एलआयसी एजंट व्हायचंय? क्षेत्राची सखोल माहिती घ्या!
“शेयर मार्केट इतना गहरा कुंआ है, जो पूरे देश की पैसे की प्यास बुझा सकता है” स्कॅम वेबसिरीजमध्ये हर्षद मेहताचा हा डायलॉग तुफान प्रसिद्ध झाला होता.
तुम्ही म्हणाल एलआयसी आणि शेयर मार्केटचा इथे काय संबंध! तर हो. संबंध आहे आणि तो म्हणजे दोन्ही क्षेत्रात संधी आणि पैसा भरपूर आहे.
शिवाय एलआयसीमध्ये जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी अशी सुरक्षितता आहे. एलआयसी एजंट म्हणून जो कोणी मेहनत घेतो त्याच्या हाती यशाची मोठी विहीर गवसतेच गवसते. चला तर मग आज जाणून घेऊयात एलआयसी एजंटचे विश्व कसे आहे.
एलआयसी म्हणजेच लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजे जीवन विमा ही भारतातील सर्वात मोठी विमा पॉलिसी आहे. भारतातील सर्व बँकेच्या १० टक्के हिस्सा एकट्या एलआयसीचा आहे.
एलआयसी एजंट का बनावे आणि या कामाची विशेषता:
एलआयसी एजंट ही अशी व्यक्ती आहे जी लोकांना त्यांच्या कुटुंबाचे संरक्षण, मृत्यू, अपंगत्व आणि कुटुंब प्रमुखाच्या निवृत्तीनंतरच्या अनपेक्षित घटनांपासून संरक्षण करण्यासाठी जीवन विमा योजनेवर सल्ला देते. हे एक महान कार्य आहे हे प्रथम लक्षात घ्यावे.
जे लोक बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी एलआयसी एजंट म्हणून काम करणे हे करियरच्या दृष्टीने मोठे व्यासपीठ आहे. त्यांना कायम स्वरुपी रोजगार मिळतो.
तुमचे शिक्षण जरी दहावी पर्यंतचे असेल तरी तुम्ही एलआयसीमध्ये काम करून तुमचे सर्व स्वप्न साकारू शकता.
एलआयसी मध्ये तुम्ही महिना ५० हजारांहून अधिक कमवू शकता. पहिल्या प्रीमियममध्ये ३५ टक्के कमीशन तुम्हाला मिळू शकते.
पॉलिसींच्या कमीशनवर विनाव्याज तुम्हाला सण, दुचाकी, चारचाकी घेण्यासाठी, सब्सिडी तसेच पूरस्थिती, दुष्काळ यासारख्या स्थितीत कर्ज मिळू शकते.
कार्यालय भत्ता, प्रवास भत्ता, स्टेशनरी, डायरी, कॅलेंडर, व्हिझिटींग कार्ड, लेटर पॅड अशा अनेक सुविधा मिळतात.
एजंट कधीही सेवानिवृत्त होत नाहीत. तुम्ही आजीवन कमीशन मिळवू शकता. तसेच निवृत्तीवेतनही लागू होते.
तुम्ही लाखो लोकांचे भविष्य सुरक्षित करता. तसेच पॉलिसींच्या विक्रीमार्फत तुम्ही वेगवेगळ्या क्लबचे सदस्यही होता.
आजच्या धकाधकीच्या जीवनात एका पगारावर घर भागत नाही किंवा तुमच्या मूळ स्वप्नाकडे धावताना पैशाची चणचण भासते अशा वेळी हा जॉब तुम्ही पार्टटाईम म्हणून सुद्धा स्वीकारू शकता. या कामाची विशेषता म्हणजे बाकीची कामे सांभाळून करता येतो.
विशेष म्हणजे महिलासुद्धा हे काम करू शकतात. आता तर अर्धे काम ऑनलाईन झाल्यामुळे महिलांसाठी करियर म्हणून यात खूप सुरक्षितता आहे.
एलआयसी एजंट बनण्यासाठी काही अटी:
१) एलआयसी एजंट बनण्यासाठी व्यक्तीचे वय अठरा वर्ष पूर्ण असावे.
२) व्यक्तीने किमान १० वी उत्तीर्ण असावे.
३) स्वतःचे सहा फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, दहावी उत्तीर्ण मार्क्सशीट सोबत असावे.
एलआयसी एजंट बनण्यासाठी एलआयसीच्या संकेतस्थळावर जाऊन किंवा नजीकच्या एलआयसी शाखेवर भेट देऊन तुम्ही अर्ज करू शकता.
