुरक्षित नसतात. येथे खरेदी केल्याने तुमचे खाते हॅक होण्याची शक्यता असते. आणि तुम्ही सायबर फसवणुकीचे बळी देखील होऊ शकता. म्हणून, ऑनलाइन खरेदीसाठी विश्वसनीय आणि सुप्रसिद्ध साइट निवडणे योग्य असते.

ऑनलाइन खरेदी करत असतांना काही लोक नकळत एचटीटीपीएस आणि एचटीटीपी मधील फरक लक्षात घेण्यास विसरतात. एचटीटीपीएस साइटवर ‘एस’ सुरक्षा चिन्ह म्हणून असते. अशा परिस्थितीत एचटीटीपी साइटऐवजी एचटीटीपीएस साइटवरून खरेदी करा. याशिवाय खरेदी करत असताना दुकानदाराचा पत्ता, फोन नंबर आणि ईमेल पत्ता तपासण्याची खात्री करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button