असा जगभरात झाला योग साधनेचा प्रचार आणि प्रसार!!!
२१ जून हा दिवस प्रत्येकवर्षी भारतासह जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. योग ही भारतीय संस्कृतीकडून जगाला मिळालेली एक देणगी आहे जी निरोगी राहण्यास मदत करते.
याकडे दुर्लक्ष करून माणूस स्वतःची फसवणूक करतो. या योगदिनाच्या निमित्ताने आपण योगाभ्यासाची सुरुवात आणि त्याचा प्रचार कसा झाला, याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.
योग साधनेचा इतिहास सुमारे ५००० वर्षांपूर्वीचा आहे. मानसिक, शारीरिक आणि अध्यात्माच्या रूपात, लोक प्राचीन काळापासून त्याचे पालन करत आले आहेत. अगस्त्य ह्या सप्तर्षींपैकी एक असणाऱ्या ऋषींनी संपूर्ण भारतीय उपखंडाचा दौरा केला आणि योगमार्गाने जगण्याची संस्कृती निर्माण केली.
योगाचा उगम प्रथम भारतात झाला आणि त्यानंतर तो जगातील इतर देशांमध्ये लोकप्रिय झाला. योग साधनेचा विचार केला तर पतंजलीचे नाव ठळकपणे घेतले जाते. याचं कारण म्हणजे पतंजली हे पहिले आणि एकमेव व्यक्ती होते ज्यांनी योग साधनेला श्रद्धा, अंधश्रद्धा आणि धर्मातून बाहेर काढून एक पद्धतशीर स्वरूप दिले. त्यामुळे आपण म्हणू शकतो की अगस्त्य ऋषींनी योग साधनेचा पाया घातला आणि पतंजलींनी त्यावर कळस चढवला.
योग साधनेचा इतिहास सुमारे ५००० वर्षांपूर्वीचा आहे. मानसिक, शारीरिक आणि अध्यात्माच्या रूपात, लोक प्राचीन काळापासून त्याचे पालन करत आले आहेत. अगस्त्य ह्या सप्तर्षींपैकी एक असणाऱ्या ऋषींनी संपूर्ण भारतीय उपखंडाचा दौरा केला आणि योगमार्गाने जगण्याची संस्कृती निर्माण केली.
योगाचा उगम प्रथम भारतात झाला आणि त्यानंतर तो जगातील इतर देशांमध्ये लोकप्रिय झाला. योग साधनेचा विचार केला तर पतंजलीचे नाव ठळकपणे घेतले जाते. याचं कारण म्हणजे पतंजली हे पहिले आणि एकमेव व्यक्ती होते.
ज्यांनी योग साधनेला श्रद्धा, अंधश्रद्धा आणि धर्मातून बाहेर काढून एक पद्धतशीर स्वरूप दिले. त्यामुळे आपण म्हणू शकतो की अगस्त्य ऋषींनी योग साधनेचा पाया घातला आणि पतंजलींनी त्यावर कळस चढवला.
योग साधनेचा उगम भारतात झाला व त्याचा जगभर प्रचार आणि प्रसार करण्याचे श्रेय स्वामी विवेकानंदांना दिले जाते. १८९३ मधील शिकागो येथील विश्व धर्म परिषदेतील त्यांचे जग प्रसिद्ध भाषण झाले. त्यामुळे पाश्चात्य लोकांची भारतीय आध्यात्माबद्दलची जिज्ञासा त्यांना जाणवली.
स्वामी विवेकानंद अनेकदा आपल्या परदेशातील वास्तव्यात भारताची संस्कृती आणि परंपरा लोकांना सांगत असत. १८९६ मध्ये त्यांनी पातंजल योगसूत्राची पाश्चात्य जगासाठी तयार केलेली आवृत्ती ‘राजयोग’ या नावाने प्रसिद्ध आहे.
त्याचबरोबर त्यांनी ज्ञानयोग, भक्तीयोग, कर्मयोग यांचीही ओळख करून दिली. पण त्यांनी कधीही थेट योग साधना कुणालाच शिकवली नाही. कारण स्वामी रामकृष्ण परमहंस यांची त्यांना तशी आज्ञा होती.
विवेकानंदांची ही परंपरा परमहंस योगानंद, महर्षी महेश योगीजी यांच्यासारख्या अनेक योगगुरूंनी पाश्चिमात्य देशांमध्ये पुढे चालू ठेवली.
