टवाळखोराने लिफ्टमध्ये केली छेडछाड, तरुणीने घडवली चांगलीच अद्दल…
जगात टवाळखोरांची कुठेच कमी नाही आहे. भर दिवसा असो या रात्री असो टवाळखोर तरुणी आणि महिलांशी गैरवर्तनाची अनेक प्रकरण नेहमीच उघडकिस येत असतात. अश्या प्रकारच्या घटनांचे सोशल मीडियावरती व्हिडीओ वायरल होत असतात. (The thief molested in the lift, the young woman made a good deal…)
निडर तरुणी अश्या टवाळखोरांना मोठ्या हिमतीने जश्यास तसे उत्तर देण्याचाही घटना आपण पाहिल्या असणारच. सार्वजनिक ठिकाणी टवाळखोरी करणाऱ्यांना लोकांची चोप दिल्याचे सुद्धा व्हिडीओ वायरल होत असतात. पोलिसांकडून अशांवर वेळोवेळी कारवाई केली जात असते. तरी सुद्धा टवाळखोरांचे उपद्याप काही कमी होताना दिसत नाही.
सध्या असाच एक सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका लिफ्टमध्ये एक तरुण बाहेर जाताना दिसून येतो.पण त्याच फ़्लोअरवर एक तरुणी लिफ्टमध्ये जात असल्याचे बघून तो आणखी लिफ्ट मध्ये येतो. त्यांनतर तो तरुणीची छेड काढण्याचा प्रयत्न करतो. सुरवातीला तरुणी दुर्लक्ष करते.
पण तरुणाकडून पुन्हा गैरवर्तन होत असल्याचं बघून ती आक्रमक होते आणि त्या टवाळखोराला जोरदार कानशिलात लगावते. त्यांनतर तरुणी पुन्हा त्याला लाथ मारते आणि टवाळखोर जागीच कोसळतो. हा व्हिडीओ ट्विटर वर शेअर करण्यात आला आहे.
आतापर्यंत या व्हिडीओला १ लाख ७७ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेल आहे. तर ६ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. आणि त्यावरती वेगवेगळ्या प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आहेत.