इतिहासजरा हटकेताज्या बातम्यामाहितीपूर्ण

आयुष्य बदलण्यासाठी फक्त या ७ गोष्टी करा…

बहुतेक जण एक चौकटबद्ध आयुष्य जगत असतात. तसं आयुष्य जगणंही आवश्यक आहेच. पण ठराविक काळानंतर आपल्याला त्या दैनंदिन जीवनाचा कंटाळा येऊ लागतो. आयुष्यामध्ये काहीतरी नवीन हवं असतं.

पण लोक नवीन गोष्टी न शोधता आहे त्या जीवनाबद्दल रडत राहतात. त्यापेक्षा अशा काही गोष्टी आपण करू शकतो, ज्यामुळे आपलं आयुष्य बदलून जाईल आणि आयुष्यात आनंदाचं भरतं येईल. या सोप्प्या गोष्टी जाणून घेऊन तुमचं आयुष्यही सुंदर करायचं असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा.

  • मी माझं जीवन कसं बदलू शकतो?

जीवनात बदल घडवून आणण्यासाठी आपल्या जीवनात काय महत्त्वाचं आहे, हे शोधण्यासाठी थोडा वेळ घालवावा लागेल. आपल्याला आयुष्यात काय साध्य करायचे आहे, आपली स्वप्नं काय आहेत, आपल्याला कशामुळे आनंद होतो, जीवन जगण्याचा आपला उद्देश आणि जीवन कसं जगायचं आहे, याची दिशा आपणच शोधायला हवी.

  • प्रवासातून मार्ग कसा मिळतो?

आपण कामानिमित्त जवळच्या अथवा लांबच्या प्रवासाला जात असतो. पण किती वेळा तो प्रवास आपण एन्जॉय करतो, हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा. कामाच्या धावपळीत रोजच्या धकाधकीच्या जीवनात असे

काही खास वेगळे प्रवास जोडीदारासोबत, कुटुंबासोबत किंवा मित्र-मैत्रिणींसोबत करायला हवेत. त्यांच्यासोबत राहून काही क्षणांचा आनंद मिळवायला हवा. आपल्या आयुष्यातले काही महत्त्वाचे दिवस असे आनंददायी प्रवास करून संस्मरणीय बनवायला हवेत.

  • मुलांसोबत वेळ घालवण्याचे फायदे

हल्लीचे पालक हे दोघे नोकरी करतात किंवा व्यवसायातही एकमेकांना साथ देतात. स्वतःच्या आणि मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ते खूप कष्ट करतात. पण या कष्ट करण्याच्या धावपळीच्या काळात या पालकांना मुलांना तितकासा वेळ देणं जमत नाही.

मुलं डोळ्यासमोर मोठी कधी झाली, कळतंच नाही. मागील काही वर्षांमध्ये लॉकडाऊनमुळे पालकांनी मुलांसोबत खूप छान क्षण व्यतीत केले, सर्वांच्याच कुटुंबात आलेल्या अशा क्षणांनी सर्वांना खूप काही शिकवलं. पण यापुढे हे क्षण अनुभवायला लॉकडाऊनची गरज नसावी.

  • आरोग्याची काळजी घ्यावी

आपण नवीन वर्षाच्या सुरुवातीला ठरवतो की, या वर्षी व्यायाम सुरू करणार. धावणार, चालणार, आणि स्वतःचा फिटनेस जपणार पण पुन्हा आपण नेहमीच्या कामाला लागतो आणि या फिटनेससारख्या महत्वाच्या गोष्टी मागे पडतात.

आज कमी वयात बऱ्याच जणांना मधुमेह, रक्तदाब, अशा विकारांना सामोरं जावं लागतं. आपली जीवनशैलीही त्याला कारणीभूत ठरते. म्हणून आपलं वेळापत्रक असं बनवायला हवं की, फिटनेस सांभाळण्यासाठी व्यायाम, प्राणायाम करून दिवसाची प्रसन्न सुरुवात करता येईल.

  • पश्चात्ताप सोडून द्यावा

पश्चात्ताप आपल्याला आयुष्यात मागे ठेवतो. जर आपण सगळा वेळ भूतकाळाबद्दल विचार करण्यात घालवला तर वर्तमान आणि भविष्यकाळ आपल्या हातून निघून जाईल. भूतकाळात जे काय झालं ते घडून गेलं, आता ते बदलता येणार नाही.

म्हणून गेलेलं जे आहे, ते सोडून देता आलं पाहिजे. आता सध्याचे आणि भविष्यातील जीवन कशा पद्धतीनं जगायचं हे जर का ठरवलं तर हा पश्चाताप करण्यावर नियंत्रण ठेवता येईल. आधी घडून गेलेल्या गोष्टींचा स्वतःवर होणारा नकारात्मक परिणाम दूर सारता यायला हवा.

गंमत वाटेल पण पश्चाताप करण्यासारखी गोष्ट एका कागदावर लिहून तो कागद जाळून किंवा पुरून टाकावा. एकदा प्रयत्न करून बघा. तुम्हाला नक्की समाधान मिळेल.

  • भीतीचा सामना करावा

आपल्या भीतीवर प्रभुत्व मिळवायला शिकायला हवं. कारण ही भीती आपल्याला नियंत्रणात ठेवते. अपयशाची भीती असो, एकाकीपणाची किंवा अज्ञाताची, ती आपल्याला आपलं आयुष्य मोकळेपणाने जगण्यापासून रोखते.

असंतुष्ट आणि अतृप्तीची भावना मनातून काढली तर भीतीदेखील निघून जाईल. जेव्हा आपल्याला आपल्या भीतीचा सामना करावा लागतो तेव्हा आपण आपले जीवन कसे जगायचे हे निवडण्यासाठी आपली विचारशक्ती पणाला लावा आणि या शक्तीच्या बळावर भीतीला पराभूत करा.

  • शिकण्याचा आनंद अनुभवावा

प्रत्येक वेळी तुम्ही काहीतरी नवीन शिकता तेव्हा आपल्याला अधिक ज्ञान मिळते आणि अधिक ज्ञानाने अधिक आत्मविश्वास येतो. नवीन कौशल्ये शिकणे आपल्याला नवीन परिस्थितींमध्ये अधिक जुळवून घेण्यास मदत करते.

नवं शिक्षण आपल्याला अधिक सर्जनशील आणि नाविन्यपूर्ण बनण्यासाठी प्रोत्साहित करते. वाचन हा आपल्यासाठी नवीन काहीतरी शिकण्याचा उत्तम मार्ग आहे. शिकण्याचा आनंद पूर्णपणे आत्मसात करण्यासाठी,

अशी प्रेरणादायी पुस्तकं वाचायला हवीत ज्यामध्ये नवनवीन गोष्टी व्यवस्थितपणे शिकता येतील. सर्वात जास्त आवडणारं कौशल्य याच पुस्तकातून मिळून जाईल.

आपण सकारात्मक वृत्तीने या गोष्टी करायला हव्यात. लक्षात ठेवायला हवं की बदलाला वेळ लागतो. जेव्हा आपण आपलं आयुष्य कायमचं बदलण्याचा निर्णय घेतो तेव्हाच नव-आयुष्य सुरू होतं! नाही का? लेख आवडला असेल, विचार पटले असतील तर कमेंट करून नक्की सांगा आणि इतरांसोबत शेयरही करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button