ताज्या बातम्याट्रेंडिंग

रेल्वेतून खाली पडली महिला, जवानाने जीवाची बाजी लावून वाचवला जीव…थरार कॅमेऱ्यात कैद

अति घाई संकटात नेई हे सर्वांनाच माहिती असून काही लोक स्वतःचा जीव धोक्यात टाकत असतात. पण अति घाईमुळे अनेकांनी रेल्वे प्रवासामध्ये आपला जीव गमावला आहे. धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न,असो किव्हा खाली उतरण्याचा प्रयत्न असो. (Woman fell from the train, jawan saved her life by risking her life…caught on camera)

असेच एका व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये एका महिलेच्या अति घाईमुळे चालत्या रेल्वे मधुन उतरण्याच्या प्रयत्नात अकोल्याच्या रेल्वे स्थानकावर काचिगुडा एक्सप्रेसमधून महिला प्रवाशासोबत असाच एक प्रकार घडला. मात्र रेल्वे पोलिसाच्या समसूचकतेमुळे तिचा जीव वाचला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. आणि हा व्हडिओ प्रचंड व्हायरल झाला.

२६ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता, रेल्वे क्रमांक- १७६४१ काचीगुडा एक्सप्रेस अकोला स्थानकावरुन रवाना होत असताना, एक प्रवासी महिला चालत्या ट्रेन मधून खाली उतरण्याचा प्रयत्न करत होती. पण त्यावेळी तिचा तोल गेल्याने ती रेल्वेच्या दारातून खाली रेल्वे जवळ पडली.

बाजूला रेल्वेच्या पायऱ्यावरून खाली उतरत असलेल्या रेल्वे पोलिसाच्या कर्मचाऱ्याला ही महिला खाली पडताना निदर्शनास आली. त्यांनी लगेच तिच्याकडे धाव घेतली आणि त्या प्रवासी महिलेला रेल्वेपासून बाजूला केलं.

हा सर्व प्रकार अकोल्याच्या स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून ,धुर्वे यांच्या या धाडसी कृत्याचं सर्वत्र कौतूक केलं जातं आहे.हजारांहूनही जास्त लोकांनी पहिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button