लग्नाच्या बोहल्यावर बसण्यापूर्वी नवरदेवाचे हटके आंदोलन, ‘या’ अटींची केली मागणी…
लग्नसराईचे दिवस सुरू झालेले आहेत. या दिवसांमध्ये सगळीकडे लग्नाचा उत्साह दिसून येतो. लग्नाच्या प्रसंगाबद्दल चे वेगवेगळे मजेशीर व्हिडीओ हे सोशल मीडियावर आपल्याला व्हायरल होतांना दिसून येते. (The bridegroom’s agitation, demanding ‘these’ conditions before sitting on the marriage stool)
लोक जास्तीस्त जास्त ,विशेष म्हणजे वधू-वरांशी संबंधित व्हिडीओ हे मोठ्या उत्सुकतेने पाहतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो थोडा आगळावेगळा आहे.
कारण येथे एक वर लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वीच रस्त्यावर बसून आंदोलन करताना दिसत आहे. याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
मिळालेल्या माहितीनुसार हा व्हायरल झालेला व्हिडीओ उत्तराखंड मधला असून. दरड कोसळल्यामुळे काठगोदाम हैदाखान हा रस्ता गेल्या महिन्यामध्ये खचला होता.
अशा परिस्थितीमध्ये या रस्त्याच्या बांधणीसाठी तिथली स्थानिक जनता आणि काँग्रेस नेते आंदोलन करत होते. या दरम्यान, वराची लग्नाची मिरवणूक जात होती.रस्त्याच्या बांधणीच्या मागणीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन सुरू होते.
ते पाहून वराने वधूच्या घरी जाण्याच्या ऐवजी तिथेच आंदोलन करत बसला. आणि आंदोलनकर्त्यांसोबत रस्ता बांधणी व दुरुस्त करण्याची मागणी केली.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत या आंदोलनावर बसणार असल्याचे त्याने सांगितले. हा व्हायरल झालेला व्हिडीओ काँग्रेस नेते यशपाल आर्य यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.
हा व्हिडीओ प्रचंड नेटकऱ्यांनी बघितला असून त्याला असंख्य लाईक्स सुद्धा मिळात आहे. आणि व्हिडीओवर मजेशीर कमेंट सुद्धा नेटकऱ्यांनी केले आहे.