ताज्या बातम्याट्रेंडिंग

कोण होते महाराजा रामानुज, ज्यांनी भारतातील शेवटच्या चित्त्याला मारली होती गोळी?

पृथ्वीतलावरचा चित्ता हा सर्वात वेगवान प्राणी आहे . मात्र गेल्या ७० वर्षांपासून हा प्राणी भारतातून नामशेष झाला आहे. १९५२ साली चित्ता हा प्राणी भारतातून नामशेष झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. भारतात चित्त्यांना आणण्याचा प्रयत्न बऱ्याच वर्षांपासून सुरु आहे, अखेर भारताच्या या प्रयत्नाला मोदींची सत्ता असतांना यश मिळाले आहे.

तब्बल ७० वर्षांनीं म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी चित्त्यांचे भारतात आगमन झाले आहे. मात्र जगातील सर्वात वेगवान प्राणी जगातून संपायच्या मार्गावर कसा पोहोचला? भारतातून चित्ता नामशेष होण्यामागे काय कारण आहे? भारतासारख्या निसर्गसंपन्न भूभागातून ही प्रजाती कशी विलुप्त झाली? यावरचं प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.

जिऑलॉजिकल सोसायटी ऑफ लंडन यांच्या अहवालानुसार संपूर्ण जगात केवळ ७१०० चित्ते आहेत. आशिया खंडात तर केवळ इराणमध्ये ५० चित्ते आहेत. चित्त्यांच्या या सरसरीत आशियाई चित्त्यांची संख्या सर्वात जास्त घटली आहे.

१९०० साली संपूर्ण जगात १ लाख चित्ते जिवंत होते असे सांगण्यात येते. भारतात मुघल शासनात तब्बल १ हजार चित्ते अस्तित्वात होते. मात्र इंग्रजांच्या शासनानंतर चित्यांच्या शिकारीची सुरुवात झाली आणि भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत चित्ते भारतातून नामशेष होण्याच्या मार्गावर येऊन पोहोचले. १९४७ साली तर भारतात केवळ ३ चित्ते बाकी राहिले.

याव्यतिरिक्त कितीतरी वन्यप्राण्यांची शिकार अंधश्रद्धेमुळे देखील व्हायची. चित्ता आणि वाघ यांची शिकार त्यांच्या कातडीसाठी केली जायची. या कातडीपासून कोट बनवले जायचे आणि याची आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात तस्करी व्हायची. राजे- महाराजेंचे दिवाणखाने सजवण्यासाठी देखील या वन्य प्राण्यांचे डोके आणि कातडी लावली जायची.

या कारणांतून झालेल्या शिकारीतून देखील चित्ता नामशेष झाला आहे. मानवाने जंगलावर अतिक्रमण करून तिथे आपली वस्ती तयार केली आणि यामुळेच कित्येकदा चित्ते मानवी वस्तीत येतात आणि लोक आमच्या अधिवासात आला म्हणून त्याला मारून टाकतात.

एका सर्व्हेनुसार सांगण्यात आले आहे की, जास्तीत जास्त चित्ते जैव संरक्षण अधिवासाच्या बाहेर असतात आणि यामुळे ते तस्कर व शिकारींच्या तावडीत सहज सापडतात आणि मारले जातात. अनेक चित्ते तर रस्त्यावर वाहनाखाली सापडून सुद्धा मेले आहेत. चित्यांच्या संख्येत होणारी घट हा आता जागतिक प्रश्न झाला आहे आणि त्याच्या संवर्धनासाठी वेगवेगळे उपक्रम सुरु करण्यात आले आहेत.

या सर्व बाबीतून हे तर नक्की स्पष्ट होत की याला मानव जबाबदार आहेत. निसर्गाने मानवाला सर्व गोष्टी उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र तरी देखील मानव स्वतःच्या सुख- सोयी पूर्ण करण्याच्या नादात इतर प्रजातींना धोका निर्माण करतोय. निसर्गाच्या विरोधात जाऊन मानवाने प्रगतीच्या नावावर जंगलतोड, शिकार यांसारख्या गोष्टी करून नैसर्गिक अधिवासच धोक्यात आणला आहे. चित्ताचं नव्हे तर इतर देखील कितीतरी जनावर नामशेष झाले आहेत. कुठे न कुठे याचा दुष्परिणाम मानवालाच भोगावा लागणार आहे.

भारताने देखील वन्यजीव संरक्षणा अंतर्गत चित्ता प्रकल्पाची सुरुवात केली आणि भारताला अनेक वर्षानंतर चित्त्यांना आणण्यात यश मिळालं आहे. आफ्रिकातील नामिबियातून ८ चित्यांना यशस्वीरीत्या भारतात आणण्यात आले असून, यात पाच मादी आणि तीन नर चित्यांचा समावेश आहे. चित्त्यांना मध्यप्रदेश येथील कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात येणार असून काही महिने या चित्यांना लहान प्रदेशात ठेवण्यात येणार आहे व त्यानंतर त्यांना जंगलात सोडण्यात येईल.

पहा विडिओ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button