ताज्या बातम्याट्रेंडिंग

अहो!! ‘या’ अजब कारणामुळे ट्रेनचे डब्बे लाल, निळे किंवा हिरवेचं असतात…

रेल्वे ही भारतातील सर्वात जास्त पसंत केल्या जाणाऱ्या वाहतूक साधनांपैकी एक आहे. भारतीय रेल्वे नेटवर्क हे आशियातील दुसरे तर जगातील चौथे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. (Hey!! Train coaches are red, blue or green for ‘this’ strange reason)

लहानपणापासून आपण अनेकदा रेल्वेमधनं प्रवास केला असेल, अनेकदा रेल्वे स्थानकावर उभे असताना वेगवेगळ्या रंगाच्या रेलगाड्या आपल्या डोळ्या समोरून गेल्या असतील. रेल्वेच्या आत व बाहेर दिलेली वेगवेगळी चिन्हे देखील आपण पहिले असतीलच.

तेव्हा आपल्या मनात प्रश्न नक्कीच उपस्थित झाले असतील. रेल्वे गाडयांना निळा, लाल, हिरवा हेच रंग का असतात? असे विशिष्ठ चिन्ह देण्यामागचा हेतू काय? तुम्हाला पडलेल्या याच प्रश्नाचे उत्तर आज यामाध्यमातून आपण जाणून घेऊयात.

विशेषतः ट्रेनमध्ये तीन रंगाचे डब्बे दिले असतात. लाल, निळा आणि हिरवा. आता असे का याचाच अर्थ जाणून घेऊयात. शताब्दी एक्स्प्रेस पासून तर वंदे भारत पर्यन्त या सर्व ट्रेन्सचे नुसतं पॅटर्नचं नाही तर रंग देखील वेगळे असतात.

जास्तीत जास्त डब्यांचा रंग हा निळा असतो. या निळ्या डब्यांना एंट्री- लेव्हल कोच म्हणून ओळखले जाते. या डब्ब्यांचे उत्पादन स्वतंत्र भारतातील सर्वात जुने उत्पादन आहे. हे सर्व डब्बे लोखंडाचे बनले असून, यात एअरब्रेक सिस्टम दिली असते.

या ट्रेन ताशी ७० ते १४० किलोमीटर धावते. हे सर्व कोच चेन्नई येथे असणाऱ्या इंटिग्रल कोच फॅक्टरी मध्ये तयार केले जातात. दरम्यान आता त्यांच्या जागी एलबीएच चा वापर केला जाऊ लागला आहे.

काही रेल्वे गाड्यांचे डब्बे तुम्ही लाल रंगाचे पहिले असतील. ट्रेनमध्ये लाल रंगाचे डब्बे वापरण्याला लिंक हॉफमॅन असे देखील बोलतात. हे डब्बे जर्मनीमध्ये तयार केले गेले व २००० साली भारतीय रेल्वेने या डब्ब्यांची आयात केली.

आता हे डब्बे पंजाब येथील कपुरथला येथे तयार होतात. या डब्यांचे वजन इतर डब्ब्यांच्या तुलनेत कमी असते कारण हे लाला डब्बे ऍल्युमिनियम ने तयार केले असतात. वजनाने हलके असल्यामुळे या डब्यांच्या वेग तशी २०० किलोमीटर असतो.

सध्या या डब्ब्यांना शताब्दी व राजधानी सारख्या गाड्यांचा वेग वाढावा म्हणून बसविण्यात आले आहे. हिरव्या रंगाचे डब्बे हे देखील आजकाल गरीब रथ सारख्या अनेक गाड्यांमध्ये वापरण्यात येतात.

मीटरगेज गाड्यांमध्ये देखील तपकिरी रंगाचे डब्बे वापरण्यात येतात. याप्रकारे वेगवेगळ्या रेल्वे गाड्यांसाठी वेगवेगळ्या रंगाचे डब्बे वापरले जातात.

आता हि तर झाली रंगांची गोष्ट, मात्र तुम्ही जर निरखून पाहिलं असेल, तर ट्रेनच्या गाडी शेवटच्या डब्यावर क्रॉस चे चिन्ह दिले असते. नेमका या क्रॉसचा अर्थ काय असावा? तर मुख्यतः भारतातील पॅसेंजर ट्रेनच्या मागच्या बाजूला हे चिन्ह काढले असतात.

काही डब्ब्यांवर एलव्ही देखील लिहिले असते. याचा अर्थ असा की, हे चिन्ह म्हणजे रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी एक संकेत असतो की हा डब्बा म्हणजेच शेवटचा डब्बा आहे. जर एखाद्या ट्रेनच्या मागे हे चिन्ह नसेल तर ट्रेन आपत्कालीन स्थितीत असल्याचे समजले जाते. याच

डब्यावर टिमटिमणारा लाल लाईट ट्रेन त्या ठिकाणाहून पास झाल्याचा एक संकेत असतो. आता रेल्वे डब्ब्यांचे विविध रंग असो, चिन्ह असो किंवा त्यावर दिलेला लाईट. यामागे काही न काही उद्देश किंवा संकेत हा असतोच असतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button