ताज्या बातम्याट्रेंडिंग

अहो किती घाई…! लग्न ठरून साखरपुडा आटोपला, अन् नवरी – नवरदेव गेले पळून, हे होत कारण…

लव्ह स्टोरी तर तुम्ही प्रचंड बघितल्या असतील. पळून जाऊन लग्न करण्याच्या सिनेमे आणि न्यूज सुद्धा तुम्ही भरपूर बघितलेले असतील. पण तुम्ही लग्नाला उशीर होतो आहे म्हणून लग्नाच्या जोडप्याला कधी पळून जातांना बघितलं आहे. (Hey how fast…! The marriage was arranged, the engagement was over, the bride and the bridegroom ran away, this was the reason)

होय..हे अगदी खर आहे.. बिहार मध्ये दररोज विचित्र गोष्टी घडताना दिसत असतात. बिहार मधील हटके लव्ह स्टोरी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात.

लग्नाच्या रीतिरिवाजानुसार पहिले साखरपुडा, नंतर हळद आणि मग लग्न होत असते. साखरपुडानंतर लग्नाची जोरदार तयारी सुद्धा सुरू होते. तर काही कपलचं प्रकरण घरच्यांकडून मान्य नसेल, तर ते पळून जाऊन लग्न सुद्धा करत असतात.

मात्र, बिहारमध्ये एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. तरुण-तरुणीचे लग्न ठरले होते. मात्र लग्नाला उशीर होणार असल्याचे कळताच दोघेही घरातूनच पळून गेले. दोघांच्या लग्नाची बिहारमध्ये जोरदार चर्चा होत आहे.

बिहारमधील सारण जिल्ह्यातील पानापूर या गावामध्ये या जोडप्याचे आधीच लग्न ठरले होते. २०२३ च्या मे महिन्यामध्ये हे जोडपं विवाहबंधनात सुद्धा अडकणार होत. त्यांचा साखरपुड्याचा कार्यक्रम देखील पार पडला.

मात्र, तरुणाला इतकी कसली घाई होती माहीत नाही, तो तरुणीला घेऊन चक्क फरार झाला. लग्न ठरल्यानंतर हे लव्ह बर्डस एकमेकांशी मोबाईल फोनद्वारे दररोज बोलत होते.

लग्नाला उशीर होणार असल्याचे कळताच त्यांनी घरातून पळून जाण्याचा बेत आखला. मुलीच्या कुटुंबीयांना माहिती मिळताच त्यांनी मुलीचा शोध सुरू केला.

कोणतीही खबर न मिळाल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार सुद्धा दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी तपास प्रक्रिया सुरु केली व शोध घेतला.

मात्र, पळून गेल्यानंतर हे जोडपं खुद्द त्यांच्या गावी पोहचल. तिथल्या लोकांनी पळून जाण्याचे कारण विचारले असता, तेव्हा तरुणाने सांगितले की, लग्नाची तारीख खूप लांबणीवर आहे. त्यामुळे आम्ही दोघांनी पळून जाण्याचा हा निर्णय घेतला.

आम्हा दोघांना लवकर लग्न करायचे आहे. हे ऐकून संपूर्ण गावाला आश्चर्याचा धक्का बसला. सोशल मीडियावर हे प्रकरण चांगलंच व्हायरल होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button