नंतर, १९८० पर्यंत, पाश्चात्य देशांमध्ये अनेक योग शिबिरे आयोजित केली गेली, त्यानंतर लोकांच्या जीवनात बरेच बदल दिसून आले. शारीरिक आणि मानसिक बळ वाढवण्यासाठी योग साधना आवश्यक आहे, हे लोकांना स्वतःच समजले.
तिरुमलाई कृष्णमाचार्य हे भारतीय योग शिक्षक, आयुर्वेदिक उपचार करणारे आणि विद्वान होते. आधुनिक योगाचे सर्वात महत्त्वाचे गुरु म्हणून त्यांना पाहिले जाते. त्यांच्या व्यापक प्रभावामुळे आसन योगाचा विकास झाला, म्हणून त्यांना “आधुनिक योगाचे जनक” म्हटले जाते.
वयाच्या २८-३० च्या आसपास कृष्णमाचार्य यांनी योगशिक्षण घेण्यास सुरूवात केली. बनारस हिंदू विद्यापीठ – वाराणसी येथील मित्राच्या सल्ल्यानुसार त्यांनी योगेश्वर राममोहन ब्रह्मचारी नावाच्या गुरुंचा शोध घ्यायचा होता, हे गुरु हिमालयात राहत आणि ७००० आसने करण्याची त्यांची सवय होती.
या गुरूंकडे जाण्यासाठी, कृष्णमाचार्य यांना सिमला येथील व्हाइसरॉय लॉर्ड आयर्विन यांची परवानगी घ्यावी लागली, व्हाइसरॉय त्यावेळी मधुमेहाने ग्रस्त होते. व्हाईसरॉयच्या विनंतीनुसार, कृष्णमाचार्य यांनी सिमला येथे येऊन व्हाइसरॉयला सहा महिने योगशास्त्र शिकवले.
व्हाइसरॉयची तब्बेत सुधारली आणि कृष्णमाचार्यांबद्दल त्यांना आदर आणि आपुलकी निर्माण झाली. १९१९ मध्ये, व्हाईसरॉयने कृष्णमाचार्यांच्या तिबेटच्या प्रवासाची व्यवस्था केली, तीन सहाय्यक सोबत दिले आणि खर्चाची काळजी घेतली.
अडीच महिने चालल्यानंतर, कृष्णमाचार्य श्री ब्रह्मचारींच्या शाळेत पोहोचले, कथितपणे कैलास पर्वताच्या पायथ्याशी एक गुहा आहे , जिथे गुरु आपली पत्नी आणि तीन मुलांसह राहत होते. ब्रह्मचारींच्या अधिपत्याखाली, कृष्णमाचार्य यांनी साडेसात वर्षे पतंजलीच्या योगसूत्रांचा अभ्यास, आसन आणि प्राणायाम शिकण्यात आणि योगाच्या उपचारात्मक पैलूंचा अभ्यास केला.
गुरखा भाषेत योग कोरुंता याचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी गुरखा भाषाही शिकून घेतली. कृष्णमाचार्य यांनी ३,००० आसनांवर प्रभुत्व मिळवल्याचा दावा केला. त्यांनी २ मिनिटांसाठी त्याची नाडी किंवा हृदयाचे ठोके थांबवून काही उल्लेखनीय कौशल्ये विकसित केली.
त्यांनी बीकेएस अय्यंगार आणि पट्टाभी जोईस यांसारख्या आधुनिक योगगुरूंना प्रशिक्षण दिले. त्यांच्या शिष्या इंद्रा देवी यांनी योगासने पाश्चात्य जगाला शिकवली. त्यांनी जगभर त्याचा वारसा आणि शिकवण चालू ठेवली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ सप्टेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत योग या विषयाबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर काही उपक्रम करता यावा म्हणून पुढाकार घेतला. यानंतर, ११ डिसेंबर २०१४ रोजी, संयुक्त राष्ट्रातील १७७ सदस्यांनी २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून मंजूर केला.
हा दिवस २१ जून २०१५ रोजी प्रथमच साजरा करण्यात आला, असे मानले जाते की २१ जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस आहे आणि योगामुळे मनुष्याचे आयुष्य देखील वाढते.
योगाला धर्म, पंथ नाही. योग ही मानवी शरीरासाठी आवश्यक बाब आहे, ज्याचे भरपूर फायदे आहेत. म्हणून योग करा व निरोगी रहा. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!.!.!