ट्रेंडिंगताज्या बातम्या

राजकारण्यांची शाळा घेणारे Ajit Pawar नेमके कितवी शिकले आहेत?

अजित अनंतराव पवार हे नाव आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील तरुण पिढीचे नेते म्हणून ओळखले जात होते. रोखटोक आणि थेट बोलण्यासाठी व तात्काळ निर्णय घेणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. अजितदादांना ग्रामीण भागाची देखील चांगली जाण आहे, त्यामुळे अजित पवार म्हणजे तळागाळातील नेते म्हणून ओळखले जातात.

त्यांचा स्पष्टवक्तेपणा देखील तितकाच प्रभावी आहे. आपल्या स्पष्टवक्तेपणातून ते मोठमोठ्या नेत्यांना राजकारणाचे धडे देतांना दिसतात. मात्र या राजकारण्यांची शाळा घेणाऱ्या अजित पवारांचे शिक्षण किती झाले आहेत हे तुम्हाला माहित आहे का? अजित पवार यांच्या शैक्षणिक प्रवासाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील असे नाव आहे ज्या नावाची चर्चा प्रसार माध्यमांमध्ये कायम पाहायला मिळते. अजित पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. मूळचे ते पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील कटेवाडी या गावाचे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांचे ते पुतणे आहेत.

अजित पवारांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या जन्मस्थानी म्हणजेच त्यांच्या आजोळगावी पूर्ण झाले. पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी मुंबई गाठली आणि मुंबईत त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. वडिलांच्या आकस्मिक निधनाने ते बारामतीला परतले आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. पुढे सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कारकीर्दीची सुरुवात झाली.

१९८२ साली अजित पवारांची सहकारी साखर कारखान्याच्या मंडळावर निवड झाली आणि तेव्हापासूनच ते राजकारणात सक्रिय झाले. १९९१ साली ते पुण्यातील जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवडून आले आणि या पदावर सुमारे १६ वर्ष त्यांनी कार्य केले. हाच तो काळ होता जेव्हा बारामतीतून त्यांची खासदार म्हणून देखील निवड झाली होती. याच मतदारसंघातून ते सलग ५ वेळा निवडून आले.

२३ ते २६ नोव्हेंबर २०१९ पर्यंत अजित पवार ८० तासांपेक्षाही कमी काळ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले आणि यामुळेच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या भाजप- राष्ट्रवादी या महाविकासआघाडी सरकारच्या काळात सर्वात कमी कालावधीनंतर त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळाले. २०१० ते २०१४ सालापर्यंत त्यांनी हा पदभार सांभाळला.

२०१९ साली जेव्हा भाजप ने शिवसेनेसोबत युती केली तेव्हा सत्तावाटपावरून वाद निर्माण झाला आणि ती युती तुटली. पुढे शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले आणि अजित पवार यांना पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पद मिळाले. ३० डिसेंबर २०१९ सालापासून ते या जुलै महिन्यात शिवसेना पक्षात बंडखोरी होईपर्यंत ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. सध्या ते विरोधी पक्षनेते पदी आहेत.

उपमुख्यमंत्री पदी असतांना देखील अजित पवारांवर त्यांच्या परखड विधानांमुळे अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते, त्यांच्या वक्तव्यांबद्दल त्यांना कित्येकदा माफी देखील मागावी लागली.

अजित पवार पुण्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक पदावर आजही कार्यरत आहेत व ते पुण्यातील छत्रपती शिक्षण संस्थेचे संचालक पद देखील सांभाळतात.

पहा विडिओ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button