ताज्या बातम्याट्रेंडिंग

‘बिकिनी किलर’ अखेर सुटला, ‘हा’ चार्ल्स शोभराज नक्की आहे तरी कोण?

अमिताभ बच्चनचा एक प्रसिद्ध डायलॉग तुम्हाला आठवत असेल. डॉन का इंतज़ार तो ११ मुल्क़ों की पुलिस कर रही है’. हा फिल्मी डायलॉग खऱ्या आयुष्यात एका किलर वर बरोबर फिट बसतो, कारण ज्या किलरची चर्चा आज आपण करणार आहोत. त्याच्या मागे सुद्धा नौ मुलको कि पुलिस पडी थी. (“Bikini Killer” finally released, who is ‘this’ Charles Shobhraj?)

‘बिकिनी किलर’ म्हणून ओळखला जाणारा सीरियल किलर, चार्ल्स शोभराज नुकतंच तुरुंगातून बाहेर आला आहे. नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या सुटकेचे आदेश दिले. जगातील अनेक देशांमध्ये खून करणारा शोभराज नेपाळमध्ये गेल्या एकोणीस वर्षांपासून शिक्षा भोगत होता.

पण शोभराजची सुटका का झाली? या सीरियल किलरला ‘बिकिनी किलर’ का म्हणतात? हे सगळे प्रश्न या माध्यमातून आज आपण करणार आहोत. शोभराज हा व्हिएतनामी आणि भारतीय वंशाचा आहे. मूळचा व्हियेतनामचा असलेल्या चार्ल्स शोभराजचा जन्म १९४४ मध्ये व्हियेतनामच्या एका शहरात झाला होता.

त्याची आई व्हियेतनामची आणि वडील मूळचे भारतीय होते. चार्ल्सने त्याची काही वर्ष आशिया आणि फ्रान्समध्ये घालवली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चार्ल्सच्या आई-वडिलांनी लग्न केलं नव्हतं. चार्ल्स हा लहान असल्यापासून गुन्हेगारीमध्ये आला होता. १९६३ मध्ये चोरीच्या गुन्ह्याखाली त्याला पहिल्यांदा जेलमध्ये जावं लागलं होतं.

जेलमधून सुटल्यानंतरही तो गुन्हेगारीच्या जगात ऍक्टिव्हच होता. फ्रान्समध्ये असतांना त्याने अनेक घोटाळे केले आणि कोट्यवधी रुपये जमा केले. त्यानंतर तो युरोप सोडून इस्तांबूल आणि नंतर भारतात आला. यादरम्यान त्याने सेंटाल नावाच्या एका महिलेशी लग्न केलं होतं. लग्नानंतर दोघं मिळून पर्यटकांना लुटून त्यांच्या पासपोर्ट्सवर जगभरत फिरत होते.

त्यानंतर मुंबईत राहत असतांना त्याला मुलगी झाली. मुलीच्या जन्मानंतरही तो सतत गुन्हे करत होता, यादरम्यान तो जेलमधून पळून जाण्यातही माहिर झाला होता. भारतात चार्ल्स १२ वर्ष तिहाड जेलमध्ये होता. इथे शिक्षा भोगल्यानंतर तो पुन्हा फ्रान्समध्ये गेला. त्यानंतर नेपाळमध्ये त्याला पकडण्यात आलं. २००३ पासून तो नेपाळ जेलमध्ये बंद होता.

नेपाळमध्ये त्याला शिक्षा देण्यात आली, जी आता पुर्ण होत आहे. आता शोभराज गुन्हेगारीच्या दुनियेतील ‘बिकिनी किलर’ कसा बनला तर, शोभराजने थायलंड, नेपाळ आणि भारतातील पर्यटकांना, विशेषतः बॅकपॅकर्स वर तो आपला निशाणा साधायचा. अनेकदा त्यांच्याशी मैत्री करायचा आणि नंतर त्यांना अंमली पदार्थ पाजून, त्यांच्या वस्तू आणि ओळखपत्र चोरायचा.

काही प्रकरणांमध्ये, त्याने ज्यांची हत्या केली त्यांच्या मृतदेहांची क्रूरपणे विल्हेवाट लावली. शोभराजला मीडिया आणि पोलिसांमध्ये बिकिनी किलर म्हणूनही ओळखले जात होते, कारण त्याचे बळी – सहसा सुट्टीच्या दिवशी बिकीनी घातलेल्या पर्यटक मुली होत्या. तो बिकिनी घातलेल्या मुलींना मारायचा, म्हणून त्याला ‘बिकिनी किलर’ असे टोपणनाव मिळाले.

शोभराज खूप हुशार होता. मुलींना आपल्या जाळ्यात अडकवण्यात तो माहीर होता. शोभराज संपूर्ण युरोप आणि आशियामध्ये अनोळखी लोकांना फसवण्यात आणि पोलिसांना चुकवण्यात पटाईत होता. म्हणूनच त्याला साप सुद्धा म्हंटले जायचे. गेल्या डिसेंबर २०२१ मध्ये शोभराजनं नेपाळ सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती.

रिट याचिकेत दावा केला होता की, त्यानं त्याच्या २० वर्षांच्या शिक्षेपैकी १७ वर्षांची शिक्षा आधीच भोगली आहे. ‘ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी सवलत’ द्यावी अशी मागणीही त्यानं केली होती. दरम्यान, शिक्षेच्या काळात चांगली वागणूक ठेवल्याबद्दल त्याला सोडण्याची शिफारस आधीच करण्यात आली होती.

पण आता, नेपाळ सर्वोच्च न्यायालयानं शोभराजची प्रकृती आणि वयाच्या कारणास्तव त्याला सोडण्याचा निकाल दिला. याबरोबरच न्यायालयानं त्याच्या हद्दपारीचे आदेशही दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button