भारतातील यूट्युबर्स किती आणि कसा पैसा कमावतात?, जाणून घ्या…
पैसा हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्वाचा भाग आहे. गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजेच या कोरोनाच्या काळामध्ये सगळं जीवन ऑनलाईन झालं होत, आणि त्यावरून अनेकांनी ऑनलाईन पैसे सुद्धा कमविले होते. (How much and how do Youtubers earn in India?, Know)
तुम्हाला जर माहिती असेल तर मोठं मोठे सेलेब्रिटीना त्यांच्या पोस्ट वरून, इंस्टाग्राम च्या माध्यमातून पैसे मिळत असतात. तसेच युट्युब वरून देखील असंख्य भारतातील लोक पैसे कमवत असतात.
पण तुम्हाला माहिती आहे का की , युटूबवरून पैसे कसे कमवल्या जातात? आणि भारतातील यूट्युबर्स असे किती पैसे कमावतात? याबाबत तुम्हालाही विचार आला असेल तर आज यामध्ये याच प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात.
जगभरामध्ये यूट्युबचे २.३ अब्ज पेक्षा जास्त युजर्स आहेत. २०२० मध्ये यूट्युबच्या वार्षिक कमाईमध्ये ३०.४ टक्के वाढ झाली आहे. एका वर्षामध्ये यूट्युबने १९. ७ बिलियनची कमाई सुद्धा केली आहे.
यूट्युबवरच असलेल्या लोकप्रिय मुलांची चॅनल, रायन्स वर्ल्डनं २०२० मध्ये २९.५ मिलियन डॉर्लसची कमाई केली. भारतात असे काही व्यक्ती आहेत, जे यूट्युबच्या माध्यमातून भरपूर पैसे कमवतअसतात.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हि कमाई होते तरी कशी? तर यूट्युबनं गेल्या तीन वर्षांमध्ये क्रिएटर्स, आर्टिस्ट आणि मीडिया संस्थांना जवळपास ३० अब्ज डॉलर्स दिले आहे.
२०१९ मध्ये, टी-सिरीज हे १०० मिलियन युजर्सचा टप्पा पार करणारं भारतामधल पहिलं यूट्युब चॅनल बनलं आहे. अनेक यूट्युबर्सनी व्ह्युवर्सचे अशक्य वाटणारे आकडे ओलंडले आहेत.
कोरोना साथीमुळे भारतात यूट्युबच्या वाढीला वेग मिळाला. कोरोना साथीच्या रोगापूर्वी, व्हॉट्सअॅप हे भारतातील प्रबळ व्यासपीठ होतं. पण, अॅप अॅनीच्या डेटानुसार, डिसेंबर २०२० मध्ये यूट्युबचे महिन्याचे अॅक्टिव्ह युजर्स ४२५ मिलियन इतके होते.
तर व्हॉट्सअॅपचे महिन्याचे अॅक्टिव्ह युजर्स ४२२ मिलियन होते. युट्युबवर प्रत्येक वेगवगेळ्या कॅटेगिरीज नुसार पैसे मिळत असतात. तुमच्या कुठल्या विषयावर चॅनल बनवलेले आहे ते सुद्धा तितकेच महत्वाचे ठरते.
उदाहरण द्यायचे झाले की कुणाचं टेकनॉलॉजी रिलेटेड चॅनल असेल तर १००० ते २००० व्ह्यूज ला १ ते २ डॉलर मिळत. म्हणजे ७० ते १४० रुपये मिळतात. तुम्हला महिन्याला साठ हजार रुपये सुद्धा मिळू शकतात.
वर्षभरात एखादी व्यक्ती अंदाजे सात लाख 30 हजार रुपये मिळवू शकते. ही संख्या माघेपुढे होऊ शकते. लाईक ला कमेंट ला डिसलाईक ला किंवा सबस्क्राईब ला कुठलाही पैसा मिळत नाही.
असे प्राप्त झालेल्या माहितीनुसार पुढे आले आहे. जे लोक तुमचे व्हिडीओ बघतात त्यावर जे अड्वर्टाइज येत असतात त्याचेच फक्त पैसे मिळतात. जर कुठल्या लोकल कॅटेगरी मधलं तुमचं चॅनल असेल तर मग तिथे तुम्हाला ५००० व्ह्यूज नंतर १ डॉलर मिळतो.
याव्यतिरिक्त यूट्युब पार्टनरशीप प्रोगॅमसाठी अर्ज करून पैसे कमावता येतात. यूट्युब कंटेंट क्रिएटर्सना त्यांच्या चॅनेलची जाहिरातीतील कमाई, चॅनल मेंबरशीप, सुपर चॅट्स, सुपर स्टिकर्स, मर्च शेल्फ्स आणि यूट्युब प्रीमिअम कमाईच्या माध्यमातून पैसे मिळवण्यास देखील मदत करतं.
तुम्ही यासाठी पात्र असल्यास यूट्युब शॉर्ट्स फंडाचा भाग म्हणून तुम्हाला शॉर्ट्स बोनससुद्धा मिळू शकतो. यूट्युब पार्टनरशीप प्रोग्रॅमसाठी पात्र होण्याकरिता, तुमच्या यूट्युब चॅनेलला गेल्या एका वर्ष्यामध्ये म्हणजेच १२ महिन्यात चार हजार वॉच अवर्स आणि १० हजारपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स असणं आवश्यक आहे.
अॅडव्हर्टायझिंग रिव्हेन्यु, चॅनेल मेंबरशीप, सुपर चॅट्स आणि सुपर स्टिकर्स, मर्च शेल्फ, यूट्युब प्रीमिअम रिव्हेन्यु यातील उत्पन्नाचा काही भाग यूट्युब आपल्या पात्र क्रिएटर्सना देतं असत.
तुमचे व्ह्युज जर भारतामधून मिळत असतील तर प्रतिहजार व्हिडिओ व्ह्युजमागे तुम्हाला १.५ ते ३ डॉलर्स मिळू शकतात. पण, जर तुमचे दर्शक युनायटेड स्टेट्समधील असतील तर तुम्हाला २ ते ४ चार डॉलर्स मिळू शकतात.
सीपीएम अंदाजानुसार तुम्ही यूट्युबवर किती पैसे कमवू शकता हे अचूकपणे सांगणं कठीण आहे. प्राप्त झालेल्या माहितीदरम्यान भारतामधले युटूबर वेगवेगळ्या श्रेणीसाठी वेगवेगळे पैसे मिळवत असतात.
कॉमेडी व्हिडिओसाठी २२ ते ३० हजार रुपये, म्युझिक व्हिडिओसाठी ७ ते ११ हजार, टेक्नॉलॉजी व्हिडिओसाठी १४ ते २२ हजार, रोस्टिंग व्हिडिओसाठी १८ ते २९ हजार, फूड व्हिडिओसाठी ७ ते ११ हजार आणि गेमिंग व्हिडिओसाठी ७ ते १४ हजार रुपये मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
यूट्युब हे भारतातील प्रबळ व्यासपीठ आहे. यामुळे तुम्ही सुद्धा युट्युब वर चॅनल उघडू शकता, आणि पैसे कमवू शकता. फक्त यासाठी तुम्हला तुमचा पूर्ण वेळ आणि स्ट्रॅटेजि हवी.