रस्त्यावर क्रिकेट खेळणं भोवलं, दुचाकीने धडक देताच… पहा व्हिडीओ
आयुष्यात प्रत्येकाने एकदा तरी रस्त्यावरचं किंवा गल्ली क्रिकेट खेळलं असणारच. अनेक वेळा गल्ली क्रिकेटमुळे वाद तसेच नुकसान होते. जगात कुठेही नाही इतकं जास्त क्रिकेटच वेड भारतामध्ये आहे. (He was playing cricket on the road when he was hit by a bike… Watch video)
क्रिकेट पाहणं असो वा खेळणे असो.. प्रत्येकाला आवडतं. मुलं कुठेही क्रिकेट खेळायला लागल्याचं अनेकदा पाहायला मिळतं. रस्त्यावरील क्रिकेट तर अनेक जण खेळले आहेत.
अशात रस्त्यावरील क्रिकेटच्या नुकसानीचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत काही मुले रस्त्याच्या मधात क्रिकेट खेळतांना दिसून येत आहे. या मुलांनी रस्त्याच्या मधोमध तीन स्टंटसुद्धा लावले आहे.
हा रस्ता नव्याने बांधलेला दिसत आहे. रस्त्याच्या मधात क्रिकेटची रंगत सुरु असताना, मागून आलेल्या दुचाकीस्वारामुळे फलंदाजाची फजिती झाली.
नेमकं झालं असं की, जेव्हा गोलंदाजाने चेंडू टाकला तेव्हा फलंदाजाने बॅकफूटवर जात शॉट मारला आणि धाव घेण्यासाठी जात असताना मागून येणारी दुचाकी त्याच्यावर धडकली.
या अपघातात दुचाकीस्वार काही अंतरावर जात गाडीसह पडतो. या घटनेत दुचाकीवरील दोघे आणि तो फलंदाज जखमी झाला आहे. या व्हिडिओ मध्ये कॉमेंट्रीचा आवाजही ऐकू येत हे.
नरेंद्र सिंह नावाच्या युजरने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘रस्त्यावर क्रिकेट खेळणे योग्य नाही.’ असे लिहिले आहे. इंटरनेटवर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांनी हा व्हिडिओ पाहत शेअर सुद्धा केला आहे.