ताज्या बातम्याट्रेंडिंग

मराठवाड्यातील ‘या’ पठ्ठ्याची कमाल, रेशीम शेतीतून १५ महिन्यात मिळवले २३ लाख रुपये…

महाराष्ट्रात सर्वाधिक रेशीम शेती मराठवाड्यात केली जाते. त्यातल्यात्यात आता शेतकरी रेशीम शेतीला जास्त पसंती देत आहेत. जालना जिल्ह्यात राहणाऱ्या एका २५ वर्षाच्या मुलाने असं काही करून दाखवलंय जे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. (This boy from Marathwada earned Rs 23 lakh in 15 months from sericulture)

त्याने रेशीम शेतीतून १५ महिन्यात २३ लाखांचं उत्त्पन्न मिळवलं आणि त्याला सरकारचा रेशीमरत्न हा पुरस्कार देखील मिळालाय. तर बातमी व्हिडीओज मध्ये आपण जाणून घेणार आहोत की, त्यानी इतक्या कमी वेळेत इतकं उत्पन्न कसं मिळवलं?, हा तरुण रेशीम शेती कडे कसा वळला? आणि त्याचे नियोजन काय होते? कदाचित यासर्व गोष्टी तुम्हालाही मार्गदर्शक ठरतील.

भाऊ निवदे हा २५ वर्षांचा मुलगा मूळचा राहणारा जालना जिल्ह्यातल्या मच्छिंद्रनाथ चिंचोली गावचा, भारतीय सैन्य दलात जायचं त्याचं स्वप्न होतं. तीन वर्षं तयारी केल्यानंतर त्याचे प्रयत्न अयशस्वी झाले. पार्ट टाईम शिक्षण घेता-घेता त्याने इंटरनेटवर माहिती मिळवत शेतीमध्ये प्रयोग करायचं ठरवलं. आणि जोमाने रेशीमची शेती सुरू केली.

त्यानंतर त्याने जे कमवलं ते फक्त पैशातच तोललं गेलं नाही तर,त्याच्या यशाची नोंद घेतली गेली. त्याला सरकारच्या रेशीमरत्न या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. भाऊ निवदेच बी.कॉम झालेलं,तो वडिलांना नेहमी म्हणायचं आपण रेशीम ची शेती करूयात पण वडिलांनी कधी लक्ष दिल नाही.

गावातल्याच एका शेतकऱ्याकडे रेशीमच शेड होत त्याने तिथे जाऊन विचारपूस केली असता कळलं ,की त्या शेतकऱ्याच ३० गुंठ्याचं क्षेत्र होतं. त्यात ते दर २ महिन्यात ८०, ९० हजार ते १ लाख उत्पन्न घ्यायचे. त्यामुळे मग यानेही शेतीकडे वळायच आणि रेशीम शेती करायचं ठरवलं.

आता त्याने सुरुवात कशी केली, तर त्याच शेतकऱ्याच्या शेतातून तुतीच्या काड्या आणल्या. आणि त्यांची सरी पद्धतीनं लागवड केली. रोपं ३ महिन्यांची झाल्यानंतर संपूर्ण एक एकरात तुतीची लागवड केली. अडीच महिन्यात त्याची १२५ अंडीपुंजाची पहिली बॅच आली, त्याच उत्पन्न १२० किलो झालं, त्यातून ६० हजार रुपये मिळाले.

पहिलीच बॅच यशस्वी झाल्यामुळे त्यांनी १ एकर क्षेत्र वाढवलं अन् २०२१ पर्यंत त्याने ४ एकर क्षेत्रावर तुतीची लागवड केली होती.
प्रत्येक महिन्याला त्याची बॅच ४००, ५०० किंवा ६०० अंडीपुंजाची असायची आणि प्रत्येक बॅचला चार,साडे चार किंवा पाच क्विंटल असा माल निघायचा. सुरुवातीला ५० हजार आणि मग उन्हाळ्यात ७० ते ८० हजारापर्यंत जालना मार्केटला कोषाचे भाव गेले.

त्यापासून प्रत्येक बॅचला १ लाख ८० हजार, २ लाख किंवा अडीच लाख अशी इन्कम राहायची. टोटल मिळून २३ लाख रुपये उत्पादन झालं. त्याने १५ महिन्यांमध्ये १३ बॅच कम्प्लीट केल्या आणि त्यापासून २३ लाख उत्पन्न झाल. हे उत्पन्न सर्वांत जास्त उत्पन्न असल्यामुळे त्याला रेशीमरत्न हा पुरस्कार मिळाला.

आता या तरुणाने रेशीम शेती कश्या पद्धतींनी केली तर रेशीम शेती मध्ये २ गोष्टी महत्वाच्या असतात. पहिलं म्हणजे शेडचं वातावरण व्यवस्थित टिकवून ठेवणं आणि दुसरं तुतीच्या पाल्याची क्वालिटी चांगली ठेवणं. आणि याने त्या कडे जास्त लक्ष दिल. शेडचं वातावरण मेंटेन ठेवण्यासाठी ६ फँन, दोन कुलर आणि ग्रीन नेटला इनलाईन ठिबकच्या नळ्या शिवल्या.

ज्या मुळे ग्रीन नेटवर पाणी सतत १० तास चालू राहतं. बाहेरून येणाऱ्या हवेमुळे वातावरण थंड राहतं आणि शेडचं वातावरण २७ सेल्सिअस राहतं. शेडमधील भिंत पूर्ण ओली राहत असल्यामुळे आर्द्रता टिकून राहते. जमिनीवर पाणी टाकल्यामुळे आर्द्रता ७०, ८०, ८५ अशी कंटिन्यू राहते.

त्याच म्हणणं आहे की शेडचं निर्जंतुकीकरण व्यवस्थित केलं नाही आणि पाल्याची क्वालिटी चांगली ठेवली नाही तर कोषाचं उत्पादन 30 ते ४० टक्केच होतं. आता त्याने चार एकराचं नियोजन असं केलं तर, एका बाजूच्या दोन एकरवर ४००, ५०० अंडीपुंजाची बॅच आणि दुसऱ्या दोन एकर वर ४००-५०० अंडीपुंजाची बॅच घेतली.

कारण हा दोन एकरचा पाला संपला की त्या बाजूचा पाला येतो. तो संपला की हा येतो.हे सगळं नियोजन करून त्याची १५० किलोची रेशीम कोषाची शेवटची बॅच ऑक्टोबर महिन्यात विक्रीसाठी गेली होती. जालना कृषी उत्पन्न समितीत या रेशीम कोषाला ६५० रुपये प्रती किलो इतका दर मिळाला. भाऊ निवदेला यातून ७५ हजार रुपये उत्पन्न मिळालं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button