ताज्या बातम्याट्रेंडिंग

तरुणानं बनवली ८ रुपयात १५० किमी चालणारी इलेक्ट्रिक बाईक, आनंद महिंद्रांकडून प्रशंसा…

दररोज इंधनाचे दर वाढल्याने नवनवीन टेक्नॉलॉजीच्या मदतीने इलेक्ट्रिक बाईक आणि कार्सची निर्मिती होत आहेत. पण मोठमोठ्या कंपन्यांच्या वाहनांना सुद्धा तगडी टक्कर देणार. सध्या एका अशाच ई-बाईकची चर्चा होत आहे. (A young man built a 150 km electric bike for Rs 8, praised by Anand Mahindra)

या बाईकने उद्योगपती आनंद महिंद्रा यांचंही लक्ष वेधून घेतलंय. त्यांनी ट्विटरवर या बाईकचा एक व्हिडिओ शेअर करत त्यांच्या कंपनीचे चीफ डिझायनर प्रताप बोस यांना इंजिनीअरिंग बाबत एक प्रश्नही विचारला आहे.

व्हिडीओ शेअर केलेल्या या इलेक्ट्रिक बाईकची खास गोष्ट म्हणजे यात जास्त फीचर्स नाही, पण ग्रामीण भागामध्ये फिरण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. इतकंच नाही तर ही बाईक शेतात सुद्धा आरामात चालते, म्हणजेच ती ऑफ-रोडदेखील उत्तम चालते.

ही बाईक बनवण्यासाठी खर्च १०००० ते १२००० रुपये असल्याचं या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं आहे. ही बाईक पाहून महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा खूपच प्रभावित झाल्याचं दिसतं आहे.

ग्रामीण भागामध्ये ट्रान्सपोर्टसाठी होणाऱ्या नवनवीन शोधांनी मी नेहमीच प्रभावित होतो. तिथं खरंच, गरज ही शोधाची जननी आहे, असं आनंद महिंद्रा यांनी म्हटलं आहे. दरम्यान, आनंद महिंद्रा या बाईकमुळे चांगलेच प्रभावित झाले आहेत.

त्यामुळे येत्या काळात महिंद्राने अशी बाईक बनवली तर त्यात आश्चर्य वाटणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button