भव्य- दिव्य समृद्धी महामार्गावर अपघात का होत आहे? याला जबाबदार कोण?
नुकतच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण पार पडले. हा महामार्ग बनविण्याच्या उद्देशानुसार या महामार्गामुळे लोकांचा वेळ तर वाचणारच. (Why are accidents happening on Samruddhi Highway? Who is responsible for this?)
म्हणजे कमी वेळा मध्ये नागरिक या महामार्गामुळे आपल्या प्रवासाचे अंतर लवकरात लवकर गाठणार. पण या महामार्गामुळे कदाचित लोकांचे जीव धोक्यात असल्याचे दिसून येत आहे. आणि या समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. इतक्या वर्षांपासून या महामार्गाचे काम सुरू होते.
खरं तर हा महामार्ग नागरिकांच्या सोयीसाठी बनविण्यात आला आहे. पण या महामार्गावर सुद्धा अपघाताची सुरवात झाली आहे. आता इतक्या भव्य दिव्य अश्या समृद्धी महामार्गावर अपघात का होत आहे? आणि या अपघातांमागचे नेमके कारण काय? याला जबाबदार कोण? अगदी याच प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न या मध्ये आज आपण करणार आहोत.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी ११ डिसेंबर रोजी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले होते. कुठल्याही भागाचा विकास हा स्थानिक ठिकाणी दळण वळणाची साधने किती चांगल्या दर्जाची आहेत, यावर ठरतो. त्यामुळे राज्याच्या विकासाकरिता रस्ते विकासाला अनन्यसाधारण महत्व आहे.
समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यामधे नागपूर ते शिर्डी या ५२० किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण होऊन तो नागरिकांसाठी सुरू करण्यात आला आहे. या माहामार्गामुळे नागपूर ते शिर्डी हे अंतर पार करण्यासाठी पूर्वी १३ तास लागायचे. पण आता हे अंतर फक्त पाच तासांमध्ये पार करणे शक्य झालेल आहे.
या एक्स्प्रेस वेवर वाहन चालकांसाठी प्रतितास १२० किमी इतक्या वेगाची परवानगी देण्यात आलेली आहे. समृद्धी महामार्गामुळे जरी अंतर कमी झाल असेल व वेळ कमी लागत असला पण या महार्गावर अपघात देखील होत आहे. नुकतच समृद्धी महामार्गावर अपघाताच्या घटना ऐकायला आल्या आहेत.
उद्घाटनानंतर थोड्याच वेळात, ‘टाइम्स ऑफ इंडियामध्ये पुलगाव जवळील मार्गावर एका माकडाचा मृत्यू झाल्याचा फोटो प्राप्त झाला होता. वेगवान वाहनाने माकडाला धडक दिल्याने त्यात तो ठार झाला असावा.. असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
समृद्धी महामार्गावर पहिल्या अपघाताची घटना हि दोन कारची आपसात धडक झाल्याची घडली आहे.
नागपूरमध्ये वायफळ टोल नाक्यावर एका स्विफ्ट कारला भरधाव मर्सिडीज बेंझ कारने मागून जोरदार धडक दिली होती. या अपघातात स्विफ्ट कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. याच बातमी ला २४ तास सुद्धा नव्हते झाले कि समृद्धी महामार्गावर आणखी एक अपघाताची बातमी समोर आली. ज्यामध्ये एक गॅस सिलेंडर भरून असलेला ट्रक पलटी झाला.
ट्रकचा तोल गेल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना बुलढाण्यातील मेहकर बेळगाव येथील डोणगाव पोलीस ठाण्याजवळ घडली. सिलेंडरने भरलेला ट्रक नागपूरहून शिर्डीला जाणार होता. आता या अपघाताच्या मागच नेमकं कारण म्हणजे मोठ मोठे रस्ते बघून चालकाचे लक्ष गाडीवरून हटले व हा अपघात झाला असे वर्तविण्यात येत आहे .
आता या अपघातामागे नेमकी चुकी कुणाची आहे. समृद्धी महामार्गाचे उद्घाटन झाल्यापासून सलग दोन ते तीन अपघात झाले आहेत. रस्ता पाहून लोक भरधाव वेगात गाडी चालवत आहेत. ज्यामध्ये संतुलन गमावणे सामान्यच आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये अपघाताची शक्यता ही वाढते.
त्यामुळेच लोकांना समृद्धी महामार्ग किंवा इतर कोणत्याही रस्त्यावर वाहन चालवत असतांना त्यांच्या वाहनाचा वेग गरजेनुसार ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. याच्या मदतीने तुम्ही स्वतःला आणि तुमच्या कुटुंबाला कोणत्याही अनुचित घटनेला बळी पडण्यापासून वाचवू शकता.