ताज्या बातम्याट्रेंडिंग
पाच टवाळखोरांचा एकाच बाईक वरून प्रवास, पोलिसांनी घडवली चांगलीच अद्दल…
अनेक प्रकारचे अतरंगी बाईक चालवून आणि स्टंटबाजी करून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतच असतात. (Five refugees who were traveling on the same bike, were caught by the police…)
असाच एक अतरंगी बाईक स्टंट करून वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पण याच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ मुळे त्यांची फजिती सुद्धा झाली आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओ मध्ये मुरादाबादच्या मुख्य बाजारपेठेत स्टंटबाजी करणाऱ्या पाच तरुणांना पोलिसांनी अटक केली.
दोन दिवसांपूर्वी शहरातील कटरा मार्केटमध्ये पाच तरुण एकाच दुचाकीवर बसून स्टंट करताना दिसले होते, त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
या व्हिडिओमध्ये जिल्ह्यातील एका गजबजलेल्या भागात पाच तरुण एकाच दुचाकीवर हिरोपंती करताना दिसले. स्टंट करणाऱ्या तरुणांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
सध्या मुरादाबाद पोलिसांनी स्टंट करणाऱ्यांना पकडून त्यांच्या बाईक वर चालान देखील लावलं आहेत.