ताज्या बातम्याट्रेंडिंग

अजित पवारांची ऑफर वसंत मोरे स्वीकारणार का? मनसेतील नाराजीवर स्पष्टचं जाहीर केलं मत…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुण्यातील आक्रमक आणि धडाकेबाज चेहरा म्हणून वसंत मोरे यांच्याकडे पाहिले जाते. मात्र ते गेल्या काही महिन्यांपासून पक्षाच्या काही भूमिकांवर नाराज असल्याची चर्चा रंगतेय. (Will Vasant More accept Ajit Pawar’s offer? A clear vote was announced on the displeasure in the MNS)

त्यामुळे वसंत मोरे आता मनसेला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या.

अशात विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी वसंत मोरे यांना पक्षप्रवेशाची ऑफर दिल्याची चर्चा हि राजकीय वर्तुळात सुरु आहे.

ज्यावर खुद्द वसंत मोरे यांनी स्पष्टीकरण देत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.अजित पवार यांनी आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिल्याची बाब त्यांनी मान्य केली.

मी सध्या मनसेतच आहे. पण अलीकडे मला पक्षसंघटनेतील लोकांकडून त्रास देण्याचा प्रकार सुरु असल्याचेही वसंत मोरे यांनी सांगितले. त्यामुळे वसंत मोरे भविष्यात मनसेला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होणार का, हा प्रश्न पुन्हा समोर येतोय.

वसंत मोरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले पुण्यातील एका लग्नात अजित पवारांनी मला आवाज दिला आणि दादा म्हणाले, अरे तात्या किती नाराज…आता या आमच्याकडे… मी वाट बघतोय.

लग्नातून जाताना हि अजित पवार पुन्हा म्हणाले, वसंतराव मी वाट बघतोय… आपल्याला भेटायचं आहे. अजित दादाच्याविधानावर मी होय असं म्हटलं . मला वाटत कि , हा मी केलेल्या कामाचा गौरव असल्याचं वसंत मोरे यांनी म्हटलं.

या सगळ्या घडामोडींमुळे वसंत मोरे हे मनसेतून बाहेर पडणार, अशा चर्चा सुरु आहेत. याविषयी वसंत मोरे यांना विचारले असता, मी अजूनही मनसेतच असल्याचे त्यांनी सांगितले.

मला अजून तरी राजसाहेब प्रिय आहेत. परंतु, आता मला पक्षातील बाकीच्यांचा त्रास जाणवू लागला आहे. पूर्वी जो त्रास होत नव्हता, तो आता जाणवत आहे.

मला स्टेजवर बोलवायचे आणि बसवून ठेवायचे, मी काय शो पीस नाही ना, असा संतप्त सवाल वसंत मोरे यांनी विचारला. त्यांच्या या टीकेचा रोख नेमका कोणाच्या दिशेने होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मात्र, वसंत मोरे यांच्या बोलण्याचा एकूण सूर पाहता भविष्यात ते वेगळा विचार करण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button