ताज्या बातम्याट्रेंडिंग

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केलेल्या सोन्याच्या खाणी नेमक्या कुठे आहेत?

महाराष्ट्राच्या भूर्गभात कोळसा, बॉक्साईट, लोखंडाच्या खाणी आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रात सोन्याच्या खाणी असल्याची माहिती समोर आली आहे आणि ही माहिती खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. (Where exactly are the gold mines announced by Chief Minister Eknath Shinde?)

मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी याबाबत माहिती दिली असून . ते म्हणाले, राज्यात सोन्याचे २ ब्लॉग असण्याची माहिती केंद्रीय अधिकाऱ्यांनी आपल्याला दिली आहे. नव्याने सापडलेल्या या खाणी राज्याच्या फायद्याच्या आहेत.

आमच्या काळात हे सोने निघाले तर ती राज्यासाठी खूप मोठी उपलब्धी असेल. राज्यात खनिकर्म क्षेत्राला मोठा वाव असून गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात देशातील सर्वात मोठा स्टील प्रकल्प सुरू करू शकतो, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांमध्ये म्हणजेच चंद्रपूर जिल्यातील मिंझरी आणि बामणी इथे सोन्याच्या खाणी आढळून आल्या आहेत. तसेच सिंधुदुर्ग मध्येही सोन्याच्या खाणी असल्याची शक्यता आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोळशाच्या खाणी आहेत. त्यानंतर आता भूगर्भात तांबे आणि सोन्याच्या खाणीहि आहेत. केंद्र सरकारच्या खनिकर्म विभागाचा अहवाल असल्याची माहिती राज्याच्या खनिकर्म विभागाकडून देण्यात आली आहे.

त्यादृष्टीने खनिकर्म विभागाने चाचणी सुरू केली आहे. तर या खाणी सापडल्या मुळे महाराष्ट्रात रोजगारही वाढण्याची शक्यता दिसून यात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button