जेव्हा लंडन येथे इंदिरा गांधींनी पहिल्यांदाच घेतली होती सोनिया गांधी यांची भेट…
सोनिया गांधी आणि राजीव गांधींची लव्ह स्टोरी एक चर्चेचाच विषय झाली होती सोनिया गांधी आणि राजीव गांधी यांची केंब्रिज युनिव्हर्सिटी मध्ये जानेवारी १९६५ मध्ये भेट झाली. नंतर दोघेही प्रेमात पडले. (When Indira Gandhi met Sonia Gandhi for the first time in London)
आता प्रश्न होता हे प्रेम घरी सांगायचं कसं? सोनियाला खात्री होती की आई मान्य करेल पण वडील मानणार नाहीत. इथे लाल बहादूर शास्त्रींच्या सरकारमध्ये नवीन मंत्री झालेल्या आई इंदिरा गांधी या सोनिया ला आपली सून म्हणून स्वीकारून घेतील याची राजीव गांधी यांना खात्री होती.
पण गोष्ट दिसते तितकी साधी आणि सोपी नव्हती सुरुवातीला सोनियांच्या कुटुंबीयांना तिने भारतीय मुलाशी लग्न करावे असे वाटत नव्हते. इकडे राजीव गांधींच्या सांगण्यावरून त्यांची आई इंदिरा गांधी लंडनमध्ये सोनियांना पहिल्यांदा भेटायला आल्या. सोनिया गांधी आता जरी एक मोठं व्यक्तिमत्व असेल.
पण त्या वेळी त्या एक साधारण व्यक्ती होत्या आणि प्रत्येक मुलीसारख त्या पहिल्यांदाच आपल्या प्रियकराच्या आई ला भेटणार होत्या, आता इंदिरा गांधी सोनिया गांधी ना पहिल्यांदा भेटल्या तेव्हा नेमकं काय घडल? तर आम्ही तुम्हाला त्यांच्या पहिल्या भेटीचा एक किस्सा सांगणार आहोत.
नेहरू-गांधी घराण्यात लांबलचक पत्रे लिहिण्याची परंपरा आहे. राजीवही तेच पाळायचे. जेव्हा ते त्यांच्या आई इंदिरा गांधींना पत्र लिहायचे तेव्हा कॅम्पस, अभ्यास, जीवन आणि दिनचर्या या सर्व गोष्टी लिहीत असत. लवकरच सोनियाही त्यांच्या पत्रात सामील झाल्या. ते त्यांच्या आई जवळ सोनियांचा उल्लेख करू लागले.
२१ वर्षीय राजीव गांधी यांनी जुलै १९६५ मध्ये पहिल्यांदा आई इंदिरा गांधी यांना सोनिया गांधींबाबत पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी लिहिले की, “तुम्ही मला इथे भेटलेल्या मुलींबद्दल नेहमी विचारता की मी इथे कोणाला भेटलो आहे की नाही. मला तुम्हाला सांगायचे आहे की, मी अशाच एका खास मुलीला भेटलो आहे.
मी अजून तिला विचारले नाही पण ती हीच मुलगी आहे जिच्याशी मला लग्न करायचे आहे. राजीव यांचे पत्र वाचल्यानंतर इंदिराजींनी उत्तर पत्रात लिहिले “आयुष्यात भेटलेली पहिली मुलगीच तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट असेलच असे नाही.” इंदिरा गांधींना या पत्राद्वारे आपल्या २१ वर्षांच्या मुलाची जिद्द कमी करायची होती.
पण राजीवची निवड पहिल्या नजरेत नाकारता येईल अशी असू शकत नाही हेही त्यांना चांगलेच ठाऊक होते. इंदिरा गांधींचे पत्र वाचून राजीव काळजीत पडले, पण त्यांचे सोनियांवरील प्रेम कमी झाले नाही. त्यांनी पुन्हा आईला पत्र पाठवले आणि लिहिले,तुम्ही कश्या म्हणू शकता की यापेक्षा चांगली मुलगी मिळेल?
सोनिया ही पहिली मुलगी आहे जिच्यासोबत मी बाहेर गेलो फिरलो. मला खात्री आहे की मी तिच्या प्रेमात पडलो आहे.” आपल्या मुलाला समजावने सोपे नाही हे इंदिरा गांधी याना समजले. त्यामुळेच त्यांनी पुढच्या पत्रात म्हटलं कि मी लवकरच लंडन दौऱ्यावर येत आहे, आणि मला त्या मुलीला भेटायचे आहे.
इंदिरा गांधींसोबतच्या भेटीबद्दल राजीव यांनी सोनियांना सांगितले तेव्हा सोनिया घाबरल्या. नोव्हेंबर १९६५, राजीव गांधीं केंब्रिज कॉलेजमधून सोनियासोबत इंडियन एंबेसी ला जायला निघाले . तिथे एक रिसेप्शन पार्टी होती ज्यात इंदिरा गांधी उपस्थित होत्या.आता साहजिक आहे इंडियन अँबेसि पोहोचत पर्यन्त सोनिया राजीवला विचित्र प्रश्न विचारत राहिल्या, मी त्यांना कसे भेटणार?
मी काय सांगेन मी काही चुकीचे बोलले तर? त्यांनी मला रागावले तर ? राजीव सतत त्यांना समजावत होते की सगळं नीट होईल सोनिया गाडीतून खाली उतरून पायऱ्या चढू लागल्या तेव्हा त्यांचे पाय थरथरत होते. त्या राजीव गांधींचा हात धरून म्हणाल्या, माफ करा आपण आत जाऊ शकणार नाही.
राजीवने सोनियाला सांभाळून आत घेतले. रेशमी साडी नेसलेल्या इंदिरा गांधींना सोनियाला पाहून समजले की त्या घाबरल्या आहेत, म्हणून त्यांनी तिला कम्फर्टेबल राहण्याची संधी दिली. सोनियांना बरे वाटावे म्हणून इंदिरा गांधी इंग्लिश बोलण्या ऐवजी फ्रेंचमध्ये बोलल्या. आणि सोनिया गांधी काही वेळातच कम्फर्टेबल झाल्या.
इंदिराजींनी त्यांना अभ्यासाबद्दल विचारले.आणि छोटी मोठ्या गोष्टी झाल्या. राजीव आणि सोनियाला एका पार्टीला जायचे होते. ड्रेस बदलून सोनिया बाहेर आली तेव्हा ड्रेस तिच्या पायात अडकला आणि त्याचे टाके उखडले त्या नंतर . इंदिरा गांधींनी स्वतः हा ड्रेस हातात पकडला आणि नंतर सुई धाग्याने तो शिवूनही दिला.
या घटनेने सोनिया गांधींना खूप प्रभावित केले. त्यांच्या आत असलेली थोडीफार भीती ही संपली.आता राजीव आणि त्यांची आई इंदिरा गांधी यांच्याशी तिचे हे संबंध जवळचे वाटत असले तरी सोनियांच्या घरातील बाकीचे तसे नव्हते. सोनियाच्या बडिलांनी लग्नासाठी एक अट घातली होती लग्नासाठी किमान एक वर्ष प्रतीक्षा करावी,आणि तो पर्यंत तुम्ही दोघेही एकमेकांना भेटणार नाही.
तोपर्यंत तुमचे प्रेम असेच राहिले तर ते सोनियाला राजीवच्या देशात जाऊ देतील, पण लग्नात काही गडबड झाली तर ती त्यांना दोष देऊ शकत नाहीत.असं म्हणत एक वर्ष त्यांनी वाट पहिली आणि या प्रतीक्षेनंतर सोनिया गांधी या भारतात आल्या.