ताज्या बातम्याट्रेंडिंग

हॉस्टेलचा मुलगा जेवायला गेला अनोळखी लग्नात, मात्र ‘या’ कारणामुळे त्याच सर्वत्र कौतुक…

अनेकदा अनेकजण अनोळखी व्यक्तीच्या लग्नामध्ये जेवण करायला जात असतात. शिक्षणासाठी मुले बाहेरगावी राहत असतांना काही मुले कधी तरी जर जेवणामुळे प्रॉब्लेम झाला. (The hostel boy went to a stranger’s wedding for dinner, but because of ‘this’ reason he was admired everywhere)

तर अनोळखी व्यक्तीच्या लग्नामध्ये जाऊन, कुणाला न माहिती होता जेवण करून येत असतात. पण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ४५ सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती नवरदेवाच्या शेजारी येऊन बसला आणि मग म्हणाला.

आम्ही तुमच्या लग्नाला आलो आहोत आणि तुमचं नाव काय आहे आणि घरं कुठे आहेत हे आम्हाला माहीत नाही. आम्ही हॉस्टेलमध्ये राहतो, भूक लागली होती, म्हणून आम्ही जेवायला आलो. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का?

मग नवरदेव म्हणाला, काही प्रॉब्लेम नाही. तेव्हा मुलाने ऑन कॅमेरात कबूल केले की, मी इथून जात असताना इथे जेवणाची पंगत पाहिली, मग आत शिरून जेवलो. आम्ही विचार केला की जे आहे ते तुम्हाला खरं सांगावं.

तेव्हा त्या व्यक्तीने नवरदेवाचे अभिनंदन केले आणि म्हणाला, ‘तुम्हाला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. हे ऐकून नवरदेवाच्या चेहऱ्यावर हसू उमटले आणि तो म्हणाला, तुझ्या हॉस्टेलसाठीह सुद्धा जेवण घेऊन जा. वसतिगृहातील मुलांना जेवण न्या.

एखादा विद्यार्थी किंवा हॉस्टेलचा विद्यार्थी लग्नात जेवायला आला तर त्याला अशी वागणूक मिळावी, याचं उदाहरण म्हणून लोक या व्हिडिओकडे पाहत आहेत. आयएएस अधिकारी अविनाश शरण यांनी ‘देव तुझं भलं करो’ असं कॅप्शन देत ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला.

हा व्हिडिओ एक लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. यावर नेटकऱ्यांनी छान प्रतिक्रिया सुद्धा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button