ट्रेंडिंगताज्या बातम्या

जगन्नाथपुरी मंदिराच्या भोवती गुंफली आहे अनेक रहस्य, या गोष्टी तुम्हीही ऐकल्या नसतील…

भारतातील मंदिरांचा इतिहास अतिशय जुना आणि भव्य दिव्य असा आहे. भारतातही अनेक मंदिरांमध्ये रहस्य दडले आहेत. प्रत्येक पुरातन मंदिरांना आपला एक इतिहास लाभला आहे. तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड देऊन या मंदिरांची निर्मिती करण्यात आली आहे. (Jagannathpuri temple is surrounded by many secrets, which you may not have heard)

जागेचा अभ्यास, तेथील वातावरण, नैसर्गिक गोष्टी या सर्वाना गृहीत धरून मंदिरं उभारण्यात आली. असच एक रहस्यांनी भरलेलं मंदिर आहे ते म्हणजे जगन्नाथपुरी. जगन्नाथपुरी मंदिराच्या भोवती अनेक रहस्य गुंफली आहेत. हीच रहस्य आज आम्ही या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत.

जगन्नाथपुरीचे वर्णन पृथ्वीवरील स्वर्ग असे देखील केले जाते, ओडिशामध्ये स्थित पुरीच्या जगन्नाथ मंदिराला भेट देण्यासाठी भाविक दूर दुरून येतात. हे मंदिर चार धाम तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. तब्बल १०६८ मध्ये, म्हणजेच हजारो वर्षांपूर्वी तयार केली गेलेली ही एक ऐतिहासिक संरचना आहे. याच मंदिराबाबत काही रहस्यमयी गोष्टी दडल्या आहेत.

यातील पहिली म्हणजे, जगन्नाथ मंदिराच्या शिखरावर एक ध्वज आहे, मात्र तो वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकतो. आजपर्यंत असे का होते, याचे वैज्ञानिक कारण शोधण्यात यश आले नाही. हाच ध्वज दररोज बदलण्याची देखील विधी आहे, दररोज एक याचक ४५ मजल्यांच्या इमारतीच्या उंचीसह ध्वज बदलण्याकरिता भिंतीवर चढतो आणि विशेष म्हणजे हे काम तो कोणत्याही संरक्षणाशिवाय करतो.

दुसरे म्हणजे याच शिखरावर निल चक्र नावाचे चक्र आहे, जे अष्टधातूंनी बनवले असून, तब्बल १००० किलोग्रॅम पेक्षाही अधिक वजनाचे आहे. ९०० वर्षांपूर्वी इतक्या टोकावर याला कसे नेण्यात आले असेल हे देखील एक रहस्यच आहे. तिसरे रहस्य असे की, या क्षेत्रात घुमटाच्या वर एकही पक्षी उडत नाही, इतकेच काय तर विमान देखील मंदिराच्या भोवती फिरत नाही.

जगन्नाथपुरी मध्ये असणाऱ्या स्वयंपाक घराचं देखील रहस्यच आहे. जस हिंदू धर्मात अन्न वाया घालवण्याला अतिशय वाईट मानले गेले आहे, त्याच्याशीच निगडित एक चमत्कार इथे दररोज पाहायला मिळतो. या मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या दररोज दोन हजार ते दोन लाखांपर्यंत असते. दररोज भक्तांसाठी महाप्रसाद केला जातो.

यात कधीही प्रसाद वाया जात नाही व भाविकांसाठी कमी देखील पडत नाही. हा जणू एक चमत्कारच आहे. दुसरं म्हणजे स्वयंपाकघरात सात भांडी एकमेकांवर ठेऊन प्रसाद शिजवण्यात येतो. विचार केल्यास सर्वात खाली असलेल्या भांड्यात असलेला प्रसाद आधी शिजायला हवा, मात्र तसे न होता सर्वात वरच्या भांड्यात असणारा प्रसाद सर्वात आधी शिजतो आणि खाली असलेल्या भांड्यातील प्रसाद सर्वात शेवटी.

या मंदिराचे पुढील रहस्य देखील एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही, जगन्नाथपुरी मंदिर हे समुद्राच्या जवळ आहे. तुम्ही जेव्हा मंदिराच्या आत पाय ठेवता, तेव्हा तुम्हाला लाटांचा आवाज ऐकायला येत नाही, मात्र मंदिराच्या बाहेर पाऊल ठेवताच लाटांचा आवाज पुन्हा सुरु होतो. दिवसभरात कुठलीही वेळ असो मात्र मंदिराच्या शिखराची सावली जमिनीवर पडत नाही.

अनेक गोष्टींना जगन्नाथाच्या शक्तीच स्वरूप बोललं जात, मात्र यासोबतच या मंदिर बांधण्यात येण्यावेळी वापरण्यात आलेले तंत्रज्ञान आणि विज्ञान देखील याला कारणीभूत ठरते. जगन्नाथपुरी येथे होणारी यात्रा तब्बल १८०० वर्षांपासून चालत आली आहे, हि यात्रा जशी जगन्नाथ पुरीची शान आहे तितकेच या मंदिरामागे असणारे तंत्रज्ञानं आणि विज्ञान देखील आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button