श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताबवर हल्ल्याचा प्रयत्न, दोघांना घेतले ताब्यात…
श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याला घेऊन जाणाऱ्या पोलिस व्हॅनवर सोमवारी रोहिणीतील एफएसएल बाहेर काही जणांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. (Attempted attack on accused Aftab in Shraddha murder case, two arrested)
त्यांच्या हातात तलवारी होत्या. हल्लेखोरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी रिव्हॉल्व्हर बाहेर काढले. मात्र, गोळीबार केला नाही.यातील दोन हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आले असून एका हल्लेखोराने सांगितले की १५ लोक गुरुग्राममधून आले होते.
सकाळी ११ वाजल्यापासून एफएसएलच्या बाहेर घात घालून बसले होते. या लोकांनी कारमध्ये अनेक तलवारी आणि हातोडे सुद्धा आणले होते. तो पुढे म्हणाला कि आमच्या बहिणीचे आणि मुलीचे ३५ तुकडे करणार्या आफताबचे ७० तुकडे करायला आम्ही आलो होतो.
हे हल्लाखोर आफताबला व्हॅनमधून उतरवण्याचा प्रयत्न करत होते. एकाने तर पोलिस व्हॅनचा दरवाजाही उघडला होता.
श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताबवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर दिल्ली पोलीस सतर्क झाले आहेत.
तिहारमध्येही सुरक्षा वाढवण्यात आली असून .व्हॅनवर हल्ला करणाऱ्या आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर उर्वरितांचा शोध सुरू आहे.