जास्त पाणी प्यायल्याने होऊ शकतो मृत्यू? पहा तज्ञ काय सांगतात…
जास्त पाणी प्या, पाणी पिणं शरीरासाठी चांगलं असत. असं नेहमी आपण ऐकत असतो पण जर पाणीच मृत्यूच कारण ठरत असेल तर, प्रसिद्ध मार्शल आर्ट्स दिग्गज ब्रूस ली याचा मृत्यू प्रमाणापेक्षा अधिक पाणी प्यायल्यामुळे झाल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे. (Can drinking too much water cause death? See what the experts say)
आता ब्रुस लीच्या मृत्यूबद्दल करण्यात आलेल्या ताज्या दाव्यामुळे आणखी एका नव्याच प्रश्नाची चर्चा जगभरात सुरु झाली आहे. खरंच अतिरिक्त पाणी प्यायल्या मुळे मृत्यू होतो का? अनेकांना प्रश्न पडला असेल कि कमी पाणी पिणे आरोग्यास अनेक प्रकारे हानी पोहोचवते तर मग जास्त पाणी पिल्याने आरोग्यावर खरच इतका वाईट परिणाम होतो का?
तर तुमच्या पडलेल्या प्रश्नांना आज आपण सोडवण्याचा प्रयत्न करूयात. जेव्हा आपण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करतो तेव्हा त्याचे नुकसान होऊ लागते. त्याचप्रमाणे जर तुम्ही जास्त किंवा अती प्रमाणात पाणी प्यायले तर तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार जास्त पाणी पिण्यामुळे मृत्यू झाल्याची अनेक उदाहरणं आहेत.
जेव्हा शरीरात गरजेपेक्षा जास्त पाणी येतं, तेव्हा ते त्यातील सोडियम आणि अँझायमसह शरीराबाहेर फेकलं जातं. या प्रक्रियेचा किडणीवर अतिरिक्त ताण येतो. बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन हिनेही याबाबतचा आपला अनुभव शेअर केला होता. वजन कमी करण्याच्या नादात जास्त पाणी पिल्यामुळे तिची तब्येत चांगलीच बिघडली होती. पाणी किती प्यावं, हे प्रत्येकाच्या तब्येतीवर अवलंबून असतं.
मात्र जास्त पाणी पिणं हे नक्कीच धोकादायक ठरण्याची शक्यता असते. जास्त पाणी प्यायल्याने मेंदूच्या कार्यात अडथळा निर्माण होतो, त्याला पाणी विषबाधा असेही म्हणतात. यामध्ये रक्तातील पाण्याचे प्रमाण वाढते. जर एखाद्या व्यक्तीने १० लिटर पाणी प्यायले तर रक्तातील सोडियमची पातळी खूप कमी होते. त्याचा थेट परिणाम मेंदूवर होतो.
ज्यामुळे एखादी व्यक्ती कोमात जाऊ शकते किंवा त्याचा मृत्यूही होऊ शकतो. मॅरेथॉन आणि ट्रायथलॉनमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांमध्ये याचा धोका सर्वाधिक असतो. शरीरात सोडियमचे प्रमाण कमी असल्यास मेंदू आणि शरीर या दोन्ही पेशींमध्ये सूज येते. ज्याला सेल्युलर सूज म्हणतात.
मेंदूच्या पेशींना सूज आल्याने, एखाद्या व्यक्तीला गोंधळ, तंद्री, पेटके, स्नायू कमकुवत होणे आणि उच्च रक्तदाब यासारख्या समस्या उद्भवू शकतात. जर तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी प्याल तर तुम्हाला ओव्हरहायड्रेशनची समस्या देखील उद्भवू लागते, याला पाण्याची नशा सुद्धा म्हणतात. यामध्ये मळमळ, उलट्या, डोकेदुखी अशी लक्षणे दिसतात.
त्रास गंभीर झाल्यास कोमा किंवा मृत्यूचा धोका असू शकतो. आता एवढं ऐकल्या वर तुम्ही म्हणाल की भरपूर पाणी प्या, असा सल्ला लोक आम्हालाही देतात. अशा परिस्थितीत, आपण दिवसात किती पाणी प्यावे, जेणेकरून कोणतीही हानी होणार नाही हे आपल्याला कसे समजेल? तर पाण्याचं प्रमाण हे तुमच्या वजनावरून ठरवता येऊ शकतं.
दर १५ किलो वजनामागे दररोज १ लिटर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. त्याचप्रमाणं शरीरात येणारं पाणी हे फळं, भाज्या, सॅलड, ज्यूस यासारख्या वेगवेगळ्या माध्यमातून येणं अधिक योग्य मानलं जातं. बहुतेक निरोगी लोक तहान लागल्यावर पाणी आणि इतर पदार्थ पिऊन स्वतःला हायड्रेट ठेवू शकतात.
जेव्हा तुम्हाला तहान लागते तेव्हा पाणी आणि इतर द्रव्य पिऊन तुम्ही हायड्रेटेड राहू शकता. काही लोकांसाठी ८ ग्लास पेक्षा कमी पाणी पुरेसे असू शकते, परंतु काहींसाठी अधिक आवश्यकअसू शकते. यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पाण्याचे प्रमाण कमी करावे किंवा वाढवावे.