ताज्या बातम्याट्रेंडिंग

सुशांतसिंग मृत्यूप्रकरणात आदित्य ठाकरे वर आरोप करणारे राहुल शेवाळे कोण आहेत?

सध्या नागपुरात हिवाळी अधिवेशनाची सुरुवात झाली आहे, सत्ताधाऱ्यांच्या आणि विरोधकांच्या आरोप प्रत्यारोपाची मालिकाही सुरु झाली आहे. मात्र नुकतच या आरोप प्रत्यारोप मालिकेमध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर अतिशय गंभीर आरोप करण्यात आले, आणि हे आरोप केलेत खासदार राहुल शेवाळे यांनी. (Who is Rahul Shewale who accused Aditya Thackeray in Sushant Singh death case?)

त्यांनी चक्क सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंचा उल्लेख केला आहे. आता हे प्रकरण काय? आरोप करणारे राहुल शेवाळे आहेत तरी कोण? आणि राहुल शेवाळे हे लोकसभेत नेमकं काय बोलले. हेच आज यामध्ये जाणून घेऊयात.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर लोकसभेत गंभीर आरोप केले गेले आणि मग काय महाराष्ट्राच्या राजकारणात जणू खळबळच उडाली. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी हे आरोप केलेत. आता हे नेमकं प्रकरण काय? तर राहुल शेवाळे यांनी बिहार पोलिसांच्या चौकशीत पुढे आलेली एक बाब लोकसभेत सादर केली.

रिया चक्रवर्तीला एयू नावाने ४४ कॉल आले होते, ते कॉल आदित्य उद्धव ठाकरेंचे असल्याचा बिहार पोलिसांचा एक अहवाल राहुल शेवाळेंनी लोकसभेत सादर केला. हे आरोप करताच लोकसभेत जोरदार खळबळ उडाली. परंतु, त्यांनी केलेले सर्व आरोप संसदेच्या कामकाजातून वगळण्यात आले.

याच आरोपात त्यांनी हे सुद्धा सांगितले की मुंबई पोलिसांनी एयू नावाचा वेगळाच अहवाल दिला, मात्र बिहार पोलिसांनुसार एयू चा अर्थ आदित्य उद्धव असा होतो. आता इतके गंभीर आरोप केल्यावर ठाकरे गट आक्रमक होणार नाही, हे अशक्यच आहे. यावर ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी आपलं मत जाहीर केलं.

ज्यात संजय राऊत म्हणाले, खासदार राहुल शेवाळे हे शिवसेनेच्या ताटात जेवले आहेत. शिवसेनेतच त्यांची वाढ झाली आहे. तेच शेवाळे आज आदित्य ठाकरेंवर बिनबुडाचे आरोप करत आहेत, हा नीचपणाचा कळस आहे. राहुल शेवाळेंवरच विनयभंगासह बलात्काराचे आरोप झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आता अगदी याच कारणामुळे राहुल शेवाळे हे नाव पूर्वी देखील चर्चेत आल होत. नेमके राहुल शेवाळे आहेत तरी कोण? मुंबईतच राहुल शेवाळे यांचा जन्म झाला, आणि अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते आजपर्यंत ते शिवसेनेतच आहेत. त्यांच्या पत्नी देखील शिवसेनच्याच नगरसेविका राहिल्या.

बरेच वर्ष त्यांनी पालिका स्तरावर काम केलं आणि नंतर संसदेत प्रवेश मिळवला. त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली, जेव्हा ते अणुशक्तीनगर मध्ये नगरसेवक म्हणून निवडणूक आले. पुढे २०१० ते २०१४. म्हणजे सलग ४ वर्षे राहुल शेवाळे मुंबई महानगरपालिकेतील स्थायी समितीच्या अध्यक्षपदी निवडून आले होते.

शिवसेनेने दक्षिण मध्य मतदार संघातून उमेदवारी दिल्यामुळे त्यांनी हे स्थायी पद सोडले. त्यांनतर त्यांनी २०१४ आणि २०१९ असे दोनदा लोकसभेची निवडणूक जिंकली. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राहुल शेवाळे, शिंदे गटात सामील झाले. यादरम्यानच ते चर्चेत आले होते, जेव्हा त्यांनी भाजप शिवसेना युती मागच्या वर्षीच होणार होती. असा गौप्य्स्फोट केला होता तेव्हा.

याव्यतिरिक्त ते एका मोठ्या मुद्द्यामुळे चर्चेत आले होते, काही महिन्यांपूर्वी साकीनाका पोलिसस्थानकात त्यांच्यावर एका महिलेने बलात्काराची तक्रार दाखल केली होती. राहुल शेवाळे यांनी हे आरोप नाकारले जरी असले, तरी आता आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केल्यानंतर, विरोधक हाच मुद्दा उचलून त्यांच्यावर पलट वार करतांना दिसत आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे कि दिशा सालियन प्रकरणाची एस आय टी मार्फत चौकशी होणार. यावर आदित्य ठाकरें म्हणाले की एनआयटी चा घोटाळा आम्हाला सभागृहात सादर करु न देण्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. अगदी या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण तापलंय आणि रोज लोकसभेत अनेक वादविवाद पाहायला मिळत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button