ताज्या बातम्याट्रेंडिंग

अभिनेत्री तुनिषा शर्माचा मृत्यू कसा झाला? पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मोठा खुलासा…

टीव्ही ऐक्ट्रेस तुनिशा शर्मा हिने शनिवारी २४ डिसेंबरला तिच्या एका मालिकेच्या सेटवर गळफास लावून आत्महत्या केली. तुनिशाचे वय केवळ २० वर्षे होते, तिच्या मृत्यूनं कलाक्षेत्रात हळहळ व्यक्त केल्या जात आहे, सोबतच सर्वत्र भीतीच वातावरण निर्माण झालं आहे. (How actress Tunisha Sharma died? A major revelation in the postmortem report)

मात्र सोशल मीडियावर इतक्या आनंदात दिसणारी, आपल्या १ मिलियन पेक्षाही अधिक फॉलोवर्सला आपल्या नवनवीन पोस्टने खुश करणाऱ्या तुनिशाने इतकं मोठं पाऊल का उचललं, हि आत्महत्याच आहे की हत्या? पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये नक्की काय समोर आल.

तुनिशाच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अभिनेत्यामुळे याला लव्ह जिहादचाही अँगल येतोय, तर खरचं असं आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात.

अली बाबा दास्तान ए कबुल या मालिकेत तुनिशा मुख्य भूमिकेत होती. यापूर्वी तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं. दबंग ३, विद्या बालनचा कहाणी सोबतच बार बार देखो आणि फ़ितूरमध्ये तिने कॅटरिना कॅफची युवा भूमिका साकारली होती.

आता तिच्या आत्महत्येमागे त्याच मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता शिजान खान याच्यावर आरोप केले जात आहे. आणि हे आरोप अभिनेत्रीच्या आईने केले आहेत. त्यांनतर शिजान ला अटक देखील करण्यात आली आहे.

तुनिशाच्या आईचे सांगणे आहे की, या दोघांचे प्रेमसंबंध होते, मात्र दोघांच्या ब्रेकअप नंतर तुनिशा तणावात होती. त्यातूनच तिनं हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे.

आता पोलिसांचं सांगणं होत की, यामागील खरं सत्य शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर सांगण्यात येईल. आता तिच्या एका मैत्रिणीनं ती गरोदर असल्याचं देखील सांगितलं होत, गरोदर असल्यामुळे तिनं बॉयफ्रेंड शिजानला लग्नाची मागणी केली.

अन् त्यांन नकार दिल्यामुळे तिनं हे पाऊल उचलल्याचं बोललं गेलं. मात्र शवविच्छेदन अहवालात असं काहीही नसल्याचं सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी स्पष्ट केलं. तसेच याला लव्ह जिहादचाही अँगल नसल्याचं त्यांचं सांगणं आहे.

तुनिशाच्या पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये सुद्धा तिच्या मृत्यूचे कारण दम घुटनेच सांगितले जात आहे. आता या प्रकरणात तिच्या को ऍक्टर शिजान ला अटक केल्यांनतर त्यांने देखील अनेक खुलासे केले आहेत.

ज्यात सर्वात मोठा खुलासा म्हणजे, तुनिशाने असे पाऊल आधी देखील उचलल्याचे स्पष्ट केले. त्यामुळं तुनिशा डिप्रेशन मध्ये असल्याची शंका पोलिसाना येत आहे, आणि पोलीस आत्महत्या आणि हत्या या दोन्ही अंगांनी केसचा तपास करत आहेत.

आत्महत्येपूर्वी तुनिशानं कुठलीही सुसाईड नोट न सोडल्यामुळं या केसचा सुगावा लागायला पोलिसांना अडचणी येत आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, शिजान सतत आपले म्हणणे बदलत असून ब्रेकअपचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

दरम्यान, त्याच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी करणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. सध्या पोलीस तुनिशा आणि शीजानच्या मोबाईलमधील डेटा काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

तिच्या मृत्यू पश्चात कलाविश्वात देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, त्यामुळे ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन कडून तुनिशा शर्मा हिच्या मृत्यूचा तपास एसआयटी द्वारे करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

या असोसिएशन फाउंडर सुरेश गुप्ता यांचे सांगणे आहे की सेटवर नक्कीच काहीतरी चुकीचे घडले, आणि या केस कडे सरकार ने लक्ष द्यावे व एसआयटी चौकशी करावी.

आता बघायला गेलं तर या केस कडे बऱ्याच दृष्टींनी पाहिलं जात आहे, आता नेमकं हे प्रकरण काय आहे किंवा कुठल्या मार्गांनी वळतं हे चौकशीत समोर येईलच.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button