ताज्या बातम्याट्रेंडिंगमहाराष्ट्र

पुणेकरांनो घरात मांजर पाळताय? मग जाणून घ्या महापालिकेचे नवे नियम…

पुणेकर कधी काय करतील याचा काही नेम नाही. कोणत्या ना कोणत्या कारणासाठी पुणे शहर नेहमीच चर्चेत असते. कधी पुणेरी पाट्या तर कधी पुणेरी टोमणे यावरुन नेहमी पुणे शहर चर्चेत असत. आता पुन्हा एका विशेष गोष्टीमुळे पुणे चर्चेत आले आहेत. आता कुत्र्यापाठोपाठ घरात मांजर पाळण्यासाठी देखील पुणे महानगरपालिकेचा परवाना घ्यावा लागणार आहे. (Do Punekars keep cats at home? Then know the new rules of the Municipal Corporation)

आरोग्य विभागाच्या या प्रस्तावास स्थायी समितीने मान्यता दिली. परवाना कसा काढायचा? परवाना कुठे काढायचा? आणि असा निर्णय का घेण्यात आला? हेच आपण थोडक्यात जाणून घेऊयात.

मांजर हा अनेकांचा आवडता प्राणी आहे. त्यामुळे अनेक घरांमध्ये मांजर पाळल्याचं पाहायला मिळतं. मात्र, मांजर पाळण्याची हौस असणाऱ्या पुणेकरांसाठी आता एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

कुत्र्यापाठोपाठ घरात मांजर पाळण्यासाठी पुणे महानगरपालिकेचा परवाना घ्यावा लागणार आहे. आरोग्य विभागाच्या या प्रस्तावास स्थायी समितीने मान्यता दिली. दरम्यान, पुढील आठ दिवसात मांजराच परवाना घेण्याची प्रक्रिया ऑनलाइन केली जाणार आहे. मांजराची नोंदणी करण्यासाठी वर्षाला 50 रुपये इतके शुल्क भरावे लागणार आहे.

तसेच रहिवासी पुरावा, लसीकरण प्रमाणपत्र आणि मांजराचा फोटो ही कागदपत्रे बंधनकारक असणार आहेत. तसेच, दरवर्षी त्या परवान्याचे नूतनीकरण करुन 50 रुपये परवाना शुल्काशिवाय अतिरिक्त 25 रुपये आकारले जाणार आहे.. यासोबतच अँटीरेबीज लसीकरण प्रमाणपत्रही सादर करावं लागणार आहे. याबाबतचे आदेशच पुणे महापालिकेकडून देण्यात आले आहेत.

याला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. महापालिकेने कुत्र्यांची नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. तसंच मांजराची नोंदणीही ऑनलाइन करण्याची प्रक्रिया आठवडाभरात सुरू होईल, असं सांगितलं जात आहे. कुत्रे, घोडे, मांजर अशा सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांची नागरिकांनी महापालिकेकडे नोंदणी करून परवाना घेणं आवश्‍यक आहे.

मात्र, अद्यापही नागरिकांनी महापालिकेच्या या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याचं दिसतं. महापालिकेच्या माहितीनुसार शहरात 1 लाखापर्यंत पाळीव कुत्रे आहेत. मात्र, आत्तापर्यंत फक्त 5 हजार 500 कुत्र्यांची नोंदणी महापालिकेकडे झाली आहे. आता मांजर पाळण्याचं प्रमाणही वाढत आहे.

अशातच महापालिकेनं मांजरासाठीही परवाना घ्यावा लागणार असल्याचं सांगितलं आहे. पुणे शहरात मोठ्या संख्यने प्राणी प्रेमी आहेत. त्यांच्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आणि या प्राण्यांच्या उपद्रवाच्या अनेक तक्रारींना महापालिकेला सामोरे जावे लागते.

या प्राण्यांमध्ये मांजरी, भटकी कुत्री यांचा देखील समावेश आहे. अनेकदा प्राण्यांच्या मालकांमध्ये आणि तक्रार दरांमध्ये झालेला वाद सोडविण्याच्या प्रयत्नात पालिकाच फसते आणि यामुळेच हा निर्णय घेतल्याचही सांगण्यात येत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button