इतिहासताज्या बातम्या

औरंगजेबासारखेच क्रूरकर्मा होते हे ‘तीन’ शासक!

औरंगजेब सध्या काही लोकांच्या आस्थेचे स्थान झाला असला तरी इतिहासात त्याच्या क्रूरपणाचे दाखले आजही वाचता येतात. केवळ हिंदूंवर नाही तर ह्या मुगल बादशाह औरंगजेबाने मुसलमानांवर देखील अन्याय केला. ह्याने क्रूरतेची परिसीमा गाठली म्हणूनच आपल्याला औरंगजेब लक्षात राहतो. पण भारतात याच्यासारखे आणखीही शासक झाले आहेत. आजच्या लेखात आपण अशाच काही क्रूर कर्मा असणाऱ्या शासकांबद्दल जाणून घेणार आहोत.

१) महंमद बिन कासीम :

भारतावर स्वारी करणारा सर्वात पहिला मुसलमान आक्रमक हाच होता. महंमद बिन कासीमला त्याच्या काकाने सिंध भूमीवर पाठवले होते. त्यांच्या लोकांची जहाज सिंध मधील लुटारूंनी लुटली होती आणि तरीही सिंधच्या राजाने न्याय केला नव्हता असे ह्या कासीमचे म्हणणे होते.

ह्याचा बदला घ्यायला तो सिंधमध्ये आला होता. सिंध भूमीवर पाऊल ठेवताच ह्याने सर्वप्रथम महादेवाचे अतिप्राचीन मंदिर फोडले. मंदिरावरचे ध्वज त्याने फाडले. कळस वितळवून त्याची नाणी पाडली. मंदिरातील देवीदेवतांच्या मूर्ती फोडल्या. धर्माला तर त्रास दिलाच पण सोबतच सामान्य जनतेला देखील भरडून काढले. स्त्रियांची अब्रू लुटली.

अनेकांना गुलाम म्हणून धरले त्यांना इतर देशात विकले. जे राजे शरण आले त्यांना देखील ह्याने मारले. शरण न येणाऱ्यांचा तर त्याने वंश बुडवला. अनेकांची मस्तके ह्या महंमद बिन कासीमने छाटली. असा हा क्रूर महंमद बिन कासीम भारतासाठी अत्यंत अन्यायकारी ठरला.

२) महंमद गझनी :

अफगाणिस्तान मधून आलेला हा महंमद गझनी अत्यंत क्रूर होता. जनतेला छळणे त्याचा छंद होता. ह्याचे पूर्ण नाव उद्दौला अब्दुल कासिम महमूद इब्न सबुक्तगीन असे होते. भारतावर ह्याने सतरा ते अठरा वेळेस स्वारी केली होती. नेहमी काहींना काही लूट तो अफगाणिस्तानला घेऊन जायचा. भारतात ह्याची ओळख ‘आक्रमणकारी’ अशीच होती. तेच अफगाणिस्तनात त्याला लोक राजा समजायचे.

नंतरच्या काळात ह्या महंमद गझनीने बुंदेलखंड, किरात, लोहकोट, ग्वाल्हेर, कालिंजर लोदोर्ग (जैसलमेर), चिकलोदर (गुजरात) सारखे भाग जिंकले. तिथे देखील मोठी लूट त्याने केली. रस्त्यातील स्त्रियांना घोड्यावर टाकून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले.

सैन्य यायचे आणि उभ्या पिकाची नासधूस करायचे. सर्वत्र स्मशानासारखे वातावरण निर्माण व्हायचे. ह्याच महंमद गझनीने सोमनाथाचे मंदिर तोडले होते. आतला सोमनाथ फोडून भंग केला. असा हा क्रूर कर्मा महंमद गझनी देखील भारतासाठी घातक ठरला.

३) अल्लाउद्दीन खिलजी :

अल्लाउद्दीन खिलजीचे नाव इतिहासात औरंगजेबाप्रमाणेच घेतले जाते. कुप्रसिद्ध असणारा हा बादशाह अत्यंत क्रूर होता. जे त्याला हवे तो ते मिळवायचाच. औरंगजेबाप्रमाणे त्याच्या डोक्यात देखील धर्मांधतेचे वेड गेले होते. इस्लामच्या रक्षणासाठी त्याने हे सारे केले. आया बहिणींच्या अब्रू लुटून, मंदिरे पाडून, लोकांना नागवून व बाटवून कोणताच धर्म टिकत नसतो.

ना त्याचा प्रचार होत असतो. ह्या अल्लाउद्दीनमुळे चितोडगडावर राणी पद्मिनीने जोहर केले होते. तसेच ह्याच अल्लाउद्दीनने महाराष्ट्रात इस्लामचा पहिला झेंडा फडकवला होता. देवगिरीचे तख्त उध्वस्त करून ह्याने यादवांना संपवले. कपट करून केवळ जिंकायचे हेच त्याचे तत्व होते. सामान्य जनतेतील लोकांची मुंडकी मारून त्याचे मिनार बनवायचे हा त्याचा छंद.

आणि असे मिनार तयार करणाऱ्यांना तो बक्षीस द्यायचा. देवगिरीच्या वारसांना आणि जावयांना ह्याने मारून किल्ल्याच्या द्वारावर लटकवले होते. त्यांच्या देहाचे तुकडे तुकडे तोरण म्हणून ह्याच अल्लाउद्दीनने लावले होते. असा हा आणखी एक क्रूर कर्मा भारतासाठी भयानक संकट ठरला होता.

औरंगजेब टोप्या विणायचा, अल्लाउद्दीन प्रेमात होता, महंमद गझनी अफगाणचा राजा होता हे सारे थोतांड आहे. कोणी टोप्या विणून किंवा प्रेमात असून त्याचे हिंसक वा क्रूर रूप लपवता येत नाही. सुफी शिया मुसलमानांनाही काफिर समजणाऱ्या औरंगजेबाच्या डोक्यावर धर्मांधतेचे भूत स्वार झाले होते.

पण टोप्या विणणारा म्हणून त्याच्या कृतीला सौम्यपणा आणण्याचा प्रयत्न केला जातो. पण त्यांच्याशी लढताना आपल्या कित्येक पिढ्या कमी आल्या आहेत हे विसरता कामा नये. आपण निःपक्षपातीपणाने चुकीच्या गोष्टींना चूक म्हणत इतिहासाचा अभ्यास करावा. तुम्ही आमच्याशी सहमत आहात का? आपले मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button