ताज्या बातम्याट्रेंडिंग
भारतीय नौदलात १४०० जागांसाठी होणार भरती, जाणून घ्या अर्जपद्धती…
नुकतंच भारतीय नौदलाने अधिसूचना जारी केली आहे. ज्यात नवीन पदांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली आहे. याच नौकरी मध्ये लागणारी वयोमर्यादा, शैक्षणिक आणि शारीरिक पात्रता, अर्ज पद्धती काय आहे आपण थोडक्यात जाणून घेऊयात. (Indian Navy Recruitment 1400 Vacancies, Know How to Apply)
भारतीय नौदलात अग्नीवर पदांच्या तब्बल १४०० जागांची भरती लवकरच होणार आहे. ही तरुणांसाठी जणू सुवर्ण संधीच आहे. या पदासाठी पात्र असलेल्या उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
अर्जाची प्रक्रिया ८ डिसेंबर २०२२ सुरु होणार असून, अर्ज करण्याची अखेरची तारीख १७ डिसेंबर २०२२ आहे. या भारतीकरिता वयाची मर्यादा ही १७. ५ वर्षे ते २१ वर्षे आहे.
उमेदवाराचा जन्म हा १ मे २००२ ते ३१ ऑकटोबर २००५ च्या दरम्यान झालेला असावा व उम्मेदवाराची उंची पुरुषांची १५७ सेंटीमीटर तर महिलांची १५२ सेंटीमीटर असणे अनिवारय आहे.
याकरिता ५५० रुपये इतका परीक्षा शुल्क असणार आहे व अर्जाची पद्धत हि ऑनलाईन स्वरूपाची असेल. join indian navy. gov. in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.