‘हा’ चिमुकला चक्क म्हशीवर बसून आपल्या सुरेल आवाजात गातोय गाणं…
लहान मुलांच्या बाबतीतल्या तर असंख्य गोष्टी दर मिनीटाला सोशल मीडियाला वायरल होत असतात. लहान मुलांचा गोंडसपणा दाखवणारे व्हिडिओ पाहून आपण काही क्षणांसाठी का होईना, आपले ताण विसरून जातो आणि त्या व्हिडिओचा आनंद घेतो. (‘Ha’ the little boy is sitting on the buffalo and singing in his melodious voice…)
नुकतच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक लहान मुलगा म्हशीच्या पाठीवर बसून गाणे गाताना दिसत आहे. आता हा मुलगा आणि हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, हे मात्र समजू शकले नाही.
वायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये प्रत्यक्षात हा मुलगा गाणे गात नसून दुसरेच कोणी गाणे म्हणत आहे. मात्र तो करत असलेले हावभाव पाहून तोच हे गाणे म्हणतोय असं वाटतं. डबिंगच्या माध्यमातून सध्या अशाप्रकारच्या गोष्टी करणे सहज शक्य असून असे काही ना काही प्रयोग केले जात असतात.
‘मुझसे शादी करोगी’हे गाणं हा लहान मुलगाअतिशय तालासुरात म्हणतोय, असं आपल्याला सुरुवातीला वाटतं. पण प्रत्यक्ष दुसराच मुलगा गाणं म्हणत असल्याचं नंतर आपल्या लक्षात येतं.
ट्विटरवर हा वायरल व्हिडीओ २५ सेकंदांचा आहे. कोणीतरी या मुलांचं ऐका. असं शेअर करणाऱ्या व्यक्तीने म्हटलं आहे. या लहान मुलाच्या धा़डसाचे कौतुक होताना दिसत आहे. एका दिवसांत हा व्हिडिओ जवळपास ४७ हजार लोकांनी पाहिला असून त्यावर लोक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.