‘आई आई असते’… आईच्या मायेचा ‘हा’ व्हिडीओ एकदा नक्की पहा…
आई व मुलांचं नातं हे अतूट आणि नाजूक असत हे प्रत्येकाला माहिती आहे. हे अतिशय निर्मळ आणि वेगळं नातं आहे आणि त्याचे कंगोरे समजून घेणं बऱ्याच वेळा कठीण असत. (‘A mother is a mother’… watch this video of mother’s love)
मुलांच्या हक्काची पहिली व्यक्ती ती म्हणजे आई असते. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आई आणि मुलाचं हे नातं वेगवेगळा आकार घेत असत. आणि आईच्या प्रेमापेक्षा काहीच मोठं नसत.
परिस्थिती कुठली ही आणि कशी ही असली तरीही आपल्या मुलांना उत्तम गोष्टी मिळाव्या असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असत. मुलांच्या प्रेमापोटी नेहमीच आईची काहीही करण्याची तयारी असते.
अश्याच एका व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये तुम्हाला आई आणि मुलाचं नातं दिसून येईल. १८ सेकंदाच्या या क्लिपमध्ये एक आई भर पावसा मध्ये आपल्या मुलीला खांद्यावर घेऊन जात आहे.
हा हृदयस्पर्शी व्हिडीओ जिंदगी गुलझार नावाच्या पेजने ‘आई आई असते’ असं कॅप्शन देऊन सोशल मीडियावर शेअर केला आहे. ती भिजू नये म्हणून तिने एका हातात छत्री सुद्धा घेतली आहे. या व्हिडीओला ५७००० पेक्षा जास्त लोकांनी पहिले आहे.
हा व्हिडीओ बघून प्रत्येकाला आनंदच होणार आहे.