चिमुकल्याने साठवलेल्या पैशांची पिग्गी बँक हाती देताच राहुल गांधी झाले भावुक…
गेल्या कित्येक दिवसांपासून राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरु आहे. या यात्रे दरम्यान एक असा प्रसंग घडला कि तो पाहून राहुल गांधी हे भावुक झालेत. (Rahul Gandhi got emotional as he handed over a piggy bank of money saved by a toddler…)
राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेसाठी मध्येप्रदेशात पोहोचले आहेत . तिथे राहूल गांधीना भेटण्यासाठी भोपाल वरून दोन चिमुकले मध्यप्रेदेश येथील खांडवी येथे पोहोचले, राहुल गांधीना भेटताच मुलांनी गेल्या ७८ दिवसांनपासून जमा केलेली पैश्यांची पिग्गी बँक राहुल गांधी याच्या हाती दिली आणि हे पैसे भारत जोडो यात्रेसाठी वापरा असे सांगितले .
हे सगळं चित्र बघताच राहुल गांधी हे भावुक झालेत आणि त्या मुलांना प्रेमाने जवळ घेतलं, गेल्या ७८ दिवसांन पासून हे मुलं भारत जोडो यात्रे साठी पैसे जमा करत होते असं सांगितलं जातंय.
या प्रसंगी मुलांची भावना बघून राहुल गांधी समेत तिथे असणारा प्रत्येक व्यक्ती हा भावुक झाला . या यात्रेत वेगवेगळे रंग पाहायला मिळत आहेत. कधी गरीब महिला प्रवासात राहुल गांधींना आपुलकी देताना दिसतात.
तर कधी बॉलिवूड कलाकारही त्यांच्या या प्रवासात सामील होतात. आणि आता राहुल गांधी यांच्या भेटीसाठी मध्य प्रदेशातील दोन लहान मुलांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. हे बघून असं वाटतं कि कुठे तरी लोकांना काँग्रेस कडून आशेचा किरण पाहायला मिळतोय .