ताज्या बातम्याट्रेंडिंग
थंडीत अंघोळीसाठी वापरा या तरुणाची शक्कल, व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही…
थंडीत अंघोळ करायचं म्हंटल तर सर्वांनाच टेन्शन येत. उन्हाळ्यात तर लोकांना कितीही वेळा अंघोळ केली तर कमीच असत, मात्र हिवाळ्यात कुणालाच अंघोळ करायची इच्छा होत नाही. हिवाळ्यात अंघोळ करायची जरी असली तरी सर्वांना गरम पाणीच लागत कारण थंड पाण्यानी अंघोळ म्हणजे टॉर्चर पेक्षा कमी नाही. (Use this guy’s trick to take a cold shower, the video won’t make you smile)
सध्या एका तरुणाच्या अंघोळीचा असाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या तरुणाची अंघोळीची निन्जा टेक्निक सगळ्यांनाच चक्क करत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
व्हिडीओ मध्ये दिसत आहे कि, एक तरुण अंघोळीसाठी बाथरूमध्ये उभा आहे, व त्याच्या समोर एक बकेट ठेवली आहे, तरुण या बकेटीतून मगच्या साहाय्याने पाणी काढत आहे मात्र हे पाणी शरीरावर न टाकता तो मागे टाकतोय. दुसऱ्या खांद्यावर पाणी टाकतांना सुद्धा तो अंगावर न टाकता फरशीवर टाकतोय.
त्यानंतर तो त्याचे केवळ २ बोट पाण्यात बुडवतो आणि त्याने डोळे ओले करतो. त्यांनतर हा तरुण बाथरूम मधून निघून जातो. हि त्याची शरीरावर एक थेंबही पाणी न टाकता अंघोळ करण्याची निन्जा टेक्निक सध्या खूपच व्हायरल होत आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ ७ लाख ३३ हजारांहूनही जास्त लोकांनी पहिला आहे.