ताज्या बातम्याट्रेंडिंग

जिममध्ये जाणाऱ्या फिटनेस प्रेमींना हृदयविकाराचा झटका का येतो?

नुकतेच अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी याचे वर्कआउटदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली,अलीकडेच कॉमेडीयन राजू श्रीवास्तवपासून अभिनेता .सिद्धार्थ शुक्लापर्यंत यांना जिम करत असतानाच हृदयविकाराचा झटका आला. हल्ली तरुण लोक अधिकाधिक हार्ट अटैक चे शिकार होत आहेत. (Why do gym goers get heart attacks?)

तर गेल्या काही वर्षांत जिममध्ये वर्कआऊट करताना हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत जिम मध्ये व्यायामासाठी जाणाऱ्यांमध्ये एवढी गंभीर समस्या का वाढत आहे, असा प्रश्न उपस्थित होतो . हृदयविकारांपासून दूर राहण्यासाठी मी जिमला जाणे बंद करावे का? असा प्रश्न तरुणांना पडतो. तर जिममध्ये जाणाऱ्या फिटनेस प्रेमींना हृदयविकाराचा झटका का येतो?

त्यानंतर अनेक लोकांच्या समोर हा प्रश्न पडला आहे की, जिममध्ये व्यायाम करणे योग्य की अयोग्य? वर्कआउट करताना हृदयविकाराचा झटका का येतो आणि कोणत्या चुका टाळायला हव्या हेच आपण थोडक्यात जाणून घेऊयात. तर व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका का येतो?

कोणत्याही व्यक्तीने शारीरिक क्षमता लक्षात घेऊनच व्यायाम केला पाहिजे, कारण शरीराची विशिष्ट क्षमता असते. बऱ्याचदा कमी शारीरिक क्षमता असूनही अनेकजण जिममध्ये जास्त वर्कआऊट करतात. ज्यामुळे त्यांच्या हृदयावर वाईट परिणाम होतो. हृदयविकाराचा धोका तुमच्या वयावरही अवलंबून असतो.

असे मानले जाते की दररोज व्यायाम करणाऱ्या तरुणांना हृदयविकाराचा धोका कमी असतो, तर रोज व्यायाम करणाऱ्या वृद्धांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो. मात्र गेल्या काही वर्षांत तरुणांमध्येही हृदयविकाराचा धोका खूप जास्त असल्याचे दिसून येत आहे.
आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका किंवा इतर प्रकारच्या दुखापतींचे मुख्य कारण म्हणजे आपण आपल्या क्षमतेपेक्षा जास्त वजन उचलू लागतो किंवा कमी वेळात अधिक व्यायाम करण्याचा प्रयत्न करतो.

तर जास्त लाभ मिळवण्यासाठी अधिक तीव्रतेचा व्यायाम करतो. व्यायाम नेहमी तुमचा स्टॅमिना लक्षात घेऊनच केला पाहिजे. व्यायामादरम्यान तुम्हाला वेदना, अस्वस्थता, मळमळ, चक्कर येणे किंवा छातीत दुखत असल्यास, व्यायाम ताबडतोब थांबवा. जर तुम्हाला आधीच हृदयविकाराचा त्रास होत असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच व्यायाम करा आणि स्वतःसाठी नेहमीच योग्य व्यायामाची निवड करा.

जेणेकरून हृदयावर अतिरिक्त दबाव पडणार नाही. बैठ्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. हृदय निरोगी ठेवण्यासाठी, आपण सक्रिय असणे महत्वाचे आहे. पण फिटनेससाठी शरीराला झेपेल एवढाच व्यायाम केला जाणे अपेक्षित असताना, अलीकडच्या काळात त्यापेक्षा अतिरिक्त व्यायाम करण्याकडे कल वाढल्याचे दिसून येते.

कधीकधी अति व्यायामामुळे शरीराला धोका निर्माण होत असल्याने तब्येतीनुसारच व्यायाम केला जावा, चाळीशीनंतर व्यायाम करणार असाल तर व्यायाम करण्यापूर्वी वय आणि शारीरिक प्रकृतीची विचार करावा. ‘एक्सरसाइज’ आणि ‘एक्झर्शन’ मध्ये थोडा फरक आहे, म्हणून जर तुम्ही जास्त व्यायाम करणार असाल; तर व्यायामापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button