अर्ज केल्यानंतर ५० तास तुम्हाला काही गोष्टी शिकवून त्यावर ५० गुणांची परीक्षा घेतली जाते त्यात १७ गुण मिळवले की, तुम्ही एलआयसी एजंट बनला आहात असे समजा.
आजच्या काळात एलआयसी एजंटकडे हवी असणारी मुख्य गोष्ट:
१) एलआयसी एजंट म्हणून सुरुवात:
कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही लहानच असते. त्यामुळे सुरुवातीला इन्शुरन्स पॉलिसी विकत घेण्यासाठी जर ग्राहक मिळत नसतील तर तुम्हाला गरजू व्यक्तींची भेट घ्यावी लागेल, त्यांना पॉलिसीचे महत्त्व समजावून सांगावे लागेल.
२) कष्ट करण्याची तयारी पाहिजेच:
क्षेत्र कोणतेही असो, कष्टाला पर्याय नाही हेच खरे आहे. एलआयसी एजंट हे क्षेत्र असेच आहे. एलआयसी विश्वातील मोठे नाव म्हणजे भारत पारेख. आज ते करोडो रुपये जरी कमवत असतील तरी त्यांची सुरुवात ही शून्यातून झाली होती.
गरजू व्यक्तींचे घरे किंवा मृत व्यक्तीचे घर कळावे म्हणून प्रसंगी ते स्मशान भूमीवरही थांबले. कष्ट घेतल्यास या क्षेत्रात पैसा ही पैसा होगा, हे नक्की.
३) आजच्या काळात तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा:
आज एलआयसी सोबत इतर विमा कंपन्यांचे कामकाज जास्त करून ऑनलाईन झाले आहे. ग्राहक ऑनलाईन विम्याचे हफ्ते भरू शकतात. त्यामुळे एजंट लोकांचे काम पुष्कळ प्रमाणात कमी झाले आहे.
परंतु पॉलिसी काढण्यासाठी ग्राहकांना एजंटची भेट घ्यावीच लागते. ग्राहकांच्या मनात अनेक प्रश्न असतात त्यांचे निरसन एजंट लोकच करतात. परंतु आजच्या काळात जगा सोबत चालण्यासाठी एजंट लोकांनी तंत्रज्ञानातील नवनवीन गोष्टी जरूर शिकाव्या.
४) लोकांची नाडी ओळखा:
या क्षेत्रात झपाट्याने प्रगती करण्यासाठी जीभेचा गोडवा आणि चांगली सेवा या दोन बाबी खूप महत्त्वाच्या आहेत.
पॉलिसी विकण्यासाठी ते क्लायंटसमोर घरोघरी बोलताना तेथील बोली भाषेचा वापर, त्यांच्या वाढदिवसाला, सणावाराला शुभेच्छा देणे, अशा रीतीने तुम्ही त्यांच्याशी सतत संपर्कात राहून विश्वासाचं नाते निर्माण करू शकता..
काय असतात एलआयसी एजंटचे कामे?
१) इन्शुरन्स प्लॅन जाणून घेणे.
२) इन्शुरन्स प्लॅन विकणे.
३) सर्व आवश्यक कागदपत्रे विमेदाराकडे पोहचवणे.
४) प्रत्येक विम्याचा हफ्ता एलआयसी शाखेत जमा करणे:
५) ग्राहकाला विविध सेवा पुरवणे.
६) तसेच कंपनीच्या नियमातील वर्षभराचे दिलेले टार्गेट पूर्ण करणे.
७)एखाद्या ग्राहकाच्या पॉलिसीचा काळ पूर्ण झाल्यावर त्याला त्याची रक्कम पुरवणे तसेच कागदपत्र प्रकिया करावी लागते.
कसा मिळतो एलआयसी एजंटना पैसा?
याचे गणित तुम्ही किती पॉलिसी विकता यावर अवलंबून आहे. इन्शुरन्स पॉलिसी विकल्यावर अंदाजे तीस ते पस्तीस टक्के कमिशन विमा एजंटला मिळत असते.
एखाद्या क्लाएंटने तुमच्या कडून पाच लाखाची इन्शुरन्स पॉलिसी विकत घेतल्यास तुम्हाला त्याच्या प्रत्येक विमा हफ्ता भरण्यामागे कमिशन मिळते. त्यामुळे जितक्या जास्त पॉलिसी तितका अधिक नफा हेच यशाचे सूत्र आहे.
तेव्हा आशा आहे “एलआयसी एजंट” होण्यापूर्वी या क्षेत्राची लेखातून मिळालेली माहिती तुम्हाला आवडली असेलच. अशा अजून कोणत्या विषयावर तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल हे नक्की कळवा.