एटीएम मधून फाटलेली नोट बाहेर आली तर? नेमकं करायचं तरी काय?
एटीएम हे प्रत्येकाजवळ असत, आधी एटीएम नव्हते तर बँक मध्ये रांगेत लागून पैसे काढण्याकरिता तासंतास उभे राहावे लागायचे. पण जेव्हा एटीएम आल तेव्हा कुठल्याही रांगेत उभं न राहता, अगदी चोखपणे कधी ही पैसे काढणे शक्य झाले. (What if a torn note comes out of an ATM? What to do exactly?)
आता एटीएम मधून पैसे काढणे यूजर फ्रेंडली झाले आहे. पण, कधी कधी आपण एटीएममधून पैसे काढताना फाटलेल्या नोटा बाहेर येत असतात आणि त्यामुळे ग्राहकांना अडचणी येत असतात. कारण या फाटलेल्या नोटांना कोणताही दुकानदार घेत नाही आणि त्यामुळे तुम्हाला नाईलाजाने त्या त्रासाचा सामना करावा लागतो.
तुमच्या सोबत सुद्धा कधीतरी असं झालं असेलच की एखादी फाटलेली नोट एटीएम मधून निघाली असेल आणि ती कुठलाही दुकानदार घेत नसेल… तर तुम्हाला सुद्धा त्यावेळी हा प्रश्न नक्कीच पडला असेल की आता नेमकं करायचं तरी काय? तर आता तुम्हाला चिंता करायची आवश्यकता नाही कारण आपण आज याच बदल चर्चा करणार आहोत.
एटीएममधून फाटलेल्या नोटा जर आल्या, तर त्या बदलण्यासाठी तुम्हाला ज्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढले जाते त्या बँकेकडे अर्ज करावा लागतो. या अर्जामध्ये एटीएमची तारीख, वेळ आणि ठिकाण लिहावे लागेल. तसेच तुम्हाला पैसे काढण्याची स्लिप जोडावी लागेल. जर तुमच्याकडे स्लिप नसेल तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर आलेल्या मॅसेजची माहिती द्यावी लागेल.
आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कोणतीही सरकारी बँक सहजपणे नोटा बदलून देऊ शकते. त्यामुळे आता तुम्हाला फाटलेल्या नोटा सहजपणे बदलून मिळू शकतात आणि या प्रक्रियेला जास्त वेळ सुद्धा लागत नाही. बँकेने दिलेल्या माहिती नुसार ट्विटरवर एका ग्राहकाच्या तक्रारीची माहिती देताना बँकेने या परिस्थितीत ग्राहकांनी कोणती पावले उचलली पाहिजेत हे सुद्धा सांगितले आहे.
आरबीआयच्या म्हणण्यानुसार, एटीएममध्ये नोटा लोड करण्यापूर्वी, त्या अत्याधुनिक नोट सॉर्टिंग मशीनद्वारे तपासल्या जात असते. त्यामुळे फाटलेल्या नोटा ग्राहकांना मिळू शकत नाही. तरी सुद्धा एखादी नोट फाटलेली आढळली, तर तुम्ही कोणत्याही शाखेतून नोटा सहजपणे बदलून घेऊ शकता.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तक्रार कशी नोंदवायची तर चला या बद्दल जाणून घेऊयात. उदाहरण सांगायचं झालं तर, जर का स्टेट बँक शाखेच्या एटीएममशीन मधून फाटलेल्या नोटा आल्या तर, स्टेट बँकेच्या माहितीनुसार, एचटीटीपीएस कोलन डबल स्लॅश सीआरसीएफ डॉट एसबीआय डॉट को डॉट इन स्लॅश सीसीएफ स्लॅश या वेब साईट वर देखील तुम्ही तक्रार करू शकता.
ही लिंक फक्त स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमसाठी आहे. लक्षात ठेवा तुम्हाला कुठलीही बँक, एटीएममधून फाटलेल्या नोटा बदलण्यास नकार देऊ शकत नाही. असे असताना सुद्धा बँकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास बँक कर्मचाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. ग्राहकांच्या तक्रारीच्या आधारे बँकेला १० हजारांपर्यंतचे नुकसान भरपाई करून द्यावे लागू शकते.