ताज्या बातम्याट्रेंडिंग

आपल्याला फास्ट गाडी चालवण्याची इच्छा का होते? यामागे आहे वैज्ञानिक कारण…

हाय स्पीड मध्ये गाडी चालवणं मुलांना खूप आवडत. आज काल गाडी चालवत असताना समोरच्या गाडीला ओव्हरटेक करायचे प्रमाण अतिशय वाढले आहे. (Why do you want to drive fast? There is a scientific reason behind this…)

 

कारण काहीच नसत पण एखाद्या व्यक्ती ची गाडी आपल्या गाडीच्या पुढे गेली, की आपल्याला काय होत माहित नाही. विशेष करून तरुणांना आपण तुफान वेगाने गाडी चालवतो आणि त्या गाडीला ओव्हरटके करायचा प्रयत्न करत असतो. असं म्हणायला हरकत नाही की आपल्याला त्याला धडा शिकवायचा असतो, किंवा त्याच्या गाडी जवळ जाऊन त्याची खिल्ली उडवायची असते.

हे असं करताना समोरच्या व्यक्तीची कृती पाहून तुमच्या वागण्यात अचानक बदल होतो. एका संशोधनामध्ये वेगवान गाडी चालवायच्या इच्छे चे प्रमाण जास्त वाढलेत ..पण असं का? ड्राइविंग करत असताना अनेकदा आपल्याला फास्ट गाडी चालवायची इच्छा होत असते . आता ही इच्छा का होत असते, तर याला ही सायन्टिफिक रिजन आहे.

आता तुमचा विश्वास बसेल की नाही माहित नाही पण याला मुख्य कारण म्हणजे आपल्याला होत असलेला तणाव आहे. आणि गेल्या २ वर्षा पासून आपण तणावाचाच सामना करतोय. आता तणावा मुळे हे सगळं कसं काय होत असेल बरं? तर जेव्हा आपली तणावाची स्थिती असते किंवा आपण तणावात असतो तेव्हा आपल्या बॉडी मध्ये ओव्हररायडींग फंक्शन सक्रिय होतो.

त्यानंतर व्यक्ती त्याच्या नैसर्गिक स्वभावविरुद्ध वाटेल तस वागतो पण त्याच्या बॉडीच्या हालचाली सामान्य राहतात. पण आपण जेव्हा खूप जास्त तणावाखाली असतो आणि अश्या स्थितीत आपल्याला धोका जाणवल्या सारखा होतो, तेव्हा आपली लिंबिक सिस्टीम म्हणजेच, आपल्या मेंदूचा असा भाग जो आपल्या व्यावहारिक किंवा भावनिक प्रतिसादाशी संबंधित असतो तो सक्रिय होतो.

यातूनच आपण भांडण करणार की सुन्न होणार? याची प्रतिक्रिया आपल्या मनात उमटते, जेव्हा आपली लिंबिक सिस्टीम पूर्ण सक्रिय असते ,तेव्हा ती कमी करणे किंवा इतर ऑप्शन्स चा विचार करणं फार कठीन होऊन जाते . आणि यामुळे आपल्या दैनंदिन कामकाजात समस्या निर्माण होऊ शकतात. एका अभ्यासानुसार, लोक नेहमी आनंददायी अनुभवाच्या शोधात असतात.

त्यांना एखादी संधी मिळाल्यास ते जोखीम पत्करण्यास सुद्धा तयार असतात. आता याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर कोरोना काळात लोकांना एकमेकांना भेटायला खूप मर्यादा होत्या. एकमेकांना भेटता येत नव्हतं मग अश्यात एखादी संधी मिळाली की लोक कोणत्याही परिणामाचा विचार न करता लोकांना भेटण्यासाठी बाहेर पडत असत.

खरं तर लोकांमध्ये वाढलेल्या मानसिक तणावपूर्ण स्थिती मुळे अश्या घटना घडत असतात. म्हणून गाडी चालवत असतांना, गाडी वेगानी घेत असतांना किंवा दुसऱ्याला ओव्हरटेक करण्याआधी आपण आपल्या लिंबिक सिस्टीम बाबत थोडा विचार करावा. आपले मन शांत ठेवावे जेणेकरून तुम्ही तुमच्या सोबत होणाऱ्या दुर्घटनांना टाळू शकाल.

आता तुम्ही म्हणाल की रस्ते अपघात होण्याचे हेच एक कारण आहे का तर असं नाही आहे. वाहन चालवण्याचा कमी अनुभव असणे, आणि निष्काळजीने वाहने चालवने हे देखील तरुणांचे सर्वाधिक अपघात होण्यामागील महत्वाचे कारण ठरते. तेव्हा या सगळ्या गोष्टींना समजूनच पुढचा निर्णय घेणे आपल्यासाठी समजुतीचे ठरेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button