ट्रेंडिंगताज्या बातम्या

बिग बजेट नाही तर लो बजेट चित्रपटांनी गाजवलं बॉक्स ऑफिस, ‘हे’ ७ चित्रपट ठरले सुपरहिट…

साऊथ चित्रपट असो किंवा बॉलिवूड, आजकाल चित्रपट बनवायचा असेल तर पाण्याप्रमाणे पैसा खर्च केला जातो. एक एक सिन प्रॉपर बनावा यासाठी फिल्ममेकर करोडोने पैसा खर्च करतात. (Not big budget but low budget movies dominated the box office, ‘These’ 7 movies became super hits)

नुसतं गाणे किंवा चित्रपटाचे सीन्सचं नाही तर कलाकाराच्या कपड्यावर सुद्धा पाण्यासारखा पैसा खर्च होतो. तरी सुद्धा कितीतरी चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरतात. तुम्हालाही वाटत असेल इतका पैसा खर्च करून सुद्धा हे चित्रपट फ्लॉप कसे ठरतात? तर याबद्दल
पुढे आपण जाणून घेणारच आहोत.

पण यासोबतच आपण २०२२ च्या अश्या चित्रपटांबद्दल बोलणार आहोत, जे अगदी कमी पैशात बनून सुद्धा ब्लॉकबस्टर ठरले. आता हे चित्रपट नेमके कोणते? २०२२ वर्षाला निरोप देण्यासाठी अगदी काही दिवसचं शिल्लक राहिले आहेत. बॉलिवूडसाठी हे वर्ष थोडं आनंदी तर थोडं दुखी असं होत.

कारण यंदाच्या वर्षात बॉलिवूडचे अनेक बिग बजेट चित्रपट फ्लॉप ठरले तर अनेक लो बजेट चित्रपट हिट ठरले. कस आहे ना चित्रपटाचं फ्लॉप होणं किंवा हिट होणं, हे या चित्रपटावर किती पैसा खर्च करण्यात आला आहे यावर ठरत नाही तर हे ठरत चित्रपटाच्या चांगल्या कन्टेन्ट आणि कलाकाराच्या अभिनयावर.

आज आपण अशाच काही चित्रपटांबद्दल बघणार आहोत जे आपल्या कन्टेन्ट च्या जोरावर आणि कलाकाराच्या अभिनयामुळे बॉक्सऑफिसवर सुपरहिट ठरले. यात सातव्या क्रमांकावर येणारा चित्रपट आहे मेजर, हा चित्रपट २६/११ च्या मुंबई हल्लयात आपली मोलाची कामगिरी करणाऱ्या मेजर उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित आहे.

या चित्रपटाचे बजेट केवळ २५ कोटी होते, मात्र बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं ६६ कोटींची कमाई केली. सहाव्या क्रमांकावर येतो महिन्याभरा पूर्वीच प्रदर्शित झालेला ‘लव्ह टुडे’ चित्रपट. या चित्रपटाचे बजेट ५ कोटी असून, बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने ७० कोटींची कमाई केली.

५ व्या क्रमांकावर येतो दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सरदार चित्रपट, दिवाळी दरम्यान प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे बजेट २० कोटी होते, परंतु बॉक्सऑफिसवर चित्रपटाने १०४ कोटींचा गल्ला गाठला.

४ थ्या क्रमांकावर येतो किरणराज यांनी दिग्दर्शित केलेला ७७७ चार्ली चित्रपट, प्राणीप्रेमींनी या चित्रपटाला भरघोस प्रतिसाद दिला. आणि १७ कोटींचे बजेट असणाऱ्या या चित्रपटाने तब्बल १०५ कोटींची कमाई केली.

यात ३सऱ्या क्रमांकावर येणारा चित्रपट आहे ‘कार्तिकेय २’. या चित्रपटाचे बजेट केवळ १५ कोटी होते, मात्र चित्रपटाची कमाई १२५ कोटींच्या घरात जाऊन पोहोचली.

क्रमांक २ वर येतो ‘सीता रामम’. अनोख्या प्रेमकथेवर बनलेल्या या तेलगू चित्रपटाचे बजेट ३० कोटी होते, मात्र चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ९२ कोटी कमावले.

आणि अखेर पहिल्या क्रमांकावर येतो ‘कांतारा’ हा सिनेमा. हा यावर्षीचा सर्वात सुपरहिट सिनेमा ठरला. केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेर सुद्धा या सिनेमाची जादू पाहायला मिळाली. केवळ १६ कोटी बजेट असणाऱ्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिस गाजवून ३९३ कोटींची कमाई केली.

आता तुमच्याही लक्षात आलं असेलच की एखादा चित्रपट सुपरहिट करण्यासाठी केवळ मोठ्या बजेटची गरज नसते, तर चांगल्या कन्टेन्ट ची सुद्धा गरज असते. कन्टेन्ट लोकांना पसंत पडला तर चित्रपट हिट ठरतोच ठरतो.

आता आपण जितकेही चित्रपट पहिले त्यात तुमच्या लक्षात आलं असेल तर सर्वात जास्त चित्रपट दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आहे, आणि इतक्यात बॉलिवूडपेक्षा लोक दाक्षिणात्य चित्रपटांना जास्त पसंती देत आहेत.

कदाचित प्रेक्षकांना बॉलिवूडकडून सुद्धा चांगल्या कन्टेन्ट ची अपेक्षा असावी. जर बॉलिवूडने दिग्गज कलाकार आणि चित्रपटासाठी लागणाऱ्या बजेटकडे लक्ष देण्यापेक्षा, चित्रपटाच्या कथानकाकडे लक्ष दिल तर बॉलिवूडचे चित्रपटही गाजल्याशिवाय राहणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button