ताज्या बातम्याट्रेंडिंग

एका वृद्धाच्या हट्टासाठी एवढं मोठं घर लोकांनी एका जागेवरून नेलं दुसऱ्या जागी…

माणसाचं वय झालं आणि माणूस म्हातारा झाला की त्याला गरज भासते ती म्हणजे नातेवाईकांची. एकटेपणा माणसाला खूप खात असतो असं म्हटलं जातं. उतारवयात मुलं जवळ राहिली की थोडा आधार वाटत असतो. (People moved such a big house from one place to another because of an old man.)

पण खरं तर माणूस या वयात आला की, त्याचा हट्टीपणा तितकाच वाढतं असतो. आता बघा ना मिळालेल्या माहितीनुसार, एका गावात एक वयस्कर माणूस एकटाच राहत होता.

वृद्ध व्यक्तीच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. त्याच्या जवळ त्याला सांभाळायला कुणीच नव्हतं. गावकऱ्यांनी त्याला खूप समजावलं की त्याने नातेवाईक, मुलाच्या जवळ जाऊन राहावं, ते काही अंतरावर दुसऱ्या घरात राहत होते.

त्यांची मुले आणि नातवंडेही इतरत्र राहत असत. पण तो इतका हट्टी माणूस होता की कुणाचं काहीही ऐकायला तयार नव्हता. वयस्कर माणसाच्या कुटुंबीयांनी अनेकदा त्यांना त्यांच्याजवळ शिफ्ट व्हायला सांगितलं, पण तिथे रिकामं घर नव्हतं.

अशा परिस्थितीत स्थानिक लोकांनी या वृद्ध व्यक्तीचे घर उचलून नेले. हे अशक्य काम सुमारे २४ लोकांनी मिळून शक्य करून दाखवले.
गुड न्यूज मुव्हमेंट नावाच्या अकाऊंटसह हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.

नुकतंच झोपडीसारखं घर उचलून ते दुसऱ्या ठिकाणी हलवतानाचा व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय. या व्हिडीओ मध्ये दिसतंय की काही लोक ७ फूट उंचीचं घर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी खांद्यावर ओढून नेतायत. या व्हिडिओची आणि माणसाच्या हट्टीपणाची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button