ताज्या बातम्यामाहितीपूर्ण

पोलिसांनी आपल्यावर हात उचलला तर काय करायचं? एकदा नक्की वाचा…

पोलिसांनी हात उचलल्यावर आपणही त्यांच्यावर हात उगारला तर काय होईल, माहितीये? काही माणसांना चटकन राग येतो. कोणी आपल्यावर हात उचलला हे त्यांना सहन होत नाही आणि समोर कोण आहे, हे न बघता ते पोलिसांवर हात उचलतात.

मारण्यासाठी पोलिसांच्या अंगावर धावून जातात. पण आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे आपण गुन्हेगार असो किंवा नसो कधीही पोलिसांनी आपल्यावर हात उचलल्यास आपण त्यांना परत फिरून मारण्याचं धाडस करू नये.

कारण कायद्यात हे स्पष्ट नमूद केलं आहे की, पोलिसांशी असभ्य भाषेत वर्तन आणि पोलिसांना मारहाण हा कायद्याने गुन्हा आहे. त्यानुसार IPC ३५३ आणि ३३२ नुसार गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. आपल्याला कठोरातली कठोर शिक्षा होऊ शकते.

पण पोलिस विनाकारण मारत असतील तर काय करायचं?

पोलिस विनाकारण मारत असतील तरी देखील आपण त्याच्यावर हात उगारु शकत नाही. त्यावेळी प्रतिकार न करता आपल्याला मार खावाच लागतो. परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपल्याला स्वत:वर ताबा ठेवावाच लागतो.

पोलिसांना काय अधिकार असतात –

पोलिस आपल्या कायद्याचे रक्षक असतात त्यामुळे कायद्यानेच त्यांना आवश्यक प्रसंगी बळाचा वापर करण्याचा अधिकार दिलेला असतो. त्यामुळेच त्यांना ठराविक प्रसंगी ठरविक व्यक्तीवर हात उचलण्यासाठी कोणाच्याही संमतीची आवश्यकता नसते.

आपल्याला कायदा काय अधिकार देतो –

आपण गुन्हेगार असू आणि पोलिसांनी आपल्याला बेदम मारलं असेल तर आपल्याला कोणत्याही प्रकारे कायद्याची मदत होत नाही. आपल्याला शिक्षा भोगावीच लागते.

मात्र जर आपण गुन्हेगार नसू आणि पोलिसांनी आपल्यावर राग काढण्याच्या हेतुने किंवा कोणत्याही पुराव्याशिवाय हात उचलला असेल,

आपल्याला मारलं असेल तर आपल्या बाजूने कायदा उभा राहतो. मारहाण झाल्यानंतर आपण त्या पोलिस अधिकाऱ्यावर थेट FIR दाखल करू शकतो. किंवा कोर्टात अधिकाऱ्याविरुद्ध केस दाखल करू शकतो.

कोणत्या वेळी पोलिसांना मारण्याचा आपल्याला अधिकार आहे –

पोलिसांनी आपल्यावर हात उगरल्यावर आपण त्यांना परत फिरून मारू शकत नाही हे आपण आतापर्यंत जाणून घेतलं पण पोलिस मारत असताना आपला जीव जाईल अशी वेळ आली किंवा पोलिस कारण नसताना आपल्याला जीवानीशी मारत असतील तर आपण आपल्या संरक्षणसाठी पात्र ठरतो.

त्यावेळी आपण स्वत:च्या संरक्षणासाठी पोलिसांवर हात उचलून स्वत:चा बचाव करू शकतो. जर पोलिस आपला जीव घेतच असेल आणि स्वत:च्या संरक्षणासाठी तुम्ही जर पोलिसांना मारलं आणि पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला तर त्या हत्येसाठी आपण गुन्हेगार ठरत नाही.

या कारणांसाठी आपल्याला पोलिसांवर केस करता येते –

IPC ९९ नुसार पोलिस आपल्याला मारहाण करताना जर आपला एखादा अवयव तुटून आपल्याला अपंगत्व आलं आणि आपण साधारण वीस दिवसांपेक्षा अधिक काळ रुग्णालयात दाखल असू, आपल्यावर उपचार सुरू असतील तर आपण पोलिसांवर केस करू शकतो.

आपल्या नुकसानाची भरपाई करून घेऊ शकतो. पण जर आपण गुन्हेगार असू तर आपण पोलिसांवर केस करू शकत नाही उलट आपल्यालाच शिक्षा भोगावी लागेल.

सगळेच पोलिस मारतात का ?

मुळातच पोलिसांना एखाद्यावर विनाकारण आपलं बळ दाखवण्यासाठी तैनात केलेलं नसतं. त्याच्याकडे गुन्हेगार आणि सभ्य व्यक्ती ओळखण्याची दृष्टी असते.

त्यामुळे विनाकारण कोणताही पोलिस अधिकारी सामान्य व्यक्तीला मारहाण करत नाही. त्यांना कायद्याची तंतोतत ओळख असते.

मात्र शुभ्र दुधात माशी पडल्यानंतर जसं ते पूर्ण दूध खराब वाटतं त्या माशीप्रमाणे काही पोलिस अधिकारी असतात जे स्वत:च्या गैरवर्तनामुळे संपूर्ण पोलिस दलाचं नाव खराब करतात.

असाच कोणी अधिकारी जर कधी तुमच्या वाट्याला आला किंवा तुमच्यावर असा प्रसंग ओढवला तर वरील सर्व गोष्टी माहित असणं गरजेचं ठरतं.

तुम्हाला हा लेख कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपले कुटुंबीय आणि मित्रपरिवारालाही ही माहिती देण्यासाठी हा लेख पाठवायला विसरू नका.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button