ट्रेंडिंगताज्या बातम्या

नीता ट्रॅव्हल्सचा मालक कोण? Raj Thackeray का Neeta Ambani

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत केलेल्या बंडानंतर ते समर्थक आमदार व खासदारांसोबत सुरत मध्ये असणाऱ्या ले मेरेडियन हॉटेलमध्ये राहिले, त्यानंतर अनेक गोष्टींची चर्चा सुरु झाली. यामुळे एकनाथ शिंदेंसोबत सर्व आमदार सुरतहून थेट गुवाहाटीला गेले. सुरतच्या विमानतळावर त्यांना एका खासगी बसने पोहोचविण्यात आले, ज्या बसने हे सर्व आमदार विमानतळावर आले ती बस होती नीता ट्रॅव्हलसची.

या नीता ट्रॅव्हल्सविषयी अनेक चर्चा होतांना पाहायला मिळतात, कोणाला ही नीता ट्रॅव्हल्स राज ठाकरेंची वाटते तर कुणी ही नीता ट्रॅव्हल्स नीता अंबानींची असल्याचे देखील बोलतात. यामागील असणारं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत.

नीता ट्रॅव्हल्सबद्दल अनेक अफवा पसरवल्या जातात, कोणी याला राज ठाकरेंच्या मालकीची सांगतं तर कोणी चक्क नीता अंबानी यांच्या. मात्र राज ठाकरे आणि नीता ट्रॅव्हल्स यांचा दूरदूरपर्यंत काहीही संबंध नाही. कारण राज ठाकरेंच्या घरात असे कोणीही नाही ज्याचे नाव नीता आहे.

अफवांनुसार राज ठाकरे ते त्यांच्या कार्यक्रमादरम्यान, सभे दरम्यान किंवा कुठला दौरा असला त्यादरम्यान कायम नीता ट्रॅव्हल्सचा वापर करतांना दिसतात यामुळे नीता ट्रॅव्हल्स त्यांची आहे असे सांगण्यात येते, मात्र यात काहीही सत्यता नाही.

काही लोक ही ट्रॅव्हल्स नीता अंबानींची असल्याचे देखील सांगतात. नीता अंबानी एक ट्रॅव्हल कंपनी नक्कीच चालवू शकतात मात्र एवढ्या श्रीमंत व्यक्तीने स्वतःच्या नावावर खासगी ट्रॅव्हल कंपनी उभी करणे हे अशक्य आहे.

अंबानींच्या श्रीमंतीची चर्चा जगभरात आहे. बॉलिवूड कलाकरांना तर अंबानी आपल्या बोटांवर नाचवल्याचे देखील अनेक उदाहरणे आहेत. इतकी श्रीमंती असणाऱ्या नीता अंबानी एक खासगी ट्रॅव्हल एजन्सी चालवतील यात काही तथ्य नाही.

आता प्रश्न उपस्थित होतो की हि ट्रॅव्हल कंपनी नेमकी आहे कुणाची? नीता ट्रॅव्हल्सचे खरे मालक आहे बिझनेसमॅन सुनील सावला. सुनील सावला मुंबईचे असून, २००० साली त्यांनी नीता ट्रॅव्हलसची स्थापना केली. नीता ट्रॅव्हल्सला नीता वोल्वो आणि नीता बेन्झ या नावाने देखील ओळखले जाते. या कंपनीचे मूळ नाव आहे नीता टूर्स अँड ट्रॅव्हल्स.

नीता ट्रॅव्हल्सकडे वेगवेगळ्या कंपनीजच्या गाड्या आहेत, ज्यात टाटा, अशोक लेलँड, वोल्वो, मर्सिडीज बेन्झ यांसारख्या कंपनींचा समावेश आहे. मुंबई आणि पुणे या दोन शहरात या कंपनीचे हेडक्वार्टर असून, कंपनीच्या बसेस तब्बल ९३७ मार्गांवर आपली सेवा देतात. यामध्ये महाराष्ट्र, गोवा, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश इत्यादी राज्यांचा समावेश आहे. नीता ट्रॅव्हल्सच्या मालकीच्या स्वतःच्या १३०० पेक्षाही अधिक बसेस आहेत.

सुनील सावला यांच्या कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर ३१ कोटींपेक्षा जास्त असल्याचे बोलले जाते. नीता ट्रॅव्हल्सची राज्यात १७० ठिकाणी बससेवा आहे. या सेवेत वाढ करण्याचं कंपनीचं लक्ष असल्याचं देखील सुनील सावला यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होत. सुनील सावला यांनी मुंबई सारख्या शहरातून आपल्या व्यवसायाची सुरुवात केली, आणि आज त्यांनी सुरु केलेली कंपनी नीता ट्रॅव्हल्सचे नाव सर्वत्र प्रसिद्ध आहे.

पहा विडिओ